"आंदोलने आणि चौक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४४:
 
==ट्रॅफेलगार चौक (लंडन-इंग्लंड)==
लंडन शहराच्या मध्यभागी असलेल्या या चौकात एकोणिसाव्या शतकात लोक समारंभ आणि निदर्शने या दोन्ही गोष्टींसाठी जमा होत असत. १९ नोव्हेंबर १८८७ रोजी येथे चार हजारच्या संख्येत असलेल्या पोलिसांनी सुमारे दहा हजार निदर्शकांवर लाठीमार आणि गोळीबार केला होता, त्यांत कित्येक लोकांचा मृत्यू झाला व अनेक जखमी झाले. निदर्शनांमध्ये बेरोजगार, समाजवादी, आयर्लंडच्या स्वातंत्र्याची मागणी करणारे, काही उदारमतवादी आणि अन्य असंतुष्ट लोकांनी भाग घेतला होता. इ.स. २०१० मध्ये विद्यापीठांत शुल्कवाढीविरुद्ध झालेली निदर्शने याच ट्रॅफेलगार चौकात झाली होती.
 
==इंडिपेन्डन्स चौक (कीव-युक्रेन)==