"चेतासंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: an:Sistema niervoso
खूणपताका: विशेषणे टाळा
छोNo edit summary
ओळ २३:
'''चेतापेशी :'''
 
चेतापेशी इतर पेशीपासून सहज वेगळ्या ओळखता येतात. त्या परस्परांशी अनुबंधाद्वारे जोडलेल्या असतात. चेतापेशीमधील अनुबंध म्हणजे एका पेशीच्या पेशीपटलामधून दुसर्‍यादुसऱ्या पेशीमधील पटलामध्ये त्वरित होणारे संदेश वहन. हे वहन रासायनिक किंवा विद्युत भाराच्या स्वरूपात असते. बहुतेक चेतापेशीना एक किंवा अनेक प्रवर्ध (पेशीपासून निघालेला लांब भाग) निघतात. सर्वात लांब प्रवर्धास अक्षतंतू असे म्हणतात. हा प्रवर्ध शरीरामध्ये लांबपर्यंत विस्तारलेला असतो. अक्षतंतू प्रवर्ध इतर हजारो पेशीशी अनुबंधाने जोडलेले असतात. अनेक अक्षतंतू एकत्र येऊन बनलेली चेता(नर्व्ह)च्या स्वरूपात शरीरभर स्नायू किंवा अवयवापर्यंत गेलेली असते.
 
मानवी चेतासंस्थेमध्ये शेकडो प्रकारच्या चेतापेशी असतात. प्रत्येक पेशीची रचना आणि कार्यांमध्ये विविधता आहे. यांमधील संवेदी चेतापेशी प्रकाश व ध्वनि संवेदना ग्रहण करतात. प्रेरकचेतापेशी स्नायू आणि ग्रंथीना संदेशाद्वारे उत्तेजित करतात. बऱ्याच प्राण्यांमध्ये बहुतेक संवेदी चेतापेशी संदेश ग्रहण करून ते संदेश इतर चेतापेशीकडे पाठवतात.
ओळ २९:
'''सहयोगी पेशी:'''
 
सहयोगी पेशीमध्ये चेतापेशीचे एकही कार्य होत नाही. सहयोगी पेशी चेतापेशीना आधार देतात, अंतर्गत स्थिरता आणतात आणि संदेश वहन प्रक्रियेमध्ये मदत करतात. चेतापेशीच्या अक्षतंतूवर असणारे मायलिन आवरण सहयोगीपेशीपासून बनलेले आहे. एका अंदाजानुसार मानवी मेंदूमध्ये एकूण सहयोगी पेशींची संख्या चेपापेशींइतकी असावी. त्यांची संख्या मेंदूच्या विविध भागात आवश्यकतेनुसार कमी अधिक आहे. सहयोगी पेशींचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे चेतापेशीना आधार देणे, त्यांचे पोषण करणे, विद्युतरोधी आवरण, परजीवींचा नाश आणि मृत चेतापेशी नष्ट करणे, वगैरे.. अक्षतंतूंच्या मार्गिकेचे कार्य केल्याने अक्षतंतू विविक्षित भागापर्यंत सुलभपणे पोहोचतात. मध्यवर्ती चेतासंस्थेतील ऑलिगोडेंड्राइट आणि परीघवर्ती चेतासंस्थेतील श्वान पेशींच्या मेद पटलाचे आवरण अक्षतंतूभोवती गुंडाळलेले असते. या आवरणास मायलिन असे म्हणतात. अक्षतंतूमधून होणारे विद्युत रासायनिक संवेद वहन सुरळीत व्हावे यासाठी मायलिन हे विद्युत विरोधी आवरण कार्य करते. काहीं आजारात मायलिन आवरण नष्ट झाल्यास अक्षतंतूमधून येणार्‍यायेणाऱ्या आणि जाणाऱ्या संवेदामध्ये गंभीर परिणाम होतात.
कशेरुकी(पृष्ठवंशी) प्राण्यामधील चेतासंस्था कशेरुकी सजीवांमधील चेतासंस्थेचे दोन भाग होतात. मध्यवर्ती चेतासंस्था आणि परीघवर्ती चेता संस्था.
 
