"पाळीव प्राणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ९:
'''प्राणी पालन प्रयोग :'''
अगदी अलीकडे नियोजनपूर्वक निपज करून प्राणी पालन कसे करता येते याचा एक प्रयोग करून पाहण्यात आला. 1950 मध्ये एका रशियन दिमित्री के बेल्याएव या शास्त्रज्ञाने सिल्वर फॉक्स (Vulpes vulpes) चे जाणीवपूर्वक प्रजनन करण्याचे ठरवले. प्रजननासाठी जे कोल्हे माणसास ना घाबरता माणसाच्या जवळ येतील अशांची निवड केली. काहीं पिढ्यामध्ये त्यानी आणि त्यांच्या सहकार्यानी वाढवलेल्या राखाडी कोल्ह्यांचा समूह रानटी तांबड्या कोल्ह्याहून सर्वस्वी वेगळा असल्याचे दिसले. माणूस जवळ आल्यानंतर ते शेपूट हलवून त्यांची काळजी घेणार्याचे हात चाटत. लहान कवटी, वळलेली शेपूट, आणि खाली पडलेले कान ही कुत्र्यामधील सर्व वैशिष्ठ्ये त्यांच्या मध्ये दिसायला लागली.
हा प्रयोग यशस्वी जरी झालेला असता तरी मानवी सान्निध्यात प्रजनन केल्यांतर प्राणी प्रत्येक वेळी माणसाळेलच असे नाही. वन्य अनेक प्राण्याना माणसाळवण्याचे प्रयोग अयशस्वी झाले आहेत. झेब्रा हे त्याचे उदाहरण . घोडा, गाढव आणि झेब्रा हे तीनही प्राणी इक्विडी कुलातील आहेत. या पैकी फक्त घोडा आणि गाढव या दोनच प्रजाती माणसाळल्या. झेब्र्याचा संकर गाढव आणी घोडा या दोन्ही प्राण्याबरोबर होतो. पण झेब्रा मानवी वस्तीजवळ येतसुद्द्धा नाही. मानवी इतिहासात आशियायी हत्ती, घोडा ,गायबैल, शेळी मेंढी, रेशीम कीटक, डुक्कर, रेडा, म्हैस,लामा, एक आणि दोन वशिंडांचा उंट, याक आणि रेनडियर एवधेच प्राणी माणसाळवण्याचे श्रेय माणसास आहे.
'''प्राणी पाळण्यासाठीची सहा वैशिष्ठ्ये'''
1. बदलते अन्न: ज्या प्राण्यांचे अन्न पूर्णपणे वेगळे आहे असे प्राणी पाळता येत नाहीत. उदाहरणार्थ बेडूक. बेडूक फक्त जिवंत किडे खात असल्याने त्याला कृत्रिमरीत्या अन्न देता येत नाही. या उलट मका, गहू, यांच्या मानवी वापराच्या भागाशिवायचा अवशिष्ट भाग, ज्वारीचा कडबा, गवत अशावर अवलंबून असलेले प्राणी पाळण्यास अधिक योग्य. कुत्रा प्रत्यक्षात मांसभक्षी असला तरी आपण शिजवलेल्या अन्नामधील भाग तो सहज खातो. असे प्राणी पाळण्यासाठी फार खर्च येत नाही.
Line १७ ⟶ १८:
5. क्षोभक स्वभाव: बरेच वन्य प्राणी पकडून एकत्र किंवा संरक्षित क्षेत्रामध्ये ठेवल्यास जेंव्हा संधी मिळेल तेंव्हा पळून जाण्याचा प्रयत्न करतात. गॅझेल (चिंकारा) जातीचे हरीण भली मोठी उडी मारून कुंपणावरून पसार होते. पाळीव मेंढी त्याच्या क्षेत्रामध्ये इतर प्राणी आल्यास त्वरित गोंधळ घालते. तरीपण मेंढ्या आणि शेळ्यामध्ये कळप प्रवृत्ति असल्याने एकत्र राहतात. त्याना पाळणारा माणूस किंवा कुत्रा यांच्या संगतीमध्ये एकत्र राहण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्याना पाळणे सोपे होते.
6. समाजप्रिय प्राणी आपापल्या क्षेत्रातील नायकाचे नेतृत्व मान्य करतात. त्यामुळे थोड्याच दिवसात पाळणाऱ्या माणसाच्या नेतृत्वाखाली राहणे त्याना जमते. उदाहरणार्थ घोडा.
वरील यादी मर्यादित आहे. कारण पाळीव प्राण्याच्या जातीवर होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांचा यामध्ये विचार केलेला नाही. पोपट, व्हेल आणि बहुतेक मांसभक्षी प्राणी बंदिस्त जागेमध्ये जन्मले आणि सांभाळले तरी त्यांच्यामधील वन्य उपजतप्रेरणा नष्ट होत नाही. वन्य प्राणी निसर्गत: भित्र्या स्वभावाचे असतात. स्वतःचे संरक्षण ही त्यांची उपजत प्रेरणा असते. याचे कारण त्याना त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये असणारा इतर शत्रूपासून धोका. पाळीव प्राण्यामध्ये ही उपजतप्रेरणा नाही. त्याना माणसाने शत्रूपासून दिलेल्या संरक्षणामुळे पाळीव प्राण्यामधील भित्रेपणा संपलेला आहे. तरी पण काहीं पाळीव प्राण्यामध्ये संकटात सापडल्यानंतर प्रतिकार करणे टिकून राहिलेले आहे. पाळीव म्हैस किंवा रेडा सिंहाचा चांगलाच प्रतिकार करतो. वेळ प्रसंगी रेड्याने आफ्रिकन सिंहाला ठार केल्याची उदाहरणे आहेत. अन्न आणि पाण्याच्या शोधात पाळीव प्राण्याना भटकावे लागत नाही. मार्कसन बेटस या प्राणिशास्त्रज्ञाने 1960 मध्ये लिहिलेल्या पुस्तकामध्ये पाळीव प्राण्यामध्ये झालेल्या जाति बदलावर एक प्रकरण लिहिलेले आहे. कोंबडीची उडण्याची शक्ती नष्ट झाली आहे. बहुतेक पाळीव प्राण्यामधील वर्षातील ठरावीक कालावधिमधील प्रजनन थांबून कोणत्याही हंगामात त्यांचे प्रजजन होते. आपापले क्षेत्र रक्षण ही वन्य प्रेरणा आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे प्राणी पाळणे हाच मुळी प्राणी पालनाचा प्रारंभ आहे.
