"शतपथ ब्राह्मण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ५:
यजुर्वेदामध्ये पुरुषरूप अग्नीची अग्निचयन नामक पूजा सांगितली आहे. परमपुरुष किंवा विश्वपुरुष अग्नीच आहे अशी भावना अग्निचयनात आहे. तैत्तिरीय संहिता, काठक संहिता, कापिष्ठल संहिता, मैत्रायणी संहिता, वाजसेनीय संहिता, तैत्तिरीय ब्राह्मण, तैत्तिरीय आरण्यक व '''शतपथ ब्राह्मण''' यात अग्निचयनाचा विधी विस्ताराने वर्णिला आहे. अग्निचयनात वैश्वानरहोम सांगितला आहे या वैश्वानराचे स्वरूप भू, अंतरिक्ष व द्युलोक म्हणजे त्रैलोक्य होय, असे '''शतपथ ब्राह्मणात''' (९।३।१।३) वर्णिले आहे. अग्निरहस्य नामक '''शतपथ ब्राह्मणाचे''' दहावे कांड आहे. त्यात अग्निचयनातील वैश्वानराचे स्वरूप सांगितले आहे. ते असे:--"द्युलोक त्याचे शिर, आदित्य त्याचा चक्षु, वायु त्याचा प्राण, आकाश त्याचे शरीर, जल त्याची वस्ती व पृथ्वी त्याचे पाय होत."
इतिहासपुराणांचा आरंभ अथर्ववेदकालापासून झाला असे सांगता येते. ब्र्ह्मयज्ञात करावयाच्या इतिहास व पुराण यांच्या पठणाचे फल '''शतपथ ब्राह्मणात''' (११।५।७।९) सांगितले आहे. महाभारताला (जय नावाचा) इतिहास ही संज्ञा आहे. अश्वमेघ यज्ञात पारिप्लवाख्याने सांगण्याचा विधी (१३।४।३)येथे वर्णिला आहे. त्यावरून पुराणांची उत्पत्ती यज्ञमंडपात यज्ञाचे अंग म्हणून कशी झाली ते नीट रीतीने समजून येते. अश्वमेधात अश्व सोडल्यापासून तो दिग्विजय करून परत येईपर्यंत मध्ये वर्षाचा काळ जातो. या काळात ही आख्याने यजमानास सांगावयाची असतात. अश्व सोडल्यावर वेदीच्या भोवती ऋत्विज बसतात, सोनेरी जरीच्या गादीवर 'होता', ब्रह्मा व उद्गाता हे बसतात, सोनेरी कूर्चावर यजमान बसतो व अर्ध्वर्यू सोनेरी चौरंगावर बसतो. हे सर्वजण बसल्यावर अर्ध्वर्यू होत्यास 'भूतानि आचक्ष्व । भूतेषु इमं यजमानम् अध्यूह ।'--'इतिहास सांग, इतिहासामध्ये या यजमानाला रमव' अशी सूचना देतो. या इतिहासालाच पारिप्लवाख्याने म्हणजे पुनः पुनः सांगावयाच्या कथा असे म्हणतात. वीणेवर श्लोकात्मक चरित्र गाणार्यांना 'होता' पहिल्या दिवसाचा कथाविषय दर्शित करतो; आणि त्यांना सांगतो की यजमानाला प्राचीन सत्कर्म करण्यार्या राजांचे गुणगान करून दाखवा. अशा तर्हेने ते गातात की की त्या भूतकाळाच्या राजांबरोबर यजमान एकात्मता अनुभवतो. संध्याकाळी हवन चालू असता वीणेवर गाणारा क्षत्रिय उच्च स्वरात स्वतः तयार केलेली तीन युद्धवर्णनपर गाणी गाऊन दाखवतो. असा हा कार्यक्रम रोज वर्षभर चालतो. '''शतपथ ब्राह्मणात''' पारिप्लवाची विस्तृत व्याख्या सांगितली आहे.
ब्रह्म हे अंतिम सत्य आहे या अथर्ववेदीय विचाराचा ऐतरीय ब्राह्मण (४०।५), '''शतपथ ब्राह्मण''' (१०।३।५; ११।२।३) व तैत्तिरीय ब्राह्मण (२।८।८।९; २।८।९।७) यांच्यावर खोल परिणाम झालेला दिसून येतो.
नैतिक जबाबदारीच्या कल्पनेच्या मुळाशी वेदात सांगितलेली ऋण ही कल्पना आहे. तैत्तिरीय संहितेत (६।३।१०।५) म्हटले आहे की, "जन्माला येणारा ब्राह्मण तीन ऋणांसह जन्मतो. ऋषीचे ऋण ब्रह्मचर्याने, देवांचे यज्ञाने व पितरांचे ऋण प्रजोत्पादनाने फेडता येते." '''शतपथ ब्राह्मणात''' (१।७।२।१) हाच सिद्धांत ब्राह्मण शब्दाऐवजी मनुष्यमात्रांबद्दल सांगितला आहे. त्यात दुसरी सुधारणा अशी की या तीन ऋणांशिवाय मनुष्यऋण असे चौथे ऋण असल्याचे म्हटले आहे. --"जो अस्तित्वात येतो तो ऋणी असतो. देव, ऋषी, पितर व मनुष्य यांचे ऋण त्याला जन्मतः असते. देवांचे ऋण यज्ञाने व होमाने फिटते. अध्ययन केल्याने ऋषींचे ऋण फेडता येते.
|