"संयुक्त महाराष्ट्र चळवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो (Robot: Automated text replacement (-ॉं +ाँ))
खूणपताका: विशेषणे टाळा
छो
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा पाया [[इ. स. १९३८]] च्या अखेर वऱ्हाडात घातला गेला. त्या वेळी वऱ्हाडचा प्रदेश जुन्या मध्यप्रांत व वऱ्हाड (सी. पी. अँड बेरार प्रॉव्हिन्स) प्रांतात समाविष्ट होता. त्यात बहुसंख्या हिंदी भाषिकांची होती. वऱ्हाडातून येणारे उत्पन्न अधिकतर हिंदी विभागावर खर्च होऊनही वऱ्हाड दुर्लक्षिलेला राही. त्यामुळे त्यातून मराठी वऱ्हाड वेगळा करण्याची मागणी चालू शतकाच्या प्रारंभीपासून व्हाइसरॉयच्या कौन्सिलात होत होती. [[इ. स. १९३५]] साली प्रांतिक स्वायत्ततेचा कायदा पास झाला.[[इ. स. १९३७]]च्या निवडणुकीत प्रांतिक विधिमंडळात काँग्रेसला बहुमत लाभले. विधिमंडळाचे सदस्य रामराव देशमुख यांनी १ ऑक्टोबर [[इ. स. १९३८]] रोजी त्या विधिमंडळापुढे मांडलेला वेगळ्या वऱ्हाडाचा ठराव एकमताने मंजूर झाला.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5857754.cms</ref>
 
[[इ. स. १९३८]] रोजी पटवर्धन {{संदर्भ हवा}} व [[इ. स. १९४०]] मध्ये ग.त्र्यं. माडखोलकरांनी महाराष्ट्र एकीकरणाचा विषय उपस्थित केला{{संदर्भ हवा}}. माडखोलकरांनी महाराष्ट्र समाजात व्यापार व उद्योग भूमिपुत्रांच्या ताब्यात नसल्याचं व महाराष्ट्राचे काँग्रेस पुढारी एकीकरणासाठी प्रयत्न करत नसल्याचे म्हटले. [[इ. स. १९४६]]चे साहित्य संमेलन माडखोलकरांच्या अध्यक्षतेखाली झाले. या संमेलनात '[[संयुक्त महाराष्ट्र समिती]]' स्थापन झाले व संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे तीन ठराव साहित्यकांनी पाठवले ज्याला राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला.
 
त्यानंतर १५ दिवसांनी मुंबईत महाराष्ट्र साहित्य संमेलनात वऱ्हाडसह महाराष्ट्राचा एकभाषी प्रांत त्वरित करण्याच्या मागणीचा ठराव झाला. पुढच्या वषीर् नगरमधील साहित्य संमेलनाने त्याचा पुनरुच्चार केला. सर्व मराठी भाषाभाषी प्रदेशांचा मिळून जो प्रांत बनेल त्यास 'संयुक्त महाराष्ट्र' असे नाव देण्यात आले. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी [[इ. स. १९४०]]च्या प्रारंभी मुंबईत भरलेल्या बैठकीत 'संयुक्त महाराष्ट्र सभा' स्थापन झाली. तिच्यातफेर् पुढील वषीर् महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली. त्यात भाषणांपलिकडे काही झाले नाही. नंतर तीन महिन्यांत वऱ्हाडच्या प्रतिनिधींनी यापुढे सर्व लक्ष वऱ्हाडच्या प्रश्नावरच केंदित करण्याचे ठरवले. तरीही महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी मदत करणे हे त्यांनी आपले कर्तव्यच मानले. पुढे दुसऱ्या महायुद्धाने जग ग्रासून टाकले. देशातही स्वातंत्र्यलढ्याचा वडवानल पेटला होता. युद्धसमाप्तीनंतर भारतात सत्तांतराची शक्यता स्पष्ट होऊ लागताच त्याचा घटकांचा एकजिनसीपणा साधेल अशा रीतीने भाषा तत्त्वावर पुनर्रचना करून घ्यावी या विचाराचा पुन्हा प्रादूर्भाव झाला.
==चळवळीस सुरुवात==
[[चित्र:India Maharashtra locator map.svg|200px|thumb|महाराष्ट्र राज्य]]
या आयोगाच्या विरोधात महाराष्ट्रभर असंतोषाचा डोंब उसळला. नेहरूनी त्यामुळे सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र व स्वतंत्र मुंबई अशा त्रिराज्य योजना जाहीर केली. त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यामुळे अन्यायाची भावना मराठीजनांत पसरली व संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला. 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' हे या आंदोलनाचे घोषवाक्य बनलं.महाराष्ट्रीय काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर गुडघे टेकले. यामुळे काँग्रेसनेते जनतेच्या नजरेतून उतरले.{{व्यक्तिगत आरोप}} [[यशवंतराव चव्हाण]] यांच्यासारखे ज्येष्ठ नेत्याने तर ''नेहरु व संयुक्त महाराष्ट्रात ,मला नेहरु महत्त्वाचे वाटतात'' असे म्हटले. महाराष्ट्रातील कम्युनिस्ट, सोशालीस्ट व प्रजासमाजवादी पक्षातील डावे पुढारी व काँग्रेसेतरांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हातात घेतला. [[सेनापती बापट]], एस.एम.जोशी, [[प्रल्हाद केशव अत्रे]], [[श्रीपाद अमृत डांगे|श्रीपाद डांगे]], [[शाहीर अमर शेख]], [[केशव सीताराम ठाकरे|प्रबोधनकार ठाकरे]] हे चळवळीतील महत्त्वाचे नेते ठरले. [[श्रीधर माधव जोशी|एस.एम. जोशी]], [[श्रीपाद अमृत डांगे|श्रीपाद डांगे]] यांनी लढ्याचे नेतृत्व केले. अत्र्यांनी आपल्या 'मराठा' या दैनिकात संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पुरस्कार केला तर विरोधकांवर बोचरी व कठोर टीका केली. त्यांच्या भाषणातून संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणार्याचा खरपूस समाचार घेतला. [[शाहीर अमर शेख]],[[अण्णाभाऊ साठे|शाहिर अण्णाभाऊ साठे]],शाहिर गव्हाणकर ह्यांनी आपल्या कलाविष्काराने मराठी अस्मिता जागृत ठेवली.
 