ओळ ७२:
 
चेतासंस्था कार्य
चेतासंस्थेचे मूळ कार्य संवेद एका चेतापेशीपासून दुसऱ्या पेशीकडे पाठवणे. किंवा शरीराच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे घेऊन जाणे. एका पेशीकडून दुसऱ्या पेशीकडे संवेद घेऊन जाण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यातील एक पद्धत म्हणजे संप्रेरके . संप्रेरके हे रासायनिक संकेत आहेत. संप्रेरके रक्ताभिसरण संस्थेद्वारे संप्रेरक ज्या पेशीमध्ये किंवा ग्रंथीमध्ये त्या संप्रेरकाची ग्रहण यंत्रणा आहे अशाठिकाणी ग्रहण केल्या जातात. अशा रीतीनेरितीने जेथून संप्रेरक बाहेर पडते त्यापासून दूरवरच्या ग्रंथीमध्ये कार्य करू शकते. हे थोडेसे रेडियो प्रक्षेपकासारखे कार्य करते. रेडियो स्टेशन रेडियो सिग्नल ब्रॉडकास्ट करते. आपल्या घरी असलेला रेडियो त्या तरंग लांबी ग्रहण करतो. याउलट चेतासंस्था नेमक्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संकेत पाठवते. तुमच्या घरी असलेला टेलिफोन ज्याने तुमचा नंबर फिरवला त्याच्याशीच तुम्हाला बोलता येते. चेतासंस्थेमधील यंत्रणा अतिशय वेगाने संवेद पाठवण्याचेआणि ग्रहण करण्याचे कार्य करते. 100 मीटर प्रति सेकंद एवढ्या अधिकतम वेगाने चेतापेशीमधून संवेद पाठवला जातो.
अनेक चेतापेशी एकत्र आल्याने चेतासंस्थेचे प्रमुख कार्य शरीराचे नियंत्रण. परिसरातील बदलाची नोंद घेणे हे कार्य संवेदी इंद्रियाद्वारे होते. आणलेले संवेद मध्यवर्ती चेतासंस्थेकडे एकत्र होतात. या संवेदावर प्रक्रिया हो ऊन संवेदाचा नेमका प्रतिसाद प्रेरक संवेदामार्फत स्नायू किंवा ग्रंथीकडे पाठवला जातो. चेतासंस्था जशी प्रगत होत गेली तसे दृष्टि, सामाजिक परस्पर संबंध, शरीरातील अवयवांचे एकसूत्रीकरण होत गेले. मानवी चेतासंस्थेमध्ये भाषा, सामाजिक संदर्भ ,संकल्पना , या मानवी समुदायाच्या कल्पना मानवी मेंदूशिवाय सर्वस्वी अशक्य होत्या.
 
