"विकिपीडिया:चावडी/प्रचालकीय कामाचे मुल्यांकन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

 
::मला तरी मैहूंडॉन ह्यांच्या वक्तव्यांमध्ये काही आक्षेपार्ह वाटत नाही. बोचरे पण खरे तेच लिहिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथे खरंच उपद्रवी व निरोद्योगी पाहुण्यांचा सुळसुळाट झाला आहे. मैहूंडॉन येथे अनेक वर्षांपासून आहेत, ते मराठी विकिपीडियासाठी विशेष मेहनत घेतात असे जाणवते. असे असता निनावी किंवा खोटी अकाउंट्स पैदा करून येथे धुडघूस घालणाऱ्यांना पाहून त्यांची किंवा कोणाचीही चिडचिड झाली तर त्यात नवल काय? ज्यांना येथे मनापासून योगदान द्यायचे आहे त्यांचे स्वागतच आहे पण विनाकारण शब्दाशब्दाला वाद उकरून काढणाऱ्या व सतत राजीनामा मागत बसणाऱ्या नवीन सदस्यांबद्दलचा संयम आता संपुष्टात येऊ शकतो हेच खरे!!! - [[सदस्य:Abhijitsathe|अभिजीत साठे]] ([[सदस्य चर्चा:Abhijitsathe|चर्चा]]) २०:३४, १० ऑगस्ट २०१२ (IST)
 
::[[चित्र:Pictogram voting oppose.svg|15px]] [[सदस्य:Maihudon|Maihudon]] यांच्या राजीनाम्याच्या मागणीस माझाही तीव्र विरोध. त्यांच्या भाषेशी मी सहमत नसलो तरी त्यांच्या भावनेशी मी पूर्णपणे सहमत आहे. विकिवर प्रेम असलेल्या कुणालाही तेच वाटेल. मलाही तेच वाटते. constructive editing सोडून या भानगडी कशाला? Don यांचे योगदान बहुमुल्य आहे. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांनी ते ध्यानात घ्यावे.
::[[सदस्य:Padalkar.kshitij|क्षितिज पाडळकर]] ([[सदस्य चर्चा:Padalkar.kshitij|चर्चा]]) २३:४८, १२ ऑगस्ट २०१२ (IST)
 
===मराठी विकिपीडियाचे सर्वच प्रचालक खोटारडे आहेत काय ?===
या विकिपीडियावर एकही प्रचालक विकिपीडिया मुल्यांची बाजू घेत दुसऱ्या प्रचालकाच्या चुकीला चुक म्हणताना दिसत नाही ? येथील सर्व प्रचालक खोटाररडे आहेत का संभावित ? [[चर्चा:दारासिंग रंधावा]] येथे इतर कुणीही चुकीची भाषा वापरलेली नसताना,अभय नातूंनी, मराठी विकिपीडियावरील मजकुर इतरत्र कॉपी पेस्ट करण्यात तत्वत: काहीही वावगे नसताना ' मजकूर चोरणे, चोरताना...' इत्यादी चुकीच्या भाषेने सुरवात केली.स्वत:ची पहिली जबाबदारी मार्गदर्शकाची असता ती न निभावता व्यक्तिगत मत प्रदर्शनांचा खेळ मांडून, पत्रकारांकारांचे सोबत ट्रायल बाय विकिपीडिया प्रशासक चा अनावश्यक खेळ केला .<big> ८०००० </big> संपादन करणारी सर्वात ज्येष्ठ प्रचालक व्यक्ती सदस्यांना विकिप्पीडिया धोरणे समजावून देण्याच्या जागी विकिपीडिया धोरणांच्या बद्दल स्वत:च्या अज्ञानाचे पत्रकारांपुढे प्रदर्शन मांडते. इतर प्रचालकांकडून काय अपेक्षा कराव्यात.
४,८८५

संपादने