"खिलाफत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रस्तावनेत भर. संदर्भ भरले.
प्रस्तावनेत भर घातली.
ओळ १:
'''खिलाफत''' ([[अरबी भाषा|अरबी]]: خلافة إسلامية ; [[तुर्की भाषा|तुर्की]]: ''Hilafet'') ही [[इस्लाम धर्म|इस्लाम धर्मातील]] सर्वांत पहिल्या राजकीय-धार्मिक शासनव्यवस्थेस उद्देशून वापरली जाणारी संज्ञा आहे. "प्रेषिताचा वारास" असा अर्थ असणाऱ्या ''[[खलीफा]]'' या शब्दापासून ''खिलाफत'' ही संज्ञा उपजली आहे. या शासनव्यवस्थेत खलीफा व त्याला साहाय्य करणारे अन्य अधिकारी जगभरातील इस्लामधर्मीयांचे प्रतिनिधी मानले जातात व ते [[शरिया]] या इस्लामी धार्मिक व राज्यशासनविषयक कायदेप्रणालीनुसार राज्यसत्ता सांभाळतात. सैद्धान्तिक व्याख्येनुसार हिला "सामंतिक-राज्यघटनाधारित ([[मदीनेची राज्यघटना|मदीनेच्या राज्यघटनेनुसार]] चालणारे) [[प्रजासत्ताक]]"<ref group = "श">सामंतिक-राज्यघटनाधारित प्रजासत्ताक ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Aristocratic-constituitional republic'', ''ॲरिस्टोक्रॅटिक कॉन्स्टिट्यूशनल रिपब्लिक''): संमत राज्यघटनेवर आधारलेले, सामंतवादी परंपरेने चालणारे प्रजासत्ताक.</ref> प्रकारची राज्यव्यवस्था मानले जाते <ref name="मायकेल लेकर">{{संदर्भ पुस्तक | आडनाव = लेकर | पहिलेनाव = मायकेल | शीर्षक = द 'कॉन्स्टिट्यूशन ऑफ मदीना': मुहम्मद्स फर्स्ट लीगल डॉक्यूमेंट | प्रकाशन = जर्नल ऑफ इस्लामिक स्टडीज. (खंड १९; अंक २) | वर्ष = इ.स. २००८ | पृष्ठे = २५१-२५३ | डीओआय = 10.1093/jis/etn021 | ॲक्सेसदिनांक = २३ जून, इ.स. २०१२ | भाषा = इंग्लिश }}</ref>.
 
[[मोहम्मद पैगंबर|प्रेषित मोहम्मदाने]] घालून दिलेल्या राजकीय व धार्मिक व्यवस्थेचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी मोहम्मदाच्या अनुयायांनी ही व्यवस्था अनुसरली, तीमधून खिलाफत राज्यव्यवस्था आकाराला आली. हे सुरुवातीचे खलीफेखलिफे [[राशिदून खलीफे|राशिदून]] म्हणून ओळखले जातात. [[सुन्नी इस्लाम|सुन्नी इस्लामानुसार]] मुस्लिमांच्या [[शूरा|शूरेने]] - म्हणजे सहमतीने - खलीफ्याची निवड होते; तर [[शिया इस्लाम|शिया इस्लामानुसार]] मोहम्मदाच्या निष्कलंक रक्ताचा वारस (म्हणजे वंशज) असलेला व ईश्वराने निवडलेला [[इमाम]]च खलीफा होऊ शकतो. राशिदून कालखंडानंतर आधुनिक काळापर्यंत (इ.स. १९२४ सालापर्यंत) खिलाफतींचे नेतृत्व घराण्यांतूनच चालत राहिले. किंबहुना क्वचित्काळी एकाच वेळी दोन खलीफे असण्याचे प्रसंग उद्भवले आहेत. राशिदुनांनंतर [[उमय्या खिलाफत|उमय्या वंशाने]] खिलाफत चालवली. त्यानंतर [[अब्बासी खिलाफत|अब्बासी]], [[फातिमी खिलाफत|फातिमी]] व अखेरीस [[ओस्मानी खिलाफत|ओस्मानी]], या वंशांनी खिलाफती चालवल्या.
 
== पारिभाषिक शब्दसूची ==
"https://mr.wikipedia.org/wiki/खिलाफत" पासून हुडकले