"पैनगंगा वन्यजीव अभयारण्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''पैनगंगा अभयारण्य''' [[यवतमाळ जिल्हा]] आणि [[नांदेड जिल्हा]] यांना विभागणाऱ्या [[पैनगंगा नदी| पैनगंगा नदीच्या]] दोन्ही बाजूंस असलेल्या संरक्षित वनास दिलेले नाव आहे. तीन बाजूंनी पाण्यानं वेढलेलं एकमेव अभयारण्य आहे. याचे क्षेत्रफळ सुमारे ३२५ चौ.कि.मी. इतके आहे. या अभयारण्यावर उपवनसंरक्षक (वन्यजीव) [[अकोला]] यांची देखरेख व थेट नियंत्रण आहे.
'''पैनगंगा अभयारण्य''' हे यवतमाळहून सुमारे १५० किमीवर आहे. यवतमाळ-उमरखेडमार्गे किंवा यवतमाळ-महागाव-ढाणकी-बिटरगावमार्गे पैनगंगा अभयारण्यास पोहोचता येते. या दोन्ही मार्गांवर एस.टी. बसेस मिळतात. उमरखेड किंवा ढाणकी बिटरगावहून खाजगी वाहने आणि ऑटोरिक्षाही उपलब्ध असतात. [[श्यामा कोलाम| श्यामा कोलामचीची]] टेकडी, मसलगा, दोधारी धबधबा, राजोबा देवस्थान, वाघ भुयार, एक शिवालय आणि सहस्रकुंड नावाचा धबधबा अशी येथील अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. मात्र, रस्ते, वाहने, वाटाडे वगैरे सोयी उपलब्ध नसल्याने पर्यटकांना सर्व ठिकाणी पोहोचणे शक्य होत नाही.
१००० ते १५०० मिलिमीटर पर्जन्यमान आणि आजूबाजूला पैनगंगा नदीचा जलाशय यामुळे या अभयारण्य परिसरातील साग, धावडा, गुळवेल, धामणवेल, मोईन, सूर्या, कदंब, मोहा, आवळा, बेहडा, चिंच इत्यादी अनेक वृक्ष आहेत. खस, तिरकडी, पवण्या, मारवेल, कुसळी यांसारखे उगवत असल्याने
हरीण, नीलगायी, चौसिंगा इत्यादी अनेक तृणभक्षी वन्यप्राणी अभयारण्यात मोठ्या संख्येत असतात. ह्या प्राण्यांची शिकार करूनच बिबटे, रानकुत्रे इत्यादी श्वापदही इथे राहतात. अभयारण्यात वनौषधींच्याही सुमारे २०० जाती येथे आहेत.
पैनगंगा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळच खरबी या गावी वनखात्याचे विश्रामगृह आहे. किनवट शहरात अनेक चांगली हॉटेल्स आहेत. उनकेश्वर येथेही एक विश्रामगृह आहे.
|