"गोपाळ हरी देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''गोपाळ हरी देशमुख''' ऊर्फ '''लोकहितवादी''' ([[फेब्रुवारी १८]], [[इ.स. १८२३]] - [[इ.स. १८९२]]) हे [[इ.स.चे १९ वे शतक|इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात]] होऊन गेलेले [[मराठी भाषा|मराठी]] पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते. ''प्रभाकर'' नावाच्या साप्ताहिकातून ''लोकहितवादी'' या [[टोपणनावानुसार मराठी लेखक|टोपणनावाने]] यांनी समाजसुधारणाविषयक [[लोकहितवादींची शतपत्रे|शतपत्रे]] (वस्तुतः संख्येने १०८) लिहिली. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका ‘शतपत्रांचा इत्यर्थ‘ मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. मुळात संख्येने १०० असलेल्या या निबंधांत त्यांनी ‘संस्कृतविद्या‘, पुनर्विवाह‘, पंडितांची योग्यता‘, ‘खरा धर्म करण्याची आवश्यकता‘, ‘पुनर्विवाह आदी सुधारणा‘ ही पाच आणि अधिक तीन अशा आठ निबंधांची भर घातली.
 
== जीवन ==
ओळ १०:
रेव्हरंड जी.आर. ग्लीन यांच्या ‘हिस्टरी ऑफ द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया‘ या पुस्तकाच्या आधारे गोपाळराव देशमुखांनी इ.स.१८४२मध्ये, म्हणजे वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हिंदुस्थानचा इतिहास ‘हे पुस्तक लिहिले. पुस्तकाचे प्रकाशन मात्र इ.स.१८७८मध्ये झाले. इ.स. १८४८ पासून त्यांनी मुंबईहून निघणार्‍या ''प्रभाकर'' या साप्ताहिकात(संपादक :भाई महाजन), ''लोकहितवादी'' या नावाने लोकहितार्थ लेखन सुरू केले. त्या नावाने त्यांचा पहिला लेख त्या वर्षी १२मार्च रोजी प्रसिद्ध झाला. लेखाचा विषय होता..’इंग्लिश लोकांच्या व्यक्तिमात्राच्या गैरसमजुती’. याशिवाय, लोकहितवादींनी ‘एक ब्राह्मण‘ या नावानेही लिखाण केले आहे. त्या काळी लहान वयातच लग्न करून द्यायची प्रथा होती. लहान वयातील लग्नामुळे काय अडचणी होतात हे त्यांनी प्रभाकरमध्ये पत्र लिहून लोकांच्या नजरेस आणले. पुढील काळात त्यांनी अनेक समस्यांबाबत, विविध विषयांवर पत्रद्वारा लेखन केले.
 
इ.स. १८४८ ते इ.स. १८५० या काळात त्यांनी १०८ छोटे छोटे निबंध लिहिले. हेच निबंध ''[[लोकहितवादींची शतपत्रे]]'' नावाने ओळखले जातात. या शतपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाजसुधारणाविषयक विचार समाजासमोर मांडले. ही शतपत्रे ''प्रभाकर'' या साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, वाङ्मयीन, ऐतिहासिक इत्यादी विषयांवर त्यांनी लहानमोठे असे सुमारे ३६३९ ग्रंथ लिहिले. अनेक उत्कृष्ट इंग्रजी ग्रंथांचे मराठीत भाषांतर केले. ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश, लोकहितवादी इत्यादी नियतकालिके काढण्याच्या कामी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या लेखनातून लोकांच्या सर्वांगीण उन्नतीची तळमळ दिसून येते. जातिसंस्था हा देशाच्या उन्नती होण्याच्या मार्गातील मोठा अडसर आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या लेखनातून केले. "मातृभाषेतून शिक्षण" या तत्त्वाचाही त्यांनी प्रसार केला.
 
मराठीप्रमाणेच त्यांनी गुजरातीतही लिखाण केले आहे.
ओळ ३०:
* चरित्रे : (एकूण २ पुस्तके)
** पृथ्वीराज चव्हाण यांचा इतिहास (चांद बारदाई यांच्या ‘पृथ्वीराज रासो‘ नावाच्या इ.स.११९१मध्ये मूळ प्राकृत भाषेत लिहिल्या गेलेल्या काव्यावर आधारित, १८८३)
*** टीप: पृथ्वीराज चव्हाण इ.स. ११९२मध्ये लढाईत मारले गेले. म्हणजे ‘पृथ्वीराज रासो‘ त्यांच्यापृथ्वीराजांच्या हयातीत लिहिले गेले होते.
** पंडित स्वामी श्रीमद्‌दयानंद सरस्वती (१८८३)
 
* धार्मिक-नैतिक : (एकूण ७ पुस्तके)
** खोटी साक्ष आणि खोटी शपथ यांचा निषेध (१८५९)
** गीतातत्त्व (१८७८)
** सुभाषित अथवा सुबोध वचने (संस्कृत ग्रंथांतील सुभाषितांचे भाषांतर, १८७८)
** स्वाध्याय
** प्राचीन आर्यविद्यांचा क्रम, विचार आणि परीक्षण (१८८०)
** आश्वलायन गृह्यसूत्र (अनुवाद, १८८०)
** आगमप्रकाश (गुजराथी, १८८४). या ग्रंथाचे मराठी भाषांतर पुढे रघुनाथजी यांनी केले
 
* राज्यशास्त्र-अर्थशास्त्र : (एकूण ५ पुस्तके)
** लक्ष्मीज्ञान (क्लिफ्टच्या पॉलिटिकल इकॉनॉमी या पुस्तकाचे मराठी रूपांतर, १८४९)
** हिंदुस्थानात दरिद्रता येण्याची कारणे आणि त्याचा परिहार, व व्यापाराविषयी विचार (दादाभाई नौरोजी यांच्या ‘पॉव्हर्टी इन इंडिया’ या निबंधाच्या आधारे, १८७६)
** स्थानिक स्वराज्य व्यवस्था (१८८३)
** ग्रामरचना त्यातील व्यवस्था आणि त्यांची हल्लीची स्थिती (१८८३)
** स्वदेशी राज्ये व संस्थाने (१८८३)
 
* समाजचिंतन :(एकूण ५ पुस्तके)
** जातिभेद (१८८७)
** भिक्षुक (मुंबई आर्यसमाजात दिलेले व्याख्यान, १८७७)
** प्राचीन आर्यविद्या व रीती (१८७७)
** कलियुग (मुंबई आर्यसमाजात दिलेले व्याख्यान, १८७७)
** निबंधसंग्रह (शतपत्रे आणि इतर निबंध, १८६६)
 
* संकीर्ण : (एकूण पुस्तके)
** होळीविषयी उपदेश (१८४७)
** महाराष्ट्र देशातील कामगार लोकांशी संभाषण (१८४८)
 
==अन्य सामाजिक कार्य==