"विषमज्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
छो r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: fa:حصبه; cosmetic changes
ओळ ५:
कोंबड्या आणि अंड्यामधून पसरणाऱ्या अन्न विषबाधेचे कारण असणाऱ्या साल्मोनेला रोगाचे आणि मानवी मुदतीच्या तापाचे कारण एकाच कुलातील जिवाणू आहे. सालमोनेला टायफीमुळे उलट्या आणि अतिसार न होता तीव्र ताप येणे हे त्याचे लक्षण आहे.
 
== वर्णन ==
सालमोनेला टायफी हे जिवाणू रुग्णाच्या शौच आणि मूत्रामधून बाहेर पसरतात. प्रत्यक्ष आजार न झालेल्या वाहक व्यक्तीमधून जिवाणू पसरू शकतात. टायफॉइड बरा झालेल्या रुग्ण सुद्धा जिवाणूचा वाहक असतो. टायफॉइड बरा झालेले सुमारे तीन टक्के रुग्ण सालमोनेलाचे वाहक असतात. मुदतीचा ताप आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होण्याचे कारण अस्वच्छ सवयी. शौचानंतर हात गडबडीने धुणे किंवा हात स्वच्छ न करणे हे त्याचे एक कारण. रोगाचा वाहक असलेल्या व्यक्तीने हाताळलेल्या अन्नामुळे टायफॉइडची साथ पसरते. एका अशा व्यक्तीस ‘टायफॉइड मेरी’ असे नाव दिले गेले आहे. जगाच्या काहीं भागामध्ये अस्वच्छतेमुळे टायफॉइड हा गंभीर प्रश्न झाला आहे. दर वर्षी सुमारे १ कोटी साठ लाख व्यक्ती टायफॉइडने आजारी पडतात.
== कारणे आणि लक्षणे ==
सालमोनेला जिवाणूचा प्रवेश अन्न मार्गात झाल्याशिवाय टायफॉइड होत नाही. शौचानंतर अस्वच्छ हात, हात ना धुणे, अशा हातानी अन्नाचे वाटप करणे हा टायफॉइड होण्याचा एक मार्ग आहे. याशिवाय ज्या ठिकाणी उघड्यावर शौच केले जाते त्यावर बसलेल्या माशा दुसरीकडे उघड्या अन्नावर बसून अन्न दूषित करतात. या प्रकारास शौच-मुख प्रसार असे म्हणण्याची पद्धत आहे.
 
अन्नमार्गात शिरल्यानंतर सालमोनेला टायफी जिवाणू मोनोन्यूक्लियर फॅगोसाइट – एककेंद्रकी भक्षक पेशी सालमोनेला जिवाणूस खातात. या पेशी शरीराच्या प्रतिकारयंत्रणेचा भाग आहेत. या पेशीमध्ये सालमोनेला टायफी तशाच जिवंत राहतात.या पेशीमध्येच त्यांची वाढ होते. सालमोनेलाचा पेशीमध्ये प्रवेश झाल्यापासून टायफॉइडचे लक्षण दिसण्यास दहा ते चौदा दिवस लागतात. भक्षक पेशीतील मोठ्या प्रमाणात असलेल्या पेशीमधील सालमोनेला जिवाणू रक्तामधून पसरल्यानंतर त्यांच्या प्रभावाने ताप येण्यास प्रारंभ होतो.
रक्तामधील मोठ्या संख्येने असलेल्या सालमोनेला जिवाणूमुळे आलेला ताप वाढ्त जातो. उपचार न घेतलेल्या रुग्णामध्ये अशी स्थिति चार ते आठ आठवडे राहते. टायफॉइडची दुसरी लक्षणे म्हणजे प्रारंभीच्या काळात मलावरोध,अशक्तपणा, डोकेदुखी,सांधेदुखी, आणि पोटावर पुरळ.
 