'''प्राणी पालन पायऱ्या''' :
हत्तीच्या वाढीसाठी लागणारी वर्षे आणि परिसरातील वन्य आणि पाळीव हत्तींची संख्या विचारात घेतली तर दोन्ही समूहातील अंतर फारसे स्पष्ट नाही. हाच प्रश्न घरातून पसार झालेले मांजर भटके बनते त्यावेळी येतो. अधिकाधिक प्राणी पाळण्यामुळे एका नव्या वर्गीकरणाचा उदय झाला आहे.
Line २४ ⟶ २६:
3. व्यापारी उपयोगासाठी वाढवलेले प्राणी: वन्य क्षेत्रामधून पकडलेले किंवा निपज करण्यासाठी बंदिस्त केलेले. घोडे अस्गा पद्धतीने मोठ्या कुरणामध्ये ठेवलेले असतात. अन्न, पाळीव प्राण्यांचा पुरवठा करण्यासाठी किंवा व्यापारी पद्धतीने विक्रीसाठी उपलब्द केलेले प्राणी. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात वाघांची हाडे टायगर वाइन बनविण्यासाठी लागतात. चीनमधील सर्व वाघ संपलेले आहेत. तेथे वाघ प्रजनन व्यापारी पद्धतीने घेतले जाते. वाघाचा लिलाव करून त्याची हाडे विक्रीचा व्यवसाय केला जातो. भारतात अशाच प्रकारचे क्रोकोडाइल सेंटर आहे. ठरावीक दिवसानंतर त्यातील काही सुसरी विकल्या जातात. शहामृग, हरीण, मगर, मोती कालवे, आणि अमेरिकन पाळीव प्राण्यामध्ये लोकप्रिय असलेला बॉल पायथॉन (अजगर) , टेरांटुला नावाचा कोळी याना सतत मागणी असते. जगभरातील वन्य प्राणी कायद्यानुसार वन्य प्राणी प्राणिसंग्रहालयात ठेवण्यास बंदी आहे. पण प्राणिसंग्रहालयात जन्मलेले प्राणी देवाणा घेवाण तत्वानुसार उपलब्ध करून दिले जातात.
4. पाळीव : अशा प्राण्याना मुद्दाम मानवी देखरेखीखाली कित्येक पिढ्या वाढवले जाते. काहीं पिढ्यानंतर त्यामध्ये वर्तनात बदल होतो. घोडा, चिपांझी, डुक्कर, मांजर, गाणारे पक्षी, कबूतर, गोल्ड फिश, रेशीम कीटक, कुत्रा, शेळी, मेंढी, कोंबडी, लामा, गिनी पिग, मिथुन, उंट असे अनेक पाळीव प्राणी पिढ्यानपिढ्या माणूस वाढवतोय. यामध्ये आता भर पडली आहे ती प्रयोगशाळेतील उंदीर, गिनी पिग आणि प्रयोगशाळेतील माकडांची.
 
'''प्राणी पालन मर्यादा :'''
योग्य असे गुणधर्म शोधून फक्त असेच प्राणी पाळायचे याला काहीं मर्यादा आहेत. एकदा पिढ्यानपिढ्या एक प्राणि जाति पाळावयास प्रारंभ केला म्हणजे त्याचा आकार लहान होतो. रंग बदलतो. शरीरातील मेदाचे प्रमाण वाढते. स्नायू कमकुवत होतात. हाडे ठिसूळ होतात. मेंदू लहान, वर्तन सौम्य पाळीव प्राणी वयात येण्याचा काळ लांबतो. पाळीव प्राण्यामधील जनुकीय विविधता कमी झाल्याने त्यांच्यामधील आजाराचे प्रमाण वाढते. हे बदल एकोणीसाव्या शतकामध्ये प्राणी प्रजनन करणार्यानी लिहून ठेवले. विसाव्या शतकात ते प्रयोगाने सिद्ध झाले.
पाळीव प्राण्यापासून होणारा एक घातक परिणाम म्ह्णजे पाळीव प्राण्यापासून माणसास होणारे आजार. पॉक्स विषाणू, ट्युबरक्युलोसिस (क्षय), गोवर; डुकरापासून आणि बदकापासून एंफ्ल्युएंझा ; घोड्यापासून उद्भवणारा –हायनोव्हायरस. केवळ एकट्या कुत्र्यामुळे माणसास साठ विविध आजार होऊ शकतात. अनेक परजीवी पाळीव प्राण्यामधून माणसामध्ये संक्रमित झाले आहेत. पाळीव प्राणी सतत मानवी संपर्कात असल्याने पाळीव प्राण्यामधील परजीवीना मानव हा आणखी एक आश्रित मिलालामिळाला. योग्य ती स्थिति उत्पन्न झाली म्हणजे त्यांचामध्ये आवश्यक बदल होऊन मानवी शरीरामध्ये चटकन शिरकाव करणे त्याना सोपे जाते.
 
.