"शमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: or बदलले: en, hi, nl
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:5021073866 858c411b38.jpg ]]
'''शमी''' (शास्त्रीय नाव : Prosopis spcigera - प्रॉसपिस स्पिकिगेरा)ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही वनस्पती [[गणपती]]ला आवडते. हिची पाने गणपतीला वाहतात. विजयादशमीच्याअज्ञातवासात दिवशीजाण्यापूर्वी हीपांडवांनी पानेआपली परस्परांसशस्त्रे देण्याचाकापडामध्ये प्रघातगुंडाळून या झाडावर ठेवली होती. काहीतरी अमंगळ आहे असे समजून कोणीही त्यांना हात लावला नाही.
 
शमी वृक्ष प्रतिकूल हवामानातही उत्तम रितीने वाढतो. जमिनीत आत ओलावा आणि वर वाळू असली तरी हा वृक्ष उत्तम रितीने वाढतो. हा वृक्ष काटेरी आहे. पानांच्या विरुद्ध बाजूला अणकुचीदार, बाकदार काटे असतात. जुनी पाने गळण्याच्या वेळेसच नवीन पालवी फुटते. फुले पिवळी, लहान आणि एका दांड्यावर असतात. मार्च ते मेपर्यंत फुले येऊन गेल्यावर जून ते ऑगस्टच्या दरम्यान शेंगा पिकतात. शेंगेत गोड, घट्ट गर असतो. त्यात लांबटगोल पण चपट्या बिया बसविल्यासारख्या असतात. पिकलेल्या शेंगा आपोआप फुटत नाहीत, शेंगेत कप्पे असतात. एका कप्प्यात एकच बी असते.
 
शमीच्या लाकडाचा उपयोग बाभळीसारखाच इंधनासाठी करतात. लाकूड कणखर असते, पण कीड लवकर लागते. शमीची लाकडे एकमेकांवर घासून अग्नी निर्माण करता येतो. म्हणून, यज्ञकर्मात शमीच्या समिधा असतात, बाभळीच्या नसतात. ’शमीच्या अंगी जसा अग्नी असतो,तसा राणीच्या पोटात गर्भ राहिला आहे असे राजाच्या ध्यानात आल” असे कालिदासाने रघुवंशात म्हटले आहे.
 
'''शमीमिवाभ्यंतरलीनपावकां नृप: ससत्त्वां महिषीं अमन्यत ।''' .. रघुवंश(३.९)
 
"https://mr.wikipedia.org/wiki/शमी" पासून हुडकले