"देवनागरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: वार्तांकनशैली ?
No edit summary
ओळ १:
'''देवनागरी लिपी''' बऱ्याच [[भारत|भारतीय]] [[भाषा|भाषांची]] प्रमुख [[लेखन पद्धती]] आहे. [[संस्कृत]], [[पाली]], [[हिंदी ]], [[मराठी]], [[कोकणी]], [[सिंधी]], [[काश्मिरी]], [[नेपाळी]], [[बोडो]], [[अंगिका]], [[भोजपुरी]], [[मैथिली]], [[रोमानी]] इत्यादी भाषा देवनागरीत लिहिल्या जातात.
[[File:Devnagari used in Melbourne Australia.jpg|thumb| देवनागरी लिपीचा जाहिरातीत वापर - [[मेलबर्न]] [[ऑस्ट्रेलिया]] येथे .]]
 
== देवनागरी ओळख ==
[[मराठी]], [[संस्कृत]], [[हिंदी]], [[कोंकणी]], [[काश्मिरी]], [[सिंधी]], [[नेपाळी]] आणि [[रोमानी]]सारख्या काही भारतीय मुळांच्या भाषांची प्रथम लिपी ही देवनागरी आहे. देवनागरी लिपी ही अबुगिडा लेखनपद्धतीमध्ये मोडते. जगातल्या बहुसंख्य लिपींप्रमणे देवनागरीदेखील डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. देवनागरी लिपीचा विकसनकाल हा बराच मोठा असून ह्या लिपीचा ख्रिस्तपूर्व ५०० मध्ये असलेल्या ब्राह्मी लिपीपासून आताची देवनागरी लिपीचा विकास झालेला आहे. साधारणत: इसवी सनाच्या बाराव्या शतकात स्थिरावलेल्या लेखनपद्धतीस देवनागरी असे नांव उपयोजिण्यास आरंभ झाला असावा. प्रत्येक शब्दावर एक रेषा ओढली जाते. तिला शिरोरेषा म्हणतात. तिच्यामुळे लेखन नीटनेटके व सुंदर दिसते. ही एक ध्वन्यात्मक लिपी आहे व त्यामुळे इतर लिप्यांपेक्षा ([[रोमन]], [[अरबी]], [[चिनी]] इत्यादी) अधिक वैज्ञानिक आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/देवनागरी" पासून हुडकले