"पाळीव प्राणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४:
 
शोभेची झाडे किंवा वनस्पति. फक्त चांगल्या दिसताहेत अशा वनस्पतिना ऑर्नॅमेंटल प्लांटस म्हणतात. गुलाब, क्रोटॉन, जास्वंद, फुलझाडे,पाने चांगली दिसतात,फुले नाजूक विविध रंगाची दिसतात म्हणून लावलेली अनेक झुडुपे, रोपे यांची मोठी यादी झालेली आहे. बागा आणि उद्याने येथे केवळ शोभेची लावलेली झाडे म्हणजे वनस्पति संवर्धन. इंग्रजीमध्ये पशुपालन यासारखा वनस्पतीच्या बाबतीतील शब्दआहे ‘cultigen’. मराठीमध्ये यासाठी ‘संवर्धित वनस्पति’ अशा शब्द वापरता येईल. संवर्धित वनस्पति आणि वन्य जाति यामध्ये संवर्धन केल्याने फार बदल झालेला नाही. प्राणी पाळताना ते कशासाठी पाळले आहेत यावरून त्यंच्यामध्ये सूक्ष्म फरक पडतो. केवळ सोबतीसाठी पाळलेले प्राणी म्हणजे ‘पेट’.अन्न आणि वाहतूक किंवा कामासाठी पाळलेले प्राणी ‘लाइव्ह स्टॉक’ किंवा कृषि वापराचे पशु 'पशुपालन'.
 
''''''प्राणी पालनाची पार्श्वभूमि''''''
डार्विनच्या म्हणण्याप्रमाणे दररोजच्या मानव आणि त्याच्यासभोवतीलचे प्राणी यांच्यामधील संपर्कामुळे प्राणी पालनाचा प्रारंभ चालू झाला. मानवी हस्तक्षेपामुळे त्याच्या देखरेखीखाली संपर्कात आलेल्या प्राण्यांचा संकर घडवून आणल्यामुळे प्राणीपालनाचा प्रारंभ झाला. निसर्ग निवड आणि कृत्रिम निवड यामध्ये कृत्रिम निवडीचे तंत्र तयार झाल्याने प्राणी पालनामुळे अपेक्षित बदल असलेली संतति जोपासणे याची खात्री निर्माण झाली. अशा प्रकाराचे उत्तम उदाहरण गव्हाचे आहे. वन्य गहू बियाणे तयार झाले म्ह्णजे . गव्हाच्या या ओंबीमधील दाणे तयार झाल्यानंतर जमिनीवर वितरित होत नाहीत. गहू लागवडीमागे परस्पर झालेले हे उत्परिवर्तन (म्यूटेशन) कारणीभूत आहे. शेती करताना या उत्परिवर्तनाचा उपयोग करण्यात आला. परिणाम संवर्धित पीक.
केवळ नैसर्गिक उत्परिवर्तन हेच संवर्धित पिकाचे उदाहरण नाही . अनेक वेळा मानवी हस्तक्षेप केल्याने कृत्रिम निवड करून इच्छित वाण निर्माण झाले आहेत. लांडग्यांच्या कळपामधील काहीं कमी हिंस्र लांडगे मानवी वस्त्याजवळ आल्याने माणूस आणि लांड्गे यांच्या साहचर्यामुळे आजच्या पाळीव कुत्र्यांची प्रजाती तयार झाली. अनेक पिढ्यांच्या साहचर्याने हे घडले आहे. मानवी वस्त्याजवळ आलेले लांडगे शिकारीनंतर फेकून दिलेला भाग खाऊन मोठे झाल्यानंतर त्यांची पिले आपापल्या कुटुंबाबरोबर मानवी संपर्कात येत राहिली. निश्चित खाद्य मिळते हे समजल्यावर लांदग्यानी उपजत प्रेरणेमुळे जेथे वसती आहे तेथे राहणे पसंत केले. आजच्या कुत्र्यांचे हे पूर्वज हळू हळू मानवावर अधिक अवलंबून राहू लागले. धोक्याची सूचना देणे, शिकारीस मदत करणे, वासावरून शिकारीचा माग काढणे ही लांडग्यांची उपजत प्रेरणा .त्याच्या बदल्यात इतर हिंस्र प्राण्यापासून संरक्षण, निवार्याची ऊब आणि अन्न हे मानवापासून लांडग्यास मिळाल्याने तीस हजार ते दहा हजार वर्षापासूनचा कुत्रा आणि माणूस यांचे सहजीवन निर्माण झाले. कुत्रा आता वन्य प्राण्यांच्या समवेत राहण्याचे कौशल्य हरवून बसला आहे. ढोल हा रानटी कुत्रा आजही माणसाच्या सहवासात येणे टाळतो. आजच्या काळात परस्परावर अवलंबून असलेल्या लांडगा आणि माणूस लांडगा आणि पाळीव कुत्रा या सह जाती आहेत (सब स्पेसीज )
'''प्राणी पालन प्रयोग :'''
अगदी अलीकडे नियोजनपूर्वक निपज करून प्राणी पालन कसे करता येते याचा एक प्रयोग करून पाहण्यात आला. 1950 मध्ये एका रशियन दिमित्री के बेल्याएव या शास्त्रज्ञाने सिल्वर फॉक्स (Vulpes vulpes) चे जाणीवपूर्वक प्रजनन करण्याचे ठरवले. प्रजननासाठी जे कोल्हे माणसास ना घाबरता माणसाच्या जवळ येतील अशांची निवड केली. काहीं पिढ्यामध्ये त्यानी आणि त्यांच्या सहकार्यानी वाढवलेल्या राखाडी कोल्ह्यांचा समूह रानटी तांबड्या कोल्ह्याहून सर्वस्वी वेगळा असल्याचे दिसले. माणूस जवळ आल्यानंतर ते शेपूट हलवून त्यांची काळजी घेणार्याचे हात चाटत. लहान कवटी, वळलेली शेपूट, आणि खाली पडलेले कान ही कुत्र्यामधील सर्व वैशिष्ठ्ये त्यांच्या मध्ये दिसायला लागली.