"जीनोम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ७:
जीनोमचा विस्तार म्हणजे सजीवामधील पेशीमध्ये असलेल्या डीएनएची एक कॉपी (प्रत). पेशीमध्ये अशा डीएनएच्या दोन प्रती असतात. जीनोम चा विस्तार पायकोग्रॅम या एककाने मोजण्याची पद्धत आहे. एक पायकोग्रॅम म्हणजे एका ग्रॅमचा 10-12 (एका ग्रॅमचा एक ट्रिलियन एवढा भाग). हे मापन न्यूक्लिओटाइड बेस जोड्यांच्या संख्येवरून सुद्धा मोजण्याची पद्धत आहे. एक एमबी म्हणजे मिलियन बेस किंवा एमबीपी (मिलियन बेस पेअर-चे लघुरूप) म्हणजे दहा लाख बेस जोड्या. संगणकीय परिभाषेत केबी,एमबी,जीबी आणि टीबी ही अक्षरे बाइटच्या संख्येशी संबंधित आहेत. तर जीनोमच्या परिभाषेत या संख्या नायट्रोजेन बेस जोड्यांशी संबंधित आहेत.
 
जीनोमचा विस्तार एका अगुणित (हॅप्लॉइड) युग्मकामधील डीएनए एवढा असतो. गेल्या पन्नास वर्षामध्ये हजारो सजीवांच्या जीनोमचा विस्तार गणिताने आणि पत्यक्षात मोजलेला आहे. जीनोमचा विस्तार आणि सजीवाच्या शारिरिक गुंतागुंतीचा काहींही संबंध नसतो. काहीं एकपेशीय आदिजीवांचा जीनोम मानवी जीनोमहून अधिक मोठा आहे. जीनोमचा विस्तार सजीवामध्ये असलेल्या जनुकांच्या संख्येशी संबंधित आहे. जीनोम विस्तारामध्ये मध्ये खूप विविधता आहे. जीनोममध्ये अव्यक्त जनुके अधिक असल्यास जीनोमचा विस्तार मोठा असतो. उदा. बॅक्टेरिओफाज एमएस2 या जिवाणूमध्ये 3.5 केबीपी किलो बेस जोड्या एवढा जीनोम (सर्वात लहान). ई कोलि जीनोम 4.6 एमबीपी, पॅरिस जेपोनिका या जपानी झाडाचा जीनोम 150 जीबीपी. अमीबा डुबिया या एकपेशीय आदिजीवाचा जीनोम 670 जीबीपी आणि मानवी जीनोम 3.2 जीबीपी. काहीं परजीवीमध्ये जीनोमचा संकोच होण्याची क्रिया होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. उदा. जिवाणूच्या पेशीमध्ये साधारणपणे 1000 जनुके असतात. पण एके काळी स्वतंत्र आस्तित्व असलेले रिकेट्सिया आणि सायनोबॅक्टेरिया सारखे जिवाणू दृश्यकेंद्रकी पेशीमध्ये प्रविष्ठ झाल्यानंतर त्यांच्या जीनोमचा संकोच झाला आहे. (पहा पेशीअंगके) त्याच प्रमाणे तंतुकणिकेमध्ये आता फक्त वीस जनुके शिल्लक राहिलेली आहेत. तंतुकणिकेमधील बरीच जनुके पेशीकेंद्रकामध्ये स्थलांतरित झालेली आहेत. परजीवी मायकोबॅक्टेरिया लेप्रि या कुष्ठरोगाच्या जिवाणूमध्ये एक तृतियांश जनुकांचे विलोपन झालेले आहे. जीनोमचा विस्तार बराच गुंतागुंतीचा असल्याने सध्या वैज्ञानिक सजीवांचे आस्तित्व टिकून राहण्यासाठी कमीतकमी किती विस्ताराचा जीनोम आणि पर्यायाने किती जीवनप्रक्रियांची आवश्यकता आहे यावर संशोधन करीत आहेत. पृथ्वीवर पहिल्या सजीवाची निर्मिती कशी झालीअसावी याची कल्पना करण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होईल.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/जीनोम" पासून हुडकले