"जे. कृष्णमूर्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छो "जे. कृष्णमुर्ती" हे पान "जे. कृष्णमूर्ती" मथळ्याखाली स्थानांतरित केले. |
No edit summary |
||
ओळ १:
जे. म्हणजे जद्दू कृष्णमूर्ती यांचा जन्म ११ मे १८९५ रोजी मदनपल्ले या खेड्यात (तमिळनाडू) झाला. जद्दू हे आडनाव. मध्यरात्री जन्म झाला व हे ८ वे बालक म्हणून कृष्णमूर्ती हे नाव ठेवले गेले. त्यांचे घराणे धार्मिक, सुशिक्षित. वडील नारायण अय्या थिआसफिस्ट व महसूल खात्यात सरकारी अधिकारी होते. आईचे नाव संजीवम्मा त्याही धार्मिक होत्या. जे. कृष्णमूर्तींचा स्वभाव उदार व गरिबांबद्दल करुणा बाळगणारा होता. ते धार्मिक वृत्तीचे, चिंतनशील, अंतर्मुख वृत्तीचे होते. त्यांचे बंधू नित्यानंद. निवृत्तीनंतर वडील मुलांसह अड्यारला राहावयास आले. सत्यापरता नाही धर्म हे थिआसफिस्ट संस्थेचे ध्येयवाक्य. डॉ. ऍनी बेझंट, लेडबीटर यांच्या मार्गदर्शनामुळे जे. कृष्णमूर्तींची आध्यात्मिक प्रगती बरीच झाली. जे. कृष्णमूर्तींनी जी टिपणे लिहून काढली, त्याचे प्रकाशन "ऍट दि फीट ऑफ दि मास्टर' या नावाने करण्यात आले. त्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली. "ऑर्डर ऑफ दि स्टार इन दि ईस्ट' या आंतरराष्ट्रीय संस्थेचे प्रमुख कृष्णमूर्ती होते. "हेराल्ड ऑफ दि स्टार' हे त्रैमासिकही कृष्णमूर्तींच्या संपादकत्वाखाली अड्यारमधून निघू लागले. त्यांचे निरागस, प्रेमळ, शांत व्यक्तिमत्त्व लोकांच्या डोळ्याला व मनाला शांती देत होते. ऍनी बेझंट यांच्यावर त्यांचे आईसारखे प्रेम होते; परंतु त्या स्वतःला त्यांच्या शिष्या मानू लागल्या. वयाच्या ८७ व्या वर्षीही त्यांच्यात दुर्दम्य उत्साह, ताजेपणा होता. कृष्णमूर्तींच्या मते मनुष्याच्या शारीरिक, मानसिक, भावनिक व बौद्धिक अशा सर्व शक्तींचा संपूर्ण विकास घडवून आणते ते खरे शिक्षण. त्यांच्या मते, आत्मज्ञान ही शहाणपणाची सुरवात आहे. ध्यान म्हणजे सहजावस्था, सहज समाधी, अखंड अनुसंधान. जे. कृष्णमूर्तींच्या शिकवणीत प्रेमाला श्रेष्ठ स्थान आहे. ते म्हणतात, "जगाची दुःखे दूर करण्याचा प्रेम हाच एकमेव उपाय आहे.' प्रेमात आसक्ती नसते.
{{विस्तार}}
|