पद्मिनीला सयुज्यता असेही नाव आहे. सयुज्यता ही मोक्षाची पहिली पायरी समजली जाते. बाकीच्या तीन पायर्या अनुक्रमे समीप्यता, सरूपता व सलोकता.
'''पद्मिनीचे गुणविशेष :''' तिचा चेहरा नेहमी पूर्ण चंद्राप्रमाणे प्रफुल्लित असतो. तिचे मांसल शरीर सिरसासारखेसरसासारखे किंवा मोहरीच्या फुलांसारखे मुलायम असते. त्वचा पातळ, नाजुक आणि पीतकमलासारखी गोरी असते. ती क्वचित सावळी असली तरी काळी कुळकुळीत नसते. तिच्या सावळा रंगाला पाऊस पाडायला उत्सुक असलेल्या ढगाच्या जांभळट रंगाची तारुण्याची झळाळी असते. तिचे तेजस्वी डोळे वासराच्या डोळ्यांसारखे सुरेख, रेखीव असून डोळ्याचे कोपरे लालसर असतात. तिचे उरोज घट्ट, भरलेले आणि उंचसर असतात. तिचा गळा शंखाकार असून नितळ आणि पारदर्शक असतो. तिचे नाक सरळ आणि आकर्षक असते. तिच्या कमरेवर सुरकुत्यांच्या तीन घड्या असतात. ती चालताना हंसासारखी मंद चालते. तिचा आवाज हळू आणि कोकिळेच्या संगीतासारखा सुस्वर असतो. तिला पांढरे शुभ्र उंची कपडे आणि छोटी नाजुक रत्ने आनंदित करतात. तिची झोप हलकी असते. ती हुशार, चाणाक्ष आणि आतिथ्यशील असते. तिचे व्यक्तिमत्त्व आदर वाटावे असे असते. ती वृत्तीने धार्मिक असून देवपूजेत रमते. आणि म्हणूनच तिला धार्मिक विषयांवरील चर्चेत रस असतो.