"गजानन महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: विशेषणे टाळा
खूणपताका: वार्तांकनशैली ?
ओळ २६:
==भक्तगण==
हरी पाटील, बंकटलाल आगरवाल, पितांबर, बाळाभाऊ प्रभू, बापुना काळे, भाऊसाहेब कवर, पुंडलीक भोकरे, बायजाबाई, भास्कर पाटील हे महाराजांचे काही श्रेष्ठ भक्त होते. बंकटलालाच्या घरून ते वेगाने निघून गेल्याने, बंकटलालाचे मन गुरुमहाराजांच्या भेटीकरिता तळमळू लागले. महाराज त्याला पुन्हा शिवमंदिराजवळ भेटले.
* '''हरी पाटील''' - हरी पाटील हे महाराजांचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि अंतरंगातील भक्त होते असे म्हणणेच सार्थ ठरेल; कारण महाराजांची गूढ भाषा केवळ त्यांनाच समजत असे. हरी पाटलांची भक्ती रांगडी होती, परिपूर्ण शुद्धता, पूर्ण समर्पण आणि अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रेमाने गाढ अशी ती भक्ती होती, तिथे दांभिकता आणि खोटेपणा ह्या गोष्टींना किंचितही थारा नव्हता. परंतु ह्या सर्व गोष्टी काही एका क्षणात घडल्या नाहीत. महाराज शेगांवात प्रकट झाल्यावेळी सर्वच पाटील बंधु अत्यंत मग्रूर आणि धनशक्तीने बेधुंद झालेले होते, सर्व प्रकारचे वैभव, धनसंपत्ती, गिरण्या पेढ्या व दुकाने असल्याकारणाने ते कोणालाही हवे ते बोलत आणि लोकही त्यांच्याशी शक्तीत तुल्यबळ नसल्याने सर्व गोष्टी शांतपणे सहन करीत. महाराजांचीही ते सर्वजण पुष्कळ चेष्टामस्करी व निंदानालस्ती करीत, परंतु महाराज अत्यंत कृपाळू असल्याने ह्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत. एकदा हरी पाटलांनी जेव्हा महाराजांना तालमीत येऊन स्वतःसोबत कुस्ती खेळण्याचे आवाहन केले त्यावेळी महाराज तालमीत जाऊन बसले आणि त्यांनी हरी पाटलाला त्यांना उठविण्यास सांगितले. नानाप्रकारचे पेच आणि सर्व ताकद वापरुनही जेव्हा हरी महाराजांना उठवू शकला नाही त्यावेळी त्याचा अहंकार नष्ट झाला आणि त्या दिवसापासून तो महाराजांना पूर्णपणे शरण गेला. जेव्हा महाराजांनी स्वतःच्या समाधीची जागा स्वतःच ठरविली त्यावेळी ते सर्व भक्तांना सोडून त्या जागी (ज्या जागेला त्यावेळी गाढवभुंकी असे म्हणत कारण त्या जागेवर कुंभारांची सर्व गाढवे चरण्यास जात असत) अचानक जाऊन बसले. भक्तांना काय करावे हे सुचेना व महाराज तर ती जागा सोडून येईनात. शेवटी त्यांनी हरी पाटलांना बोलावले. हरी पाटील जवळ जाऊन प्रेमळपणे महाराजांना म्हणाले, "महाराज, ही जागा अशुद्ध आहे, आपण मठात चलावे." त्यावर सदगुरु म्हणाले, "येथे राहील रे!" त्यावर हरी पाटलांना समजले की महाराजांनी स्वतःच्या समाधीकरिता ती जागा निवडली आहे. समाधी घेण्यापूर्वी महाराज एकदा हरी पाटलांना घेऊन पंढरपुरास गेले असता, त्यांनी स्वत:च स्वतःच्या समाधिदिनाबद्दल त्याला माहिती दिली. महाराजांच्या समाधिनंतर हरी पाटलांच्या दु:खाला पारावार राहिला नाही, म्हणूनच "श्री गजानन विजय" ह्या पोथीमध्ये छापलेल्या त्यांच्या फोटोमध्येसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर शोककळा दिसून येते. महाराजांच्या समाधिनंतर त्यांनी काही वर्षांतच म्हणजे १९१७ साली देह विसर्जित केला.