२० नोव्हेंबर [[इ. स. १९५५]] [[मोरारजी देसाई]] व [[स.का.पाटील]] या काँग्रेस नेत्यांनी [[चौपाटी]]वर सभा घेऊन प्रक्षोभक विधाने केली. पाटलांनी 'पाच हजार वर्षांनी सुध्दा [[मुंबई]] महाराष्ट्राला मिळणार नाही व मोरारजींनी 'काँग्रेस जिवंत असेपर्यंत [[मुंबई]] [[महाराष्ट्र|महाराष्ट्राला]] मिळणार नाही, गुंडगिरीला योग्य जबाब मिळेल' अशी मुक्ताफळं उधळली. {{व्यक्तिगत आरोप}} लोकांनी संतापून सभा उधळली. २१ नोव्हेंबर [[इ. स. १९५५]] रोजी झालेल्या आंदोलनावेळेस पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे १५ जणांना प्राण गमवावा लागला. जाने-फेब्रु [[इ. स. १९५६]] रोजी केंद्रशासित [[मुंबई]]ची घोषणा केल्यानंतर लोक रस्त्यावर उतरली. हरताळ, सत्याग्रह व मोर्चे सुरू झाली. मोरारजीच्या सरकारने सत्तेचा दुरुपयोग करून निष्ठूरपणे ८० लोकांना गोळीबारात मारले. संयुक्त महाराष्ट्रातील आंदोलनात एकूण १०५ जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या [[फ्लोरा फाउंटन]] भागात हुतात्मा स्मारक उभारले गेले. [[संयुक्त महाराष्ट्र समिती]]ने [[दिल्ली]] येथे प्रचंड [[सत्याग्रह]] घडवून आणला.चळवळीच्या काळात जनतेच्या असंतोषामुळ, नेहरुंना महाराष्ट्रात सुरक्षारक्षकांसोबत फिरावे लागे व त्यांचे स्वागत काळ्या झेंड्यांनी व निषेधानेच होई. भारताचे अर्थमंत्री सी.डी देशमुखांनी महाराष्ट्रावरील होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ आपला राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे चळवळीला अधिक बळ मिळाले.
 
==संयुक्त महाराष्ट्राची स्थापना==
[[वर्ग:संयुक्त महाराष्ट्र चळवळ]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील चळवळी]]
[[वर्ग: निःपक्षपाती दृष्टिकोन]]
[[बदल करण्याजोगे लेख]]
 
[[en:Samyukta Maharashtra Samiti]]
२५१

संपादने