"तिसरे इंग्रज-म्हैसूर युद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

मोहीमचौकट इंग्रज-म्हैसूर युद्धे टाकली.
छो
(मोहीमचौकट इंग्रज-म्हैसूर युद्धे टाकली.)
 
==युद्धमोहीम==
टिपूविरूद्धची पहिली मोहीम जनरल मेडोजच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली होती. पण या मोहीमेत जनरल मेडोजला मद्रास प्रेसिडन्सीकडून पुरेशी मदत न मिळाल्याने मेडोजची ही मोहीम अयशस्वी झाली. या युद्धाचा निकाल लवकर लागावा म्हणून कॉर्नवॉलिस स्वत: मद्रास येथे आला व त्याने वैयक्तिकरीत्या सैन्याचे नेतृत्व स्विकारले. [[मार्च]], [[इ.स. १७९१]] मध्ये कॉर्नवॉलिसने [[बंगलोर]]वर आक्रमण करुन बंगलोर शहरावर ताबा मिळविला आणि{{ मोहीमचौकट इंग्रज-म्हैसूर युद्धे }} टिपूला श्रीरंगपट्टणमजवळ आरिकेरा येथे कोंडीत पकडले. टिपूच्या ताब्यातील [[धारवाड]]चा किल्ला घेण्यासाठी ब्रिटिश, निजाम आणि मराठ्यांच्या संयुक्त फौजांना शर्थीची झुंज द्यावी लागली. या युद्धमोहीमेत धारवाड किल्ला घेण्यासाठी या संयुक्त फौजांना [[सप्टेंबर]], [[इ.स. १७९०]] ते [[एप्रिल]], [[इ.स. १७९१]] असे सहा महिने युद्ध करावे लागले.<ref>{{cite web | दिनांक=इ.स. १७९४ | दुवा=http://books.google.co.in/books?id=tEoOAAAAQAAJ&printsec=frontcover&source=gbs_ge_summary_r&cad=0#v=onepage&q&f=false | भाषा=इंग्रजी | लेखक=एडवर्ड मूर | शीर्षक=अ नेरेटीव्ह ऑफ द ऑपरेशन्स ऑफ कॅप्टन लिटल्स डिटॅचमेंट अॅन्ड ऑफ द मराठा आर्मी कमांडेड बाय परशुरामभाऊ ड्युरींग द लेट कॉन्फेडर्सी इन इंडिया अगेन्स्ट द नवाब टिपू सुलतान बहादूर | ॲक्सेसदिनांक=२९ जून, इ.स. २०१२}}</ref> एप्रिल, इ.स. १७९१ मध्ये निजामाची १०,००० ची फौज श्रीरंगपट्टणमच्या वेढ्यात इंग्रजांना येऊन मिळाली. नंतर पावसाळा आणि रसदीचा अल्पपुरवठा यामुळे हा वेढा उठवावा लागला. वेढा उठविल्यानंतर कॉर्नवॉलिस नवीन योजना आखण्यासाठी [[मद्रास]]ला परत आला. नवीन योजनेनुसार [[इ.स. १७९२]] च्या सुरुवातीला ब्रिटिश फौजेने श्रीरंगपट्टणमवर दुहेरी हल्ला केला. मराठे व निजामाच्या लष्करानेही म्हैसूर राज्यात धुमाकूळ घालून टिपूचे प्रचंड नुकसान केले. म्हैसूरचे डोंगरी किल्ले एकामागून एक ब्रिटिश फौजेच्या हाती पडू लागले. टिपू सुलतान त्याच्या तटबंदी असलेल्या राजधानीत आश्रयाला गेला होता पण तिथेही त्रिमित्र फौजेने त्याला घेराव घातला. शेवटी त्रस्त झालेल्या टिपू सुलतानाने शांततेसाठी कॉर्नवॉलिसकडे विनवणी केली. कॉर्नवॉलिसनेही स्वत:च्या अटींवर त्याला मान्यता दिली.
 
 
==शेवट==
२९,७८८

संपादने