रक्तामधून सालमोनेला शरीराच्या इतर उतीमध्ये जसे पित्ताशयात आणि लहान आतड्यातील लसिका पेशी समूहात (पेअर्स पॅच) शिरतात. सालमोनेलाचे वास्तव्य पित्ताशयात असल्यास पित्ताशयाचा दाह होतो. लसिका पेशी समूहातील सालमोनेला मुळे लहान आतड्यास छिद्र पडू शकते. असे झाल्यास लहान आतड्यातील अन्न आणि द्रव उदरपोकळीत शिरल्यास उदर पोकळी आंतरावरण दाह आणि शोथ होतो. हा टायफॉइड मधील गंभीर प्रकार असून टायफॉइडमुळे होणाऱ्या मृत्यूचे कारण आहे.
 
टायफॉइडमुळे होणाऱ्या इतर लक्षणामध्ये यकृत आणि प्लीहेस सूज येणे, प्लीहा फुटणे,रक्तक्षय, रक्तातील तांबड्या पेशींचे प्रमाण कमी होणे, लहान आतड्यामध्ये रक्तस्राराव, सांध्यामध्ये जिवाणूसंसर्ग होतो. सिलक पेशीचा अ‍ॅनिमिया असलेल्या रुग्णामध्ये रक्तक्षय आणि प्रतिकार यंत्रणा क्षीण झाल्याने स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनियाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. हृदय, मेंदूआवरण आणि मेंदूमध्ये जिवाणू संसर्ग झाल्याने कोमा आणि मृत्यू ओढवतो. उपचार न केल्यास रुग्णास बरे होण्यास कित्येक महिने लागतात.
 
== निदान ==
पोटावरील विविक्षित प्रकारच्या पुरळांवरून तज्ज्ञ डॉक्टरांना टायफॉइडचे निदान होते. अस्वच्छ ठिकाणी केलेला नजीकच्या काळातील प्रवास हे निदानाचे कारण असू शकते. रक्ताच्या कल्चर वरून टायफॉइडचे नेमके निदान होते. यासाठी रुग्णाच्या शौच, मूत्र आणि अस्थिमज्जा यांचे प्रयोगशाळेत वृद्धिमिश्रणात कल्चर करतात.ज्या रुग्णानी प्रतिजैविके घेतलेली नाहीत अशा ८०% रुग्णामध्ये रक्त कल्चर परीक्षा सकारात्मक येते.
 
== उपचार ==
प्रतिजैविकांचा वापर टायफॉइड वर परिणामकारक आहे. इ.स. २००० पासून सेप्रिअक्सोन आणि सिप्रोफ्लॉक्सिन ही दोन औषधे टायफॉइडवर दिली जात आहेत. सालमोनेला टायफीच्या वाहक व्यक्तीवर टायफॉइडची लक्षणे दिसत नसली तरी उपचार करण्याची गरज आहे. कारण बहुतेक वेळा वाहक व्यक्तीमुळे टायफॉइडचे नवे रुग्ण होण्याची प्रक्रिया सतत चाललेली असते. वाहक व्यक्ती शोधून काढणे ही मोठी कौशल्याची बाब आहे. त्यासाठी एक किवा दोन औषधे चार ते सहा आठवडे वाहक व्यक्तीस द्यावी लागतात. अँपिसिलिन आणि अ‍ॅमॉक्सिसिलिन , अँपिसिलिन आणि प्रोबेनेसिड यांचे मिश्रण यासाठी दिले जाते. पित्ताशयामध्ये सालमोनेला संसर्ग झालेल्या वाहक व्यक्तीचे पित्ताशय काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. पित्ताशय काढण्याचे कारण म्हणजे दिलेली प्रतिजैविके पित्ताशयावर परिनामकारक ठरत नाहीत. रिफांपिन आणि ट्रायमिथेप्रिम सल्फामेथोक्सॅझोल उपचारामुळे पित्ताशयातील संसर्ग दूर होतो आणि पित्ताशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्याची वेळ येत नाही.
 
== पूर्वानुमान ==
बहुतेक रुग्ण उपचाराना उत्तम प्रतिसाद देतात. प्रतिजैविकांचा वापर होण्याआधी १२% टायफॉइडचे रुग्णांचा आजाराने मृत्यू होत असे. सध्या प्रतिजैविकांचा उपचार करून घेतलेल्या रुग्णापैकी फक्त १ % रुग्ण टायफॉइडने मरण पावतात. मृत्यू होण्याचे प्रमाण लहान बालकामध्ये आणि अतिवृद्धांमध्ये अधिक दिसून येते. कुपोषितामध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. रुग्ण बेशुद्ध झाल्यानंतर कोमा स्थितीत गेल्यास तो वाचण्याची शक्यता नसते.
 
