"वामन गोपाळ जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१५ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
जोशी मूळचे [[समशेरपूर]]चे होते. त्यांचे शिक्षण मराठी सातवीपर्यंत झाले होते. शिक्षणासाठी [[नाशिक]]ला गेले असतांना त्यांची गाठ तिथल्या गुप्त क्रांतिकारकांशी पडली, आणि वामनराव जोश्यांनी देशसेवेचा विडा उचलला. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी स्वदेशी आणि बहिष्काराची शपथ घेतली. त्यातूनच बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. [[अहमदनगर]] शहरातील गुजर गल्लीत बाँब बनविण्याचे प्रशिक्षण देण्याचे कामही त्यांनी सुरू केले.
 
[[अनंत कान्हेरे]], वामनराव जोशी व त्यांच्या सहकार्‍यांनीसहकाऱ्यांनी इंग्रज कलेक्टर जॅक्सनच्या खुनाची योजना आखली. [[२३ डिसेंबर]], [[इ.स. १९०९]] रोजी जॅक्सनवर गोळ्या झाडून त्याचा खून केला. या प्रकरणी इंग्रजांनी ७ आरोपींवर खटला चालविला. यातआरोपींत त्यावेळी [[अकोला|अकोल्यात]] असलेले वामनराव जोशी हे एक होते. त्यांना २५ वर्षाच्या जन्मठेपेची शिक्षा झाली. मे, [[इ.स. १९२२]] मध्ये त्यांची सुटका झाली. परंतु स्वस्थ न बसता ते इ.स. १९३० च्या ''[[जंगल सत्याग्रह|जंगल सत्याग्रहात]]'' अग्रभागी राहिले. [[महात्मा गांधी|महात्मा गांधींच्या]] चळवळीतही त्यांचा सहभाग होता. स्वातंत्र्योत्तर काळात हलाखीची आर्थिक स्थिती असताना इ.स. १९५६ साली भारत सरकारने स्वदेशसेवेसाठी त्यांना ४,५०० रुपये इतके मानधन दिले होते. तेही त्यांनी निस्पृहपणे शासनाला परत केले होते.
 
त्यांच्या ''राक्षसी महत्त्वाकांक्षा'' या नाटकावर ब्रिटिश भारतीय शासनाने बंदी घातली होती.
 
आयुष्याच्या उत्तरार्धात ते [[अमरावती]]ला स्थायिक झाले होते.
 
== प्रकाशित साहित्य ==
५७,२९९

संपादने