"महात्मा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६०१ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
 
त्यांनी उत्तर भारतातील तसेच बंगालमधील प्रक्षुब्ध जमावाला शांत करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम समाजातील नेत्यांसोबत दीर्घ चर्चा केल्या. [[इ.स. १९४७]]च्या भारत-[[पाकिस्तान]] युद्धाच्या पार्श्वभूमीवरदेखील, भारत सरकारचा फाळणी करारानुसार ठरलेले ५५ कोटी रूपये पाकिस्तानला न देण्याचा निर्णय त्यांना आवडला नाही. सरदार पटेलांसारख्या नेत्यांना वाटत होते की, या पैशांचा उपयोग पाकिस्तान युद्धासाठी भांडवल पुरवण्यासाठीच करेल. सर्व मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवून द्यावे या मागणीने परत जोर पकडला होता. तसेच हिंदू आणि मुस्लिम नेते एकमेकांना समजून घेण्यात असमर्थता दाखवित होते.<ref>Patel: A Life, राजमोहन गांधी पृष्ठ ४६२</ref> या सर्व कारणांनी गांधीजी अत्यंत व्यथित झाले होते. त्यांनी या दंगली बंद करण्याच्या आणि पाकिस्तानला ५५ कोटी देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण चालू केले. गांधीजींना भिती वाटत होती की, पाकिस्तानमधील अस्थिरता आणि असुरक्षितता त्यांचा भारताबद्दलचा राग वाढवेल आणि या दंगली देशाच्या सीमा ओलांडून जातील, तसेच हिंदू आणि मुस्लिमांमधील शत्रुत्व परत डोके वर काढील आणि त्याची परिणिती अंतर्गत बंडात होईल. त्यांच्या आयुष्यभराच्या सहकाऱ्यासोबतच्या अनेक वादविवादांनंतरही गांधीजी आपल्या निर्णयावरून मागे हटले नाहीत आणि शेवटी सरकारने आपला निर्णय मागे घेतला आणि पाकिस्तानला ५५ कोटी रूपये दिले. हिंदू, मुस्लिम आणि शिख नेत्यांनी, ज्यामध्ये [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]] आणि [[अखिल भारतीय हिंदू महासभा|हिंदू महासभेच्या]] नेत्यांचा समावेश होता, हा हिंसाचार थांबवण्याचे आणि लोकांकडे शांततेची मागणी करण्याचे वचन दिले. यानंतर गांधीजींनी सत्र्याचा रस पिऊन आपले उपोषण सोडले.<ref>Patel: A Life, राजमोहन गांधी पृष्ठे ४६४-४६६</ref>
 
== राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गांधी ==
एकदा गांधीजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला भेट द्यायला नागपूर येथे गेले होते. तेथे त्यांनी एक प्रश्न विचारला इथे हरिजन कोण आहेत? किती आहेत? त्यावेळी उत्तर मिळालं येथे सगळे हिंदू आहेत.
 
== मृत्यू ==
४१

संपादने