== प्रतिबंध ==
सार्वजनिक स्वच्छ्ता , सांडपाण्याची योग्य विल्हेवाट , वैयक्तिक आरोग्य आणि योग्य त्या वेळी टायफॉइडची घेतलेली लस यामुळे टायफॉइडचा प्रतिबंध होतो. सालमोनेला टायफी हे जिवाणू अस्तित्वास असल्याचे माहीत असलेल्या देशामध्ये प्रवास करण्याआधी टायफॉइडची लस टोचून घेणे आवश्यक आहे. अल्प मुदतीचे आणि दीर्घ मुदतीचे संरक्षण देणाऱ्या दोन्ही लसी उपलब्ध आहेत. लसीचे उत्तरपरिणाम टाळून अधिक परिणामकारक लस वनविण्याचे प्रयत्न सतत चाललेले आहेत. लसीच्या उत्तरपरिणांमाध्ये स्नायुदुखी, पोटदुखी आणि फ्लूसारखी लक्षणे दिसतात. २००४ मध्ये या लसी जैविक युद्धाविरुद्धचा उपचार म्हणून वापरता येतील अशी शक्यता उत्पन्न झाली आहे.
 
[[वर्ग:आरोग्य]]
[[वर्ग:रोग]]
[[वर्ग:जीवाणूजन्य रोग‎रोग]]
[[वर्ग:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र]]
 
[[en:Typhoid fever]]
[[af:Ingewandskoors]]
[[ar:حمى تيفية]]
ओळ ४०:
[[br:Terzhienn-domm]]
[[ca:Febre tifoide]]
[[ckb:گرانەتا]]
[[cs:Břišní tyfus]]
[[da:Tyfus]]
[[de:Typhus]]
[[et:Kõhutüüfus]]
[[el:Τυφοειδής πυρετός]]
[[en:Typhoid fever]]
[[es:Fiebre tifoidea]]
[[et:Kõhutüüfus]]
[[eu:Sukar tifoide]]
[[fa:تب تیفوییدحصبه]]
[[fi:Lavantauti]]
[[fr:Fièvre typhoïde]]
[[he:טיפואיד (מחלה)]]
[[ko:장티푸스]]
[[hi:आंत्र ज्वर]]
[[hr:Trbušni tifus]]
[[iohu:TifoidoHastífusz]]
[[id:Demam tifoid]]
[[ia:Typhoide]]
[[id:Demam tifoid]]
[[io:Tifoido]]
[[is:Taugaveiki]]
[[it:Febbre tifoide]]
[[ja:腸チフス]]
[[he:טיפואיד (מחלה)]]
[[kn:ವಿಷಮಶೀತ ಜ್ವರ]]
[[swko:Homa ya matumbo장티푸스]]
[[ku:Giraneta]]
[[la:Typhus (morbus)]]
[[hu:Hastífusz]]
[[ml:ടൈഫോയ്ഡ്]]
[[ms:Demam kepialu]]
[[my:အူရောင်ငန်းဖျား ရောဂါ]]
[[nl:Buiktyfus]]
[[jann:腸チフスTyfoidfeber]]
[[no:Tyfoidfeber]]
[[nn:Tyfoidfeber]]
[[pl:Dur brzuszny]]
[[pt:Febre tifoide]]
[[ro:Febră tifoidă]]
[[ru:Брюшной тиф]]
[[sh:Trbušni tifus]]
[[si:ටයිපොයිඩ් උණ]]
[[simple:Typhoid]]
[[sk:Brušný týfus]]
[[ckb:گرانەتا]]
[[sr:Тифус]]
[[sh:Trbušni tifus]]
[[fi:Lavantauti]]
[[sv:Tyfoidfeber]]
[[sw:Homa ya matumbo]]
[[ta:குடற்காய்ச்சல்]]
[[te:టైఫాయిడ్]]
"https://mr.wikipedia.org/wiki/विषमज्वर" पासून हुडकले