"गोंदिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५२:
या शहराचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे, रोजगार व व्यापारासाठी आलेल्या समूहांना या शहराने कायम आपलेसे केले. त्यांना आश्रयही दिला. म्हणूनच आज या शहराच्या बहुतांश आर्थिक नाडय़ा याच स्थलांतरितांच्या हातात सामावलेल्या आहेत. शहर छोटे आणि मनमिळाऊ संस्कृतीमुळेच या शहराला कधीही दंगलीचे गालबोट लागले नाही. मोहन महाराज पेढेवाले व लालजी भाईच्या समोस्याचे दुकान, नक्काभाई सोनी, धन्नालाल मोहनलाल तिवारी हे स्टीलचे दुकान, खिल्लुमल तालेवाला, दिल्ली हॉटेल हे एकेकाळी शहरातील प्रसिद्ध ठिकाणे होती. आज यासारखी दुकाने वाढली असली तरी त्यांची महिमा अजूनही जशीच्या तशीच असून ही दुकाने त्यांच्या वारसदारांच्या हाती आहेत.
 
=='''नगरपरिषद''' ==
 
गोंदिया नगर परिषदेची स्थापना सन १९२0 मध्ये करण्यात आली आणि येथूनच पुढे गोंदिया नगर परिषदेची वाटचाल सुरू झाली. सुरुवातीला १0 असलेल्या नगरसेवकांची संख्या आता ४0 वर पोहोचली आहे.
ओळ ६१:
नगर परिषदेत आतापर्यंत २0 नगराध्यक्ष झाले असून १३ वेळा प्रशासकांनी न.प.चे कामकाज सांभाळले आहे. सर्वाधिक काळ नगराध्यक्ष राहण्याचा मान स्व. मनोहरभाई पटेल यांना मिळाला. त्यांच्यापाठोपाठ रामनाथ आसेकर यांनी ११ वर्षे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. तर सर्वांत कमी काळ नगराध्यक्षपदी सविता इसरका राहिल्या.
 
== '''भूगोल व हवामान''' ==
'''गोंदिया''' शहर महाराष्ट्रात अगदी ईशान्येकडे आहे.
 
ओळ ९३:
 
 
=='''शिक्षण''' ==
गोंदिया शहर शैक्षणिक क्षेत्रातील अग्रणी म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. मनोहरभाई पटेल यांनी शिक्षणक्षेत्रात विणलेले जाळे हा विसाव्या शतकातील लक्षणीय बदल म्हणावा लागेल. जगत शिक्षण संस्था, दिवं देवाजी बुद्धे शिक्षण संस्था, पंजाबी शिक्षण संस्था अशी गोंदियात अनेक संस्था जन्माला आल्या आणि त्यांनी त्यांच्या कार्याने स्वतंत्र ओळख निर्माण केली. गोंदियाचे हे संचित आहे. जुन्या नावाजलेल्या काही शाळांची पार रया गेली. जुन्या काळातील जे.एम. हायस्कूल, हिंदी टाऊन प्राथमिक शाळा, सुभाष प्राथमिक शाळा, लोकोशेड प्राथमिक शाळा, धन्नालाल मोहनलाल नगरपालिका प्राथमिक शाळा, माताटोली प्राथमिक शाळा, मरारटोली प्राथमिक शाळा या शाळांना आता विद्यार्थी मिळेनासे झालेले आहेत. विकासांच्या गतीत फोफावलेली कॉन्व्हेंट संस्कृतीने त्यांची जागा घेतली आहे. विद्यार्थ्यांची पहिली पसंती मिळते ती विवेक मंदिर, गोंदिया पब्लिक स्कूल, सेंट झेवियर्स स्कूल, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट, गुरूनानक प्राथमिक शाळा, गणेशन कॉन्व्हेंट, साकेत पब्लिक स्कूल आदी शाळांना मिळत आहे.
===काही महत्त्वाच्या शिक्षण संस्था===
ओळ ११८:
ऑफ एवहिएशन तेक्नालाजी अन म्यानेज्मेंत.
 
=='''पर्यटनस्थळे'''==
[[चित्र:bodalkasa.jpg]]
<br>नागरा
ओळ १२७:
नागझिरा महाराष्ट्रातील एक जुनं अभयारण्य आहे. एकोणीसशे सत्तरमध्ये या वनक्षेत्राला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं. त्यानंतरच्या चाळीस वर्षांत घेतलेल्या काळजीमुळे आज नागझिऱ्याचं जंगल खऱ्या अर्थानं फोफावलेलं आहे आणि भारतातील एक उत्कृष्ट अभयारण्य म्हणून ओळखलं जात आहे. या अरण्याचं क्षेत्र सुमारे 153 कि.मी. असून, हे अरण्य दक्षिण उष्णकटिबंधीय, शुष्क पानगळीचं जंगल आहे. येथील घनदाट वृक्षराजीमध्ये कमालीचं वैविध्य आहे. यामध्ये साग, ऐन, बीजा, साजा, तिवस, धावडा, हलदू, अर्जुन, बेहडा, तेंदू, सेमल, जांभूळ, चारोळी, आवळा, कुसुम अशी उंचच उंच वाढणारी आणि घनदाट पानोरा असणारी झाडं आहेत. गुळवेल, पळसवेल, कांचनवेल, काचकरी, चिलाटी अशा वेलींच्या प्रजाती वृक्षांना लगटून फोफावलेल्या आहेत. विविध प्रकारचे बांबू आणि वेगवेगळे गवत यांच्यामुळे भूभाग आच्छादित असतो. त्यामुळेच हे जंगल सर्व प्रकारच्या वन्य पशू-पक्ष्यांसाठी जणू नंदनवनच ठरते. विविध प्रकारचे वन्य पशू, सरपटणारे प्राणी, पक्षी आणि फुलपाखरं इथं पाहायला मिळतात. सस्तन प्राण्यांपैकी वाघ, बिबटे, रानगवे, सांबर, चितळ, नीलगाय, अस्वल, चांदी अस्वल, रानकुत्रे, डुक्कर, चौसिंगा, तरस, कोल्हा, लांडगा, साळिंदर, उडणारी खार, खवल्या मांजर इत्यादी प्राणी इथं मोठ्या संख्येनं पाहायला मिळतात.
 
