"मारुती स्तोत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १०४:
 
परंतु पाहिजे भक्ती संधे कांहीं धरूं नका ।रामदासा सहाकारी सांभाळितो पदोंपदीं ॥२४॥
 
 
मारुती स्तोत्रें - :वृत्त मालिनी
 
भुवनदहनकाळीं काळ विक्राळ जैसा ।
सकळ गिळित ऊभा भासला भीम तैसा ।
दुपटत कपि झोंकें झोंकिली मेदिनी हे ।
तळवट धरि धाकें धोकलीं जाउं पाहे ॥१॥
 
गिरिवरुनि उडाला तो गिरी गुप्त झाला ।
घसरत दश गांवें भूमिकेमाजि आला ।
उडती झडझडाटें वृक्ष हे नेटपाटें ।
पडति कडकडाडें अंग घातें धुधाटें ॥२॥
 
थरथरित थरारी वज्र लांगूल जेव्हां ।
गरगरीत गरारी सप्तपाताळ तेव्हां ।
फणिवर कमठाचे पृष्ठिशीं आंग घाली ।
तगटित पवनाची झेंप लंकेसि गेली ॥३॥
 
थरकत धरणी हे हाणतां वज्रपुच्छें ।
रगडित रणरंगीं राक्षसें तृणतुच्छें ।
सहज रिपुदळाचा थोर संव्हार केला ।
अवघड गड लंका शीघ्र जाळून आला ॥४॥
 
सहज करतळें जो ठेरुमांदार पाडी ।
दशवदन रिपू हे कोण कीती बराडी ।
अगणित गणवेना शक्ति काळासि हारी ।
पवनतनुज पाहो पूर्ण रुद्रावतारी ॥५॥