"प्रजननसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: '''प्रजजन''' सजीवाच्या एका पिढीतून दुस-या पिढीमधील जननिक तत्वांचे ...)
 
सजीवाच्या एका पिढीतून दुस-या पिढीमधील जननिक तत्वांचे “जनुकीय द्रव्याचे” होणारे संक्रमणम्हणजे प्रजनन. प्रत्येक सजीवाचा आयु:काल मर्यादित असतो. सजीव आयु:कालामध्ये जन्म, वृद्धि, विकास आणि मृत्यू अशा अवस्थेतून जातो. वृद्धिअवस्था एका ठराविक मर्यादेपर्यंत पोहोचल्यानंतर सजीव प्रजननक्षम होतो.
 
प्रजनन अलैंगिक आणि लैंगिक या दोन प्रकाराने होते.
अलैंगिक प्रजनन ही प्रजननाची प्राथमिक अवस्था आहे. अलैंगिक प्रजननाचे काहीं प्रकार म्हणजे विखंडन, बहुविखंडन, मुकुलायन, अनिषेकजनन, खंडीभवन, बीजाणूनिर्मिती, आणि शाकीय प्रजजन. किण्व, यकृतका, पानफुटी, वनस्पतीमधील शाकीय पुनुरात्पादन, अमीबा, पॅरामेशियम मधील द्विखंडीय विभाजन ही अलैंगिक प्रजननाची उदाहरणे आहेत. एकपेशीय सजीवामध्ये बहुघा अलैंगिक प्रजनन होते. अलैंगिक प्रजननामध्ये युग्मक निर्मिती होत नाही. जिवाणू, कवके आणि काहीं वनस्पति यांच्यामध्ये अलैंगिक पुनुरुत्पादन होते. अलैंगिक प्रजननामध्ये प्रत्येक जीव जननक्षम असतो. त्यामुळे प्रजनन दर वाढतो. मात्र पिढ्यानपिढ्या होणा-या अलैंगिक प्रजननामुळे त्या जीवाच्या जाति वैशिष्ठ्यांमध्ये बदल होण्याची क्षमता खुंटते.
 
१५५

संपादने