'''आन्देस''' (प्रचलित इंग्लिश उच्चारः अँडीझ, [[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]: ''Cordillera de los Andes'', [[क्वेचुआ भाषा|क्वेचुआ]]: ''आन्तिस कुना'') ही [[पृथ्वी]]वरीलच्या पृष्ठभागावरील सर्वात लांब [[पर्वतरांग]] आहे.<ref> मात्र, [[समुद्र]]ाखालील पर्वतरांगा वगळून. ह्या विचारात घ्यायच्या म्हटल्याघेतल्या तर सुमारे ६५,००० किमी लांबीची [[मध्य-अटलांटिक पर्वतरांग|मध्य-अटलांटिक]] ही [[अटलांटिक महासागर]]ाखालील पर्वतरांग ही पृथ्वीवरील सर्वात लांब पर्वतरांग आहे.</ref> सुमारे {{convert| 7000|km|mi|abbr=on}} लांबीची व सुमारे {{convert|200|km|mi|abbr=on}} ते {{convert|700|km|mi|abbr=on}} रूंद असलेली अॅन्डीज ही पर्वतरांग दक्षिणोत्तर दिशेने [[दक्षिण अमेरिका|दक्षिण अमेरिकेच्या]] पश्चिम समुद्रकिनार्याला समांतर धावते. आन्देस [[व्हेनेझुएला]], [[कोलंबिया]], [[पेरू (देश)|पेरू]], [[बोलिव्हिया]], [[इक्वेडोर]] [[चिली]] व [[आर्जेन्टिना]] ह्या सात देशांचादेशांमध्ये भागअॅन्डीज आहेपर्वत रांगेचा काही ना काही हिस्सा येतो.
आन्देस पर्वतरांगेची सरासरी उंची {{convert|4000|m|ft|abbr=on}} इतकी असून ती [[आशिया]] खंडाच्या बाहेरील सर्वात उंच पर्वतरांग आहे. तिच्यावरील आल्तिप्लानो हेनावाचे पठार [[तिबेटचे पठार|तिबेटच्या पठाराखालोखाल]] जगातील दुसर्या क्रमांकाचे उंच पठार आहे. [[अॅकोनकाग्वा]] हे {{convert|6962|m|ft|abbr=on}} इतक्या उंचीवरील शिखर आन्देसमधील सर्वात उंच स्थान आहे. [[ला पाझ]], [[क्वितो]], [[बोगोता]], [[अरेकिपा]], [[सुक्रे]], [[मेदेयीन]] ही [[लॅटिन अमेरिका |लॅटिन अमेरिकेतील]] महत्वाचीमहत्त्वाची शहरे आन्देसमध्येच वसली आहेत.