"अजित भुरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
'''अजित भुरे'''(जन्म : १३ जानेवारी १९६१) हे एक मराठी अभिनेते नाट्य-चित्रनिर्माते, दिग्दर्शक, पार्श्वभाषक, लेखक आणि नाट्यसंस्थाचालक आहेत. त्यांनी व स्मृती शिंदें यांनी मिळून ’मालामाल’ ही दूरचित्रवाणी मालिकाही बनवली होती. रेस्टॉरन्ट या वेगळ्या पठडीतल्या मराठी सिनेमाची निर्मिती त्यांचीच होती. त्यांनी आयआयटी इंटरकॉलेजिएट एकांकिका स्पर्धेचे अनेक वर्षे आयोजन केले आहे. याशिवाय, अनेक मराठी आणि हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे.अजित भुरे हे फेडरल समांतर नाट्यमंचाचे सचिव आहेत. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीने अजित भुरे यांना तरुण दिग्दर्शक म्हणून मान्यता दिली आहे.
अजित भुरे यांचे शालेय शिक्षण मुंबईतील बालमोहन शाळेत आणि पुढील शिक्षण रूपारेल कॉलेजात झाले. तिथे त्यांना नाटकाची पहिली ओळख झाली. त्यांनी काम केलेली चित्रकथी ही एकांकिका आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत पहिली आली होती. त्या सुमारास इंडियन नॅशनल थिएटरतर्फे थिएटर ट्रेनिंग आणि रिसर्चचा डिप्लोमाचा अभ्यासक्रम चालवण्यात येत असे. कमलाकर सोनटक्के हे त्याचे डायरेक्टर होते. अजित भुरे त्या अभ्यासक्रमाला दाखल झाले. तिथे खऱ्या अर्थाने त्यांची नाटक या प्रकाराशी ओळख झाली. अभ्यासक्रमादरम्यान विविध मोठमोठ्या व अनुभवी लोकांनी घेतलेले पाठ ऐकून अजित भुरे यांना नाटकाविषयी खरोखरीची गोडी निर्माण झाली.
पुढे अजित भुरे आणि त्यांच्या काही मित्रमंडळींनी मिळून 'आंतरनाट्य' नावाची नाट्यसंस्था स्थापन केली. या संस्थेचे ’अनाहत’ नावाचे पहिले नाटक, राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पहिले आले. अंतिम फेरीत अजित भुरे यांना दिग्दर्शनाचे बक्षीस मिळाले. राजीव नाईक यांनी लिहिलेल्या, ऋग्वेदातील तीन संवादांवर आधारलेल्या 'अनाहत' या नाटकात, गाण्यांचा वापर होता.
Line ९ ⟶ ८:
वेगवेगळे आवाज काढण्याची हौस असल्याने अजित भुरे हे पार्श्वभाषक (डबिंग आणि व्हॉइसिंग आर्टिस्ट) म्हणूनही गाजले आहेत. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवात होणार्या कार्यक्रमांतून लहानपणी त्यांची ही हौस जोपासली गेली. दिलीप प्रभावळकरांच्या ’बोक्या सातबंडे’ या श्रुतिकेत अजित भुरे गोट्याच्या दादांची भूमिका करत.
अजित भुरे यांनी निर्मिती केलेल्या (१) (२) (३)सारखं छातीत दुखतंय, या नाटकांचे शंभरहून जास्त प्रयोग झाले आहेत. परेश रावळ काटकोन त्रिकोण गुजराथीत सादर करणार आहेत.
==अजित भुरे यांनी केलेल्या नाटकांतील भूमिका आणि नाटकाचे नाव==
|