* '''बाळाभाऊ प्रभु''' - महाराजांच्या आवडत्या भक्तगणांमधील एक. बाळापुरातील आत्माराम भिकाजी ह्यांचा भाचा म्हणजेच महाराजांचे परमभक्त श्री बाळाभाऊ प्रभु होत. "उपास्यापदी भाव उपासके ठेवावा" ह्या उक्तीप्रमाणे त्यांनी त्यांचे उपास्य दैवत म्हणून गजानन महाराजांचे चरणी पूर्ण श्रद्धाभाव अर्पण केला व ते मुंबई व तेथील त्यांच्या समस्त कुटुंबीयांना सोडून कायमचेच सद्‌गुरूंच्या चरणी सेवेस सादर झाले. स्वतः महाराजांनी त्यांचा भक्तिभाव शुद्ध असल्याचे शाबीत करून भास्कर पाटील ह्याचा संशय दूर केला आणि बाळाभाऊंना स्वत़:च्या अंतरंगातील एकनिष्ठ भक्ताची जागा दिली. समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी स्वतः बाळाभाऊंचा हात धरून त्यांना स्वतःच्या गादीवर बसविले. महाराजांच्या समाधिनंतर, ज्या जागी बसून महाराजांनी संजीवन समाधि घेतली त्याच जागेवर बसून ते श्रीमद्भगवद्गीतेवर प्रवचने करीत असत, त्यावेळी देहभान हरपल्याने त्यांना देहावरील वस्त्राचेदेखिल भान राहात नसे. परंतु बाळाभाऊ हे महाराजांचे सच्चे भक्त असल्याकारणाने महाराजांच्या समाधीनंतर त्यांना ह्या भौतिक जगात आनंद वाटेना, त्यामुळे ते हळूहळू खंगू लागले आणि १९१२ साली त्यांनी कृश होऊन देह सोडला.
* '''पितांबर''' - शेगांवीचाच रहिवासी असलेला पितांबर हा महाराजांचा अत्यंत प्रेमळ, भोळा आणि कपटरहित अशा मनाचा भाविक भक्त होता. बंकटलालाने सांगितलेल्या महाराजांच्या थोरवीवर त्याचा चट्कन विश्वास बसला. इथेच त्याच्या आध्यात्मिक प्रगतिची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर जुन्या शिवमंदिरात जेव्हा टाकळीकरांचे कीर्तन होते त्यावेळी अचानक महाराजांची भेट होऊन त्याचा विश्वास अधिकच गाढ झाला. महाराजांचे सदैव ध्यान आणि नामस्मरण ह्याची फलश्रुति म्हणूनच की काय एकदा महाराजांची त्याच्यावर कृपा झाली आणि परिणामी महाराजांनी त्यास पर्यटनाला जाण्यास सांगितले. त्यानंतर अकोलीच्या शिवारातील वठलेल्या आंब्याला जेव्हा पितांबराच्या सद्गुरुभक्तीच्या प्रभावाने सर्वांदेखत हिरवी पाने फुटली तेव्हा मात्र सर्वांना त्याच्या थोरवीचा प्रत्यय आला. अजूनही अकोलीत पितांबराचा मठ आहे आणि सद्गुरूंच्या कृपेने पल्लवित झालेला आंबा अजूनही तसाच हिरवागार असून त्यास इतर आंब्यांच्या झाडांपेक्षा जास्ती फळे येतात. पितांबराचा अंतदेखील अकोलीतच झाला. पितांबराच्या जीवनाचा आढावा घेता असे दिसून येते की सद्गुरूंची आज्ञा पालन करणे हेच त्याच्या श्रेष्ठ गुरुभक्तीचे मुख्य लक्षण होते.
* '''श्रीधर गोविंद काळे''' - श्रीधर गोविंद काळे हे मॅट्रिकनंतर इंटरला नापास झाल्याने वर्तमानपत्रे वाचीत वेळ घालवीत असताना त्यांनी टोगो आणि यामा ह्या जपानी व्यक्तींच्या जीवनचरित्राविषयी वाचले. आपणही मायदेश सोडून विलायतेला जाऊन नाव आणि पैसा कमवावा असे त्यांना वाटू लागले. परंतु पैशाची व्यवस्था होईना त्यामुळे ते निराश झाले आणि कोल्हापूरला जाताना वाटेवर शेगांवला थांबून महाराजांना भेटायला गेले असताना सर्वज्ञ असलेल्या महाराजांनी त्यांचे मनोगत जाणले आणि परदेशी जाण्यापासून त्यांना परावृत्त केले. सरतेशेवटी महाराज त्याला म्हणाले, "कोठे न आता जाई येई|." त्यानंतर महाराजांच्या कृपेने त्याची उत्तम भौतिक प्रगति झाली. त्याचवेळी महाराजांनी त्यांना बहुमोल उपदेश दिला की अतिशय पुण्य केल्याखेरीज भारतात जन्म होत नाही आणि योगापेक्षा अध्यात्मविचार श्रेष्ठ आहे. महाराजांच्या आशीर्वादाने ते बी.ए.एम्.ए. झाले आणि त्यांना शिंद्यांच्या राज्यातील शिवपुरी कॉलेजमध्ये प्रिन्सिपालच्या जागी नेमले गेले.