== '''लोकजीवन व संस्कृती'''==
मराठी ही आपली राज्यभाषा असली तरी, गोंदिया शहर मध्यप्रदेशपासून फक्त २० किलोमीटर अंतरावर असल्याने, गोंदियामध्ये जास्त बोलली जाणारी भाषा हिंदी आहे, गोंदियात घरी जरी मराठी बोलत असले तरी गोंदियाच्या बाजारात फिरल्यावर ही बाब लक्षात येते. गोंदियाला हिंदी भाषिक तालुका पण म्हणतात. शहरातील इतर भाषा इंग्रजी आहे. शहरात गुजराती आणि सिंधी लोकवस्ती उल्लेखनीय प्रमाणात आहे, त्यामुळे गुजराती आणि सिंधी ह्या भाषांचा पण वापर होतो.
</br>
ओळ १५१:
नाटय़क्षेत्रातही गोंदियाचे योगदान उल्लेखनीय ठरावे. स्वातंत्र्यपूर्वकाळात कन्हारटोली परिसरातील भवभूती रंग मंदिर, गुर्जर क्षत्रिय समाजवाडी आदी उभारण्यात आले. हिंदीभाषिक लोकांची वाढती लोकसंख्यामुळे या नाटय़गृहात होणाऱ्या मराठी नाटकांना अवकळा आली. बदलत्या काळासोबत हे शहर सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात दिवसेंदिवस समृद्ध व प्रगल्भ होत गेले. शास्त्रीय गायन, साहित्य संमेलने, विविध कार्यक्रमांची रेलचेल सतत वाढत गेली. यात प्रामुख्याने हातभार लावला तो दिवं. मनोहरभाई पटेल, दिवं. शंकरलाल अग्रवाल यांनी.
 
=='''प्रमुख स्थळे'''==
 
=='''अर्थव्यवस्था'''==
 
== '''वाहतूक व्यवस्था'''==
 
मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ या शहराजवळून जात असल्यामुळे दळणवळणाच्या पुष्कळ सोयी गोंदिया शहरात उपलब्ध झाल्या. त्यामुळे जिल्ह्य़ाच्या विकासाला चालना मिळत असली तरी अद्यापही हे शहर मागासलेलेच गणले जाते. गोंदियाजवळील भाग वन आणि निसर्गसंपदेने परिपूर्ण नटलेला आहे. या शहराचे वैशिष्टय म्हणजे, हे शहर इंग्रजांनी सुरू केलेल्या मुंबई-कोलकाता या पश्चिम-पूर्व महत्त्वाच्या रेल्वे लाईनवर आहे. त्यामुळे या शहराची दोन भागात विभागणी होते.
ओळ १६६:
गोंदियाजवळचे बिरसी येथील छोटे विमानतळ स्वातंत्र्यापूर्वीपासून कार्यरत होते. इंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी या धावपट्टीची बांधणी केली. मध्यंतरीच्या काळात, स्वातंत्र्यानंतर या धावपट्टीचा वापर बंद झाला होता. अलीकडे राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे बिरसी धावपट्टीचा विकास करून परीक्षणाचे काम शासनाने महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे १९८८ पासून २००५ पर्यंत सोपवले होते. त्या काळात एम.आय.डी.सी.तर्फे केवळ हवाई धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीची कामे पाहिली जात. त्यावेळेस या धावपट्टीवर लहान व मध्यम आकाराचे नॉन-इस्ट्रुमेंटल विमान केवळ दिवसाच उतरू शकत होते. अलीकडे म्हणजे जानेवारी २००६ च्या सुरुवातीपासून बिरसी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ३२१.५४ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण केले. त्यासाठी ही जमीन भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे सोपवण्यात आली. सध्या प्राधिकरणातर्फे बिरसी विमानतळाचा विकास वेगाने सुरू आहे. तसेच, या परिसरात नव्याने एअर ट्राफिक कंट्रोलची उभारणी करण्यात आली असून तेथे अत्याधुनिक यंत्रसामुग्री बसवण्यात आलेली आहे. यामुळे आता अन्य विमानतळाप्रमाणे बिरसी येथे रात्रीसुद्धा विमानाची ये-जा शक्य होऊ लागली आहे.
 
== '''विश्रामगृह व हॉटेल्स'''==
 
 
 
Line १७९ ⟶ १८०:
 
 
'''गोंदिया''' शहर हे [[गोंदिया जिल्हा|गोंदिया जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे.शहरात अनेक भातसडीचे उद्योग (rice mills) व काही तंबाखूचे छोटे उद्योगधंदे आहेत.
 
'''हे सुध्दा पहा'''
"https://mr.wikipedia.org/wiki/गोंदिया" पासून हुडकले