"नाग नदी (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
विदर्भातील एक नदी. याच नदीवर [[नागपूर]] शहर वसले आहे. दिल्लीचे नागरीकरण पाहून १८व्या शतकात गोंड राजा बख्त बुलंद शाहने छिंदवाडा जिल्ह्यातून वेगळे काढून नागपूर शहर नाग नदीच्या काठावर राजधानी म्हणून वसवले. या नदीला नागपूर शहराच्या हद्दीतच लहानमोठे २३५ नाले येऊन मिळतात. यांत पिवळी नदी, हत्ती नाला, सत्ती नाला, गड्डीगोदाम नाला, बाळाभाऊपेठ नाला, बुरड नाला, बोरियापुरा नाला, डोबीनगर नाला, लाकडीपूल नाला, तकिया नाला, नरेंद्रनगर नाला या मोठ्या नाल्यांचा समावेश होतो. सर्व नाल्यांचे घाणेरडे पाणी नदीत सोडल्यामुळे नाग नदीला नाल्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे एकूण १७ किलोमीटर लांबीची ही नदी आता जवळजवळ मृतप्राय झाली आहे. या नदीचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न चालू असतात.
|