"पैनगंगा वन्यजीव अभयारण्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''पैनगंगा अभयारण्य''' [[यवतमाळ जिल्हा]] आणि [[नांदेड जिल्हा]] यांना विभागणाऱ्या [[पैनगंगा नदी| पैनगंगा नदीच्या]] दोन्ही बाजूंस असलेल्या संरक्षित वनास दिलेले नाव आहे. तीन बाजूंनी पाण्यानं वेढलेले एकमेव अभयारण्य असावे. याचे क्षेत्रफळ सुमारे ३२५ चौ.कि.मी. इतके आहे. या अभयारण्यावर उपवनसंरक्षक (वन्यजीव) [[अकोला]] यांची देखरेख व थेट नियंत्रण आहे.
'''पैनगंगा अभयारण्य''' हे यवतमाळहून सुमारे १५० किलोमीटरवर आहे. यवतमाळ-उमरखेडमार्गे किंवा यवतमाळ-महागाव-ढाणकी-बिटरगावमार्गे पैनगंगा अभयारण्यास पोहोचता येते. या दोन्ही मार्गांवर एस.टी. बसेस मिळतात. उमरखेड किंवा ढाणकी बिटरगावहून खाजगी वाहने आणि ऑटोरिक्षाही उपलब्ध असतात. [[श्यामा कोलाम| श्यामा कोलामचीची]] टेकडी, मसलगा, दोधारी धबधबा, राजोबा देवस्थान, वाघ भुयार, एक शिवालय आणि सहस्रकुंड नावाचा धबधबा अशी येथील अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. मात्र, रस्ते, वाहने, वाटाडे वगैरे सोयी नसल्याने पर्यटकांना सर्व ठिकाणी पोहोचणे शक्य होत नाही.
ओळ ९:
पैनगंगा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळच खरबी या गावी वनखात्याचे विश्रामगृह आहे. किनवट शहरात अनेक चांगली हॉटेल्स आहेत. उनकेश्वर येथेही एक विश्रामगृह आहे.
==किनवट अभयारण्य==
यवतनाळ आणि नादेड या जिल्ह्यांना समाईक असलेले '''[[किनवट अभयारण्य]]''' नावाचे आणखी एक अभयारण्य आहे. हेही अभयारण्य पैनगंगा नदीच्या खोऱ्यात आहे. त्याचे आकारमान दोन्ही जिल्ह्यांत मिळून २१९ चौरस किलोमीटर इतके आहे. जवळचे रेल्वेस्टेशन, मुदखेड-आदिलाबाद लोहमार्गावरील किनवट हे असून रेल्वे स्टेशनपासून अभयारण्याचे अंतर ५ किलोमीटर आहे. रस्तामार्गाने हे अभयारण्य नांदेडपासून १३० किलोमीटरवर आहे.
{{विस्तार}}
|