"मोहम्मद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: co:Magumetu
छोNo edit summary
ओळ २८:
मदिनेस पोहचल्यानंतर मोहम्मदांची व मुस्लिमांची शक्ती वाढू लागली. मक्केतील जाचाला कंटाळून इतरत्र गेलेले मुसलमानही मदिनेस परतू लागले. मोहम्मदांनी मदिनेतील [[ज्यू धर्म|यहुदी]] व इतर गटांसोबत जवळीक साधत आपली राजकीय शक्ती वाढवली. मोहम्मदांच्या या वाढत्या शक्तीला आळा घालण्यासाठी मक्केतील त्यांच्या विरोधकांनी तीन वेळा मदिनेवर हल्ला केला. ह्या तीन लढाया [[बद्रची लढाई]], [[उहूदची लढाई]], आणि [[अहजाबची लढाई]] (खंदकाची लढाई) या नावांनी ओळखल्या जातात. या तीनही लढायांमध्ये मोहम्मदांनी विरोधकांचा पराभव केला.
 
या लढायांतील विजयानंतर मोहम्मदांनी आपल्या १४०० सहकार्‍यांसमवेतसहकाऱ्यांसमवेत मक्का येथे [[हज यात्रा|हज यात्रेस]] जाण्याचा संकल्प केला. मक्केतील त्यांच्या विरोधकांनी त्यांना मक्केबाहेरच थांबवण्याची योजना आखली. मोहम्मदांनी हुदैबिया या ठिकाणी तळ टाकून आपल्या दुतासोबत संदेश पाठवला की त्यांचा उद्देश लढाईचा नसून हज यात्रेचा आहे. या ठिकाणी हिजरी ६ ([[इ.स. ६२८]]) मध्ये मोहम्मद आणि त्यांच्या विरोधकांमध्ये तह झाला. हा तह [[हुदैबियाचा तह]] म्हणून ओळखला जातो. या तहान्वये ठरले की मोहम्मदांनी यावेळी परत जावे व पुढच्या वर्षी हजसाठी यावे. मोहम्मदांनी हा तह मान्य केला.
 
मध्यंतरीच्या काळात मदिनेतील मुसलमानांचे तेथील यहुद्यांसोबत संबंध बिघडत गेले. अहजाबच्या लढाईपासूनच त्यांच्या संबंधात कटूता आली होती. मोहम्मदांनी यहुद्यांना मदिनेबाहेर निघून जाण्याचा आदेश दिला. त्यानंतर ते खैबर या ठिकाणी जावून वसले, परंतु तिथेही मोहम्मदांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा पराभव केला व तो प्रदेश इस्लामी राज्यास मिळवला.
 
== मक्केवर विजय व शेवटची हज यात्रा ==
हुदैबियाच्या तहानंतर दोनच वर्षांनी मक्केतील कुरैश लोकांनी मुसलमानांसोबत केलेला करार मोडला. त्यामुळे हिजरी ८ ([[इ.स. ६२८]]) मध्ये मोहम्मदांनी १०,००० सहकार्‍यांनासहकाऱ्यांना घेवून मक्केवर स्वारी केली. या युद्धात मोहम्मदांचा विजय झाला. या विजयानंतर मक्केतील लोकांचे गटचे गट इस्लामचा स्विकार करू लागले.
 
सन १० हिजरी मध्ये मोहम्मदांनी एक लाखाहून अधिक मुसलमान अनुयायांसमवेत हजची यात्रा केली. ही त्यांची शेवटची हज यात्रा ठरली. यावेळी त्यांनी "खुत्ब-ए-हज्जतुल विदा" हे प्रसिद्ध भाषण केले. त्यात त्यांनी सांगितले:
ओळ ४५:
 
== प्रभाव ==
मोहम्मचांच्या केवळ २३ वर्षांच्या प्रयत्नांनी अरबस्तानमध्ये मोठा बदल घडवून आणला. लूटमार व अनिश्चिततेचे जीवन जगत असणार्‍याअसणाऱ्या अरब समाजाला त्यांनी एक नवीन मार्ग उपलब्ध करून दिला. मुर्तिपुजेचा बोलबाला नष्ट होऊन अरब लोक [[एकेश्वरवाद]] मानू लागले.
 
पण याहीपेक्षा मोहम्मदांच्या आयुष्याचे व त्यांच्या शिकवणुकीचे दुरगामी परिणाम अधिक महत्त्वपुर्ण ठरतात. त्यांच्या शिकवणुकीने अरब समाजाला एक आत्मविश्वास प्राप्त झाला. या आत्मविश्वासाच्या बळावरच आपापसात लढणारे अरब बाहेरचे जग जिंकायला निघाले. मोहम्मदांच्या मृत्यूनंतर जवळपास १०० वर्षांच्या आतच अरबांचे साम्राज्य पश्चिमेस दक्षिण [[फ्रान्स|फ्रांस]] व [[स्पेन]]पासून संपुर्ण उत्तर [[आफ्रिका]] व्यापत [[सुएझ]]पर्यंत आणि अरबस्तान व पर्शियापासून मध्य आशियात [[मंगोलिया]]पर्यंत पसरले.<ref>{{स्रोत पुस्तक |शीर्षक=Glimpses of World History |आडनाव=Nehru |पहिलेनाव=Jawaharlal |वर्ष=1989 |प्रकाशक=Nehru Memorial Fund |पृष्ठे=141-146}}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/मोहम्मद" पासून हुडकले