"चिंतामणी केतकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट हिंदू संत | नाव = भाऊसाहेब केतकर | चित्र = Bhausaheb Ketkar01.jpg | चित्...
 
No edit summary
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
 
<big>'''भाऊसाहेब केतकर'''</big> : (चिंतामणी केतकर) (जन्म: सन १८४७ - निधन: सन १९३९)
<br/>
[[श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज]] यांचे श्रेष्ठ शिष्य. [[तात्यासाहेब केतकर|पू. तात्यासाहेब केतकर]] यांचे वडील. प्रपंचात राहूनही श्रीमहाराजांची पूर्ण कृपा संपादन करणारा शिष्योत्तम.
----
भाऊसाहेब केतकर यांना श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रथम भेट वयाच्या पंचविसाव्या वर्षी [[गोंदवले|गोंदवल्यासच]] झाली. भाऊसाहेबांची बदली सन १८८० ते सन १८९० च्या दरम्यान [[सातार जिल्हा|सातारा जिल्ह्यात]] इंजिनिअर खात्यात झाली होती. पगार वाटण्यासाठी त्यांना दर महिना म्हसवडला जावे लागे. त्यावेळी ते रात्रीचे मुक्कामास गोंदवल्यास उतरत असत. असेच एकदा ते धर्मशाळेत उतरलेले असताना श्रीमहाराजांनी त्यांची भेट घेतली.
 
यानंतर भाऊसाहेब केतकरांना श्रीमहाराजांची भेट पंचवीस वर्षांनतर एप्रिल १९०१ मध्ये झाली. श्रीमहाराज [[श्रीब्रह्मानंद]] यांच्या विनंतीवरून बेलधडी [[कर्नाटक|(कर्नाटक)]] येथील श्रीराममंदिरात रामनवमीच्या उत्सवासाठी येणार होते. श्रीब्रह्मानंद यांची तपश्चर्या, गुरुनिष्ठा यांमुळे कर्नाटकात त्यांच्याविषयी फार आदर होता. श्रीब्रह्मानंदांचे गुरुदेव येणार होणार म्हणून मोठमोठे सरकारी अधिकारी, वकील, डॉक्टर त्यांच्या दर्शनासाठी गदग रेल्वे स्थानकावर गेले होते. त्यात भाऊसाहेबही होते. भाऊसाहेबांनी श्रीमहाराजांना ओळखले नाही. परंतु श्रीमहाराजांनीच त्यांना पूर्वीच्या भेटीची आठवण करून दिली. रामनवमीचा उत्सव झाल्यानंतर श्रीमहाराज व त्यांची शिष्यमंडळी काही दिवस गदग येथील भाऊसाहेबांच्या बंगल्यावर मुक्कामी होती.
 
भाऊसाहेबांचे चिरंजीव [[तात्यासाहेब केतकर]] यांचा विवाह गोंदवल्यासच श्रीमहाराजांच्या उपस्थितीत झाला (मार्च १९०४). सप्टेंबर १९०४ मध्ये भाऊसाहेबांनी पेंशन घेतले व श्रीमहाराजांच्या सहवासासाठी ते सहकुटुंब गोंदवल्यास येऊन राहिले. त्यांचा स्वभाव अत्यंत सौम्य होता. श्रीमहाराजांचे वचन त्यांच्यासाठी वेदवाक्य होते. श्रीमहाराजांच्या निर्याणानंतर त्यांची मनःस्थिती काही दिवस अत्यंत बेचैन झाली होती. श्रीमहाराजांच्या देहत्यागानंतर भाऊसाहेब (त्यांच्या आज्ञेनुसारच) गोंदवल्यास बारा वर्षे राहिले. सन १९३९ मध्ये त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.