"प्लांट्‌स व्हर्सेस झोम्बीज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Czeror (चर्चा | योगदान)
निनावी (चर्चा)यांची आवृत्ती 1020034 परतवली.
Czeror (चर्चा | योगदान)
ओळ ४४:
बहुतेक झाडे एकाच आडव्या पट्टीत मारा करतात किंवा मारा थोपवून धरतात. पुढील पातळ्यांमध्ये (लेव्हल्स) खेळाडू नवीन झाडे क्रेझी डेव्हच्या आभासी दुकानातून विकत घेऊ शकतात. विकत घेण्यासाठी लागणारे आभासी पैसे झोम्बींना मारुन व "झेन गार्डन" मधील झाडे विकून मिळू शकतात.
 
खेळाडू पातळी मर्यादित झाडांच्या बियांसह खेळ सुरू करतो. ही मर्यादा आभासी पैसे देऊन वाढवता येते. प्रत्येक पातळीच्या सुरुवातीला खेळाडूला आक्रमण करणार्‍या झोम्बींचे प्रकार दाखवले जातात व त्यांच्याविरुद्ध लागणारी झाडे खेळाडूला निवडता येतात. कवक दिवसा झोपतात, त्यामुळे त्यांना "कॉफी बीन" नावाचे झाड वापरुन उठवावे लागते. कवक त्यांच्या कमी सूर्यकिंमतीमुळे रात्रील्यारात्रीच्या पातळ्यांसाठी आदर्श असतात. काही झाडे काही झोम्बींविरुद्ध वापरण्यासाठी उत्कृष्ट असतात, जसे की मॅग्नेट-श्रूम (चुंबक-कवक) हे बकेटहेड झोम्बी, लॅडर झोम्बी व फुटबॉल झोम्बी यांच्याकडील धातूच्या वस्तू (लोखंडी बादली, फुटबॉल शिरस्त्राण व शिडी) काढून घेऊन त्यांची शक्ती कमी करते.
 
झोम्बींचेही अनेक प्रकार असून त्यांच्या विशेषता, गती, कठीणता व आक्रमण करण्याची शक्ती वेगवेगळ्या असतात. डॉल्फिन रायडर झोम्बी हा सर्वांत गतिमान तर डॉक्टर झोम्बॉस हा सर्वांत जास्त टिकाव धरण्याची क्षमता असलेला झोम्बी आहे. काही झोम्बी त्यांच्याजवळील उपकरणांच्या सहाय्याने झाडांवरुन उड्या मारु व उडू शकतात. डिगर झोम्बी हा झाडांखाली खोदत दुसर्‍या टोकाशी जाऊ शकतो. जुन्या आवृत्तीत [[मायकेल जॅक्सन]]शी साधर्म्य असलेला डान्सिंग झोम्बी असून तो जमिनीतून झोम्बी बोलावू शकतो. नव्या आवृत्तीत त्याचा चेहरामोहरा बदलण्यात आला आहे. काही विशिष्ट प्रसंगी खेळाडूला झोम्बींचा प्रचंड समुदाय चाल करून येत असल्याचे सांगितले जाते. काही झोम्बींचे "गीगा" (अधिक शक्तिशाली) प्रकार असून त्यांची टिकाव धरण्याची शक्ती जास्त असते. जसे की: फुटबॉल झोम्बी व गार्गान्ट्युअर. एक झाम्बोनी चालवणारा झोम्बी, झोम्बॉनी हाही या खेळात आहे.