ओळ ८२:
चेतापेशी अक्षरश: शेकडो प्रकारच्या अनुबंधाने परस्पराशी जोडलेल्या असतात. त्यामध्ये शंभर एक प्रकारची चेताउद्भवी रसायने असतात. एकाहून अधिक प्रकार ग्राहकामध्ये असतात. अनेक अनुबंधामध्ये एकापेक्षा अधिक चेताउद्भवी रसायने असू शकतात. एका अशा प्रकारात एक चेताउद्भवी रसायन ग्लुटामेट किंवा जीएबीए (गॅमा अमिनो ब्युटारिक अॅ सिड) या वेगाने काम करणाऱ्या रसायनाबरोबर एक बहुअमिनो आम्ली पेप्टाइड चेताउद्भवी सावकाश कार्य करणारे रसायन अशी दोन्ही रसायने अनुबंधात असतात. चेताउद्भवी रसायनामध्ये सर्वसाधारण दोन भाग करता येतात. पहिला आयन गवाक्ष परिवाही आणि दुसरा संदेशक. आयन गवाक्ष परिवाही चेताउद्भवी रसायनामुळे ठरावीक प्रकारचे आयन पेशीपटलाच्या गवाक्षामधून पेशीमध्ये प्रवेशतात. आयनच्या प्रकारानुसार पेशी उद्दीपन किंवा शमन (एक्सायटेटरी आणि इन्हिबिटरी) होते . जेंव्हा संदेशक चेताउद्भवी रसायन परिणाम करते त्यावेळी अनेक गुंतागुंतीच्या प्रतिक्रिया होतात . या मुळे पेशीची संवेदनक्षमता कमी किंवा अधिक होते.
डेल या शास्त्रज्ञाने शोधून काढलेल्या नियमानुसार चेतापेशीकडून एकाच प्रकारचे चेताउद्भवी रसायन पेशी ज्या पेशीशी अनुबंधाने जोडलेल्या आहेत त्यामध्ये सोडण्यात येतात. ( या नियमास फार थोडे अपवाद आहेत). याचा अर्थ एका प्रकारच्या चेताउद्भवी रसायनामुळे एकच परिणाम असे नाही. त्याऐवजी ग्राहक पेशीवरील प्रकारानुसार अपेक्षित परिणाम होतो. त्यामुळे एका चेतापेशीचे उद्दीपन आणि दुसऱ्या पेशीचे शमन होऊ शकते. चेतापेशींच्या समुदायावर संस्करण (मोडयुलेशन) होणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया सुद्धा याच पद्धतीने होते. दोन चेताउद्भव रसायने ग्लुटामेट आणि जीएबीए यांचा परिणाम एकच पद्द्धतीचा होतो. ग्लुटामेट ग्राहक असलेल्या अनेक पेशी आहेत. पण बहुतेक पेशी ग्लुटामेट मुळे उद्दीपित होतात. त्याचप्रमाणे जीएबीए ग्राहक पेशीमध्ये शमन होते. या एकाच पद्धतीच्या परिणामामुळे ग्लुटामेट ग्राहक पेशी उद्दीपक चेतापेशी आणि जीए बीए ग्राहकपेशी शमनचेतापेशी असे म्हणण्याची पद्धत आहे. प्रत्यक्षात ही नावे चुकीचा अर्थ ध्वनित करतात. कारण चेतापेशी ऐवजी ग्राहक यंत्रणेवर पेशीचे उद्दीपन आणि शमन अवलंबून आहे. अगदी विद्वानानी लिहिलेल्या शोधा निबंधामधून सुद्धा आता हीच शब्द प्रणाली रूढ झाली आहे.
अनुबंधाच्या क्षमतेप्रमाणे अनुबंधातील स्मृति कप्पे तयार होणे ही अनुबंधातील एक महत्वाचीमहत्त्वाची बाब आहे. या प्रकारास दीर्घ कालीन संवेद (आवेग) “लॉंग टर्म पोटेंशियल” - म्हणतात. ग्लुटामेट चेताउद्भव रसायन असणाऱ्या एका विशिष्ठ ग्राहकाच्या बाबतीत हा प्रकार नेहमी आढळतो. या विशिष्ठ ग्राहकास एनएमडीए (एन मिथिल डी अस्पार्टेट) असे म्हणतात. एनएमडीए ग्राहकामध्ये सहयोगी गुण आहे. अनुबंधामध्ये असलेल्या दोनही पेशी एकाच वेळी उत्तेजित झाल्या म्ह्णजे कॅलशियम आयन चॅनल उघडते आणि त्यातून कॅलशियम आयनांचा प्रवाह पेशीमध्ये येत राहतो. कॅलशियम आयनांच्या सान्निध्यात दुसरी मालिका चालू होते त्यामुळे ग्लुटामेट ग्राहक मोठ्यासंख्येने उघडून अनुबंधाची क्षमता वाढते. अनुबंधाची क्षमता वृद्धि काहीं आठवडे किंवा त्याहून अधिक काळ वाढलेली राहते. दीर्घकालीन संवेगाचा शोध 1973मध्ये लागला. त्यानंतर या पद्धतीचे आणखी काहीं दीर्घलाकीन संवेग ठावूक झाले आहेत. दीर्घलाकीन संवेग डोपामिन या चेताउद्भवी रसायन संबंधी सुद्धा सापडले आहेत. अनुबंधातील अशा बदलास अनुबंध लवचिकता (प्लॅस्टिसिटी) असे म्हणतात. परिस्थितीतील बदलाबरोबर चेतासंस्थेस जुळवीन घेणे अशामुळे शक्य झाले आहे. अनुबंध लवचिकता आणि स्मृति (अनुबंधची) या जवळच्य परस्पराशी संबंधित बाबी आहेत.