"गणेश श्रीकृष्ण खापर्डे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो "दादासाहेब खापर्डे" हे पान "गणेश श्रीकृष्ण खापर्डे" मथळ्याखाली स्थानांतरित केले. |
No edit summary |
||
ओळ १:
गणेश श्रीकृष्ण ऊर्फ दादासाहेब खापर्डे(जन्म : इंगरोली, २७ ऑगस्ट १८५४; मृत्यू : १ जुलै १९३८) हे एक विख्यात भारतीय मराठी वकील, विद्वान, राजकीय चळवळींशी संबंध असणारे मराठी गृहस्थ होते. त्यांचा जन्म वर्हाडमधल्या इंगरोली या गावात झाला होता. कायद्याचे शिक्षण घेण्यापूर्वी त्यांनी संस्कृत आणि इंग्रजी वाङ्मय अभ्यासले होते. कायद्याची एल्एल.बी. ही परीक्षा पास झाल्यानंतर ते वर्हाडमध्येच इ.स. १८८५ ते १८९० या सालांत आधी मुन्सिफ या पदावर, व नंतर उपायुक्त म्हणून सरकारी नोकरी करू लागले. लोकमान्य टिळ्कांशी घनिष्ट संबंध आणि राजकारणात रस असल्याने त्यांनी सरकारी नोकरी सोडून अमरावतीला वकिली सुरू केली. १८९७मध्ये अमरावतीला भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या स्वागत समितीचे ते अध्यक्ष होते. कलकत्यात काँग्रेसने भरवलेल्या शिवाजी उत्सवात ते टिळकांबरोबर हजर होते. टिळकांचे एकनिष्ठ विश्वासू सहकारी असल्याने, दादासाहेब खापर्डे हे लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक व बिपिनचंद्र पाल या त्रयीचे नेतृत्व असलेल्या काँग्रेसमधल्या जहाल गटात सामील होते. त्यांच्या कणखर व असामान्य व्यक्तिमत्त्वाचा मध्य प्रांतात दरारा असल्याने तेथे ते वर्हाडचे नबाब म्हणून ओळखले जात. दादासाहेब खापर्डे हे लंडनमधल्या प्रिव्ही काउन्सिलमध्ये १९०८ ते १९१० या काळात चाललेल्या हे टिळकांवरच्या खटल्यात त्यांचे वकील होते.
दादासाहेब खापर्डे शिरडीच्या साईबाबांचे भक्त होते. डिसेंबर १९१०मध्ये ते साईबाबांना भेटले आणि त्यानंतर १९१८पर्यंत त्यांनी त्यांच्या शिरडीभेटीच्या हकीकती रोजनिशीत नोंदून ठेवल्या आहेत. त्या नोंदींवरून साईबाबांची दिनचर्या, त्यांचे आयुष्य व त्यांचे काम कसे चाले यांवर पुरेसा प्रकाश टाकता आला आहे.
खापर्डे यांना नाट्यसृष्टीबद्दल आकर्षण होते. अमरावतीत असताना त्यांनी जयध्वज, कांचनगडची मोहना आणि त्राटिका या नाटकांच्या तालमींना मार्गदर्शन केले होते. ते इ.स. १९०५ मध्ये मुंबई येथे भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
१ जुलै १९३८ रोजी दादासाहेब खापर्डे यांचे निधन झाले. त्याचे चिरंजीव बाळकृष्ण गणेश खापर्डे हेही चांगले वकील आणि राजकीय पुढारी होते.
|