"फैयाज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →पुरस्कार |
|||
ओळ ५:
इ.स. १९६६पासून त्या मराठी नाटकांत कामे करीत आहेत. सोलापूरमध्ये आपल्या नाट्य कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या फैय्याज यांनी ‘गीत गायिले आसवांनी’ या नाट्यसंपदेचे भावंड असलेल्या विजयश्री प्रॉडक्शनच्या नाटकाद्वारे मुंबईच्या नाट्यसृष्टीत पदार्पण केले.
फैय्याज यांनी गद्य नाटके , संगीत नाटके , पार्श्वगायन , काव्यवाचन , संगीत शिक्षण , हिंदी-मराठी चित्रपट , मराठी मालिका , हिंदी मालिका अशा विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे. गेली अनेक वर्षे अविरतपणे त्या मराठी रंगभूमीची त्या मनोभावे सेवा करीत आहेत. त्यांना मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ कारकीर्द करणार्या नाट्यकलावंतांला मिळणारे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
त्यांनी निरनिराळ्या पिढीतल्या आणि वेगवेगळ्या स्कूल्सच्या लेखक-दिग्दर्शकांकडे वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. संगीत नाटके, सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक, विनोदी अशा सर्वच प्रकारच्या नाटकांतून त्यांनी काम केल्याने त्यांच्यावर एकच एक असा कोणताच शिक्का बसला नाही. गाण्यातही त्यांनी गजल, ठुमरी, लावणी, नाट्यय़संगीत असा चौफेर प्रवास केला. गायिका बेगम अख्तर यांच्या गंडाबंद शागीर्द बनण्याची संधी त्यांना चालून आली होती. परंतु त्यावेळी त्यांची नाट्यय़-कारकीर्द ऐन बहरात असल्याने ती सोडून लखनौला बेगम अख्तरांकडे गाणे शिकायला जाणे त्यांना शक्य झाले नाही. मात्र जेव्हा जेव्हा बेगम अख्तर मुंबईत येत तेव्हा त्गेव्हा त्या फैय्याज यांना गाणे शिकवीत.
ओळ ११:
‘अश्रूंची झाली फुले’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘मत्स्यगंधा’, ‘होनाजी बाळा’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘वेड्याचं घर उन्हात’, ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘गुंतता हृदय हे’, ‘पेइंग गेस्ट’ ते अलीकडच्या ‘मित्र’पर्यंतच्या नाटकांत फैय्याज यांच्या भूमिका आहेत. . ‘कट्यार’मधील झरीना तसेच ‘वीज म्हणाली धरतीला’तील जुलेखा या भूमिकांवर तर त्यांनी आपली अमीट नाममुद्रा उमटवली होती. ‘गुंतता हृदय हे’मध्ये कल्याणी साकारणाऱ्या फैय्याज यांनी ‘महानंदा’ चित्रपटात मानूची भूमिका तितक्याच ताकदीने जिवंत केली होती. यातून त्यांच्या अभिनयाची रेंज कळून येते. त्यांना डबिंग मास्टरही म्हटले जाई. ‘जाणता राजा’मध्ये त्यांनी गाणे व निवेदन केले आहे.
दादा कोंडके यांच्या ‘विच्छा’मध्ये साडेसातशे प्रयोगांत त्यांनी गाणी गायिली. . सी. रामचंद्र, वसंत देसाई, जयदेव, मदनमोहन, एस. डी. व आर. डी. बर्मन यांसारख्या संगीतकारांकडेही त्या गाणी गायल्या. पं. सी. आर. व्यास यांच्याकडे गाणे शिकलेल्या फैय्याजना पं. जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे
==चित्रपट==
|