"शतपथ ब्राह्मण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ७:
ब्रह्म हे अंतिम सत्य आहे या अथर्ववेदीय विचाराचा ऐतरीय ब्राह्मण (४०।५), '''शतपथ ब्राह्मण''' (१०।३।५; ११।२।३) व तैत्तिरीय ब्राह्मण (२।८।८।९; २।८।९।७) यांच्यावर खोल परिणाम झालेला दिसून येतो.
नैतिक जबाबदारीच्या कल्पनेच्या मुळाशी वेदात सांगितलेली ऋण ही कल्पना आहे. तैत्तिरीय संहितेत (६।३।१०।५) म्हटले आहे की, "जन्माला येणारा ब्राह्मण तीन ऋणांसह जन्मतो. ऋषीचे ऋण ब्रह्मचर्याने, देवांचे यज्ञाने व पितरांचे ऋण प्रजोत्पादनाने फेडता येते." शतपथ ब्राह्मणात (१।७।२।१) हाच सिद्धांत ब्राह्मण शब्दाऐवजी मनुष्यमात्रांबद्दल सांगितला आहे. त्यात दुसरी सुधारणा अशी की या तीन ऋणांशिवाय मनुष्यऋण असे चौथे ऋण असल्याचे म्हटले आहे. --"जो अस्तित्वात येतो तो ऋणी असतो. देव, ऋषी, पितर व मनुष्य यांचे ऋण त्याला जन्मतः असते. देवांचे ऋण यज्ञाने व होमाने फिटते. अध्ययन केल्याने ऋषींचे ऋण फेडता येते. अनूचानास(विद्वानास) ऋषींचा निधिगोप (निधिरक्षक) असे म्हणतात. संतत व अविच्छिन्न प्रजेची निर्मिती झाल्याने पितरांच्या ऋणातून मुक्ती मिळते. माणसांना अन्न व वस्त्र यांचे दान केल्याने मनुष्यऋण फिटते. जो ही सर्व कर्तव्ये करतो तो कृतकृत्य होतो. त्याने सर्व मिळवले, सर्व जिंकले असेच म्हटले पाहिजे.(१।७।२।१।-६)
शरीरशास्त्र, गर्भविज्ञान आणि निदानासह आरोग्य चिकित्सा या तीन शाखांचा वेदकाली प्रारंभ झाला होता. याची गमके वैदिक ब्राह्मणात सापडतात. '''शतपथ ब्राह्मण''' (कांड १० व ११) आणि अथर्ववेद (१०-२) यात मानवी शरीराची हाडे व अवयव पद्धतशीर रीतीने मोजून सांगितले आहेत. '''शतपथ ब्राह्मणात''' माणसाच्या शरीरात ३६० अस्थी असतात असे सांगितले आहे. यजुर्वेद संहितांमध्ये शरीराच्या अवयवांची तपशीलवार नावेही सांगितली आहेत.
|