"नारायण हरी आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎चित्रपट: अन्य चित्रपट ref: international moviee data base "http://www.imdb.com" added
छोNo edit summary
ओळ २:
'''नारायण हरी आपटे''' (जन्म :समडोळी-सांगलीजिल्हा; [[११ जुलै]], [[इ.स. १८८९]]- मृत्यू कोरेगांव, [[नोव्हेंबर १५]], [[इ.स. १९७१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक होते. त्यांचे शिक्षण समडोळीला आणि नंतर सातारा येथे झाले.
 
नारायण हरि आपटे यांनी मुख्यत: कादंबर्‍या लिहिल्या असल्या, तरी त्यांच्या लघुकथासंग्रह आणि वैचारिक लेखनही प्रकाशित झाले आहे . त्यांनी जवळपास पस्तीस कादंबर्‍या लिहिल्या आहेत. त्यांतल्या थोड्याशा ऐतिहासिक सोडल्या तर बाकीच्या सामाजिक कादंबर्‍या आहेत. त्यांची एकूण ग्रंथसंख्या सुमारे ६०७५ इतकी आहे.
 
‘किर्लोस्कर खबर’ या नियतकालिकाचे ते काही काळ सहसंपादक होते. कोरेगावहून त्यांचे स्वत:चे ‘मधुकर’ नावाचे मासिक प्रसिद्ध होत असे.
ओळ १०:
त्यांच्या कथांवरून काही चित्रपट बनले आहेत. ‘भाग्यरेखा’ हा चित्रपट ना.ह.आपट्यांच्या ‘पाच ते पाच’ या कथेवरून केला होता. चित्रपटाची पटकथा, गीते आणि दिग्दर्शन शांताराम आठवले यांचे होते. त्या चित्रपटात १९४२ सालच्या चळवळीतील भूमिगत क्रांतिकारकांचे खडतर साहसी जीवन दाखवले होते. सामान्यांचा क्रांतिकारकांना मिळणारा सक्रिय व धाडसी पाठिंबा, भाकरी मोर्चा सारखे सामाजिक लढे, आदर्श, ध्येयनिष्ठ प्रेम, मोहाच्या क्षणातून उद्भवलेला कुमारी माता हा पेचप्रसंग, हे सर्व दाखवणारे आणि "निर्भयतेने जीवन जगा" असा संदेश देणारे हे राजकीय पार्श्वभूमी असलेले चित्रण होते. चित्रपट फारच उत्तम बनला होता, परंतु महात्मा गांधींचा खून झाला, आणि दंगे, जाळपोळ यांत चित्रपटाची वाताहत झाली.
 
'''कुंकू''' हा प्रभात चित्रपटसंस्थेचा चा गाजलेला चित्रपट, ना.ह.आपटे यांच्या ‘न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर आधारित आहे.
 
बॅरिस्टर न.वि.गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली सातारा भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते.
 
कोरेगाव येथे ते १५ नोव्हेंबर, इ.स. १९७१ रोजी निवर्तले.
 
 
== प्रकाशित साहित्य ==