"रामचंद्र द्विवेदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''रामचंद्र द्विवेदी''' ऊर्फ '''कवी प्रदीप''' (६ फेब्रुवारी, इ.स. १९१५ - ११ डिसेंबर, इ.स. १९९८) हे [[हिंदी भाषा|हिंदी भाषेतील]] चित्रपटसृष्टीतील [[गीतलेखक]], कवी आणि गायक होते.
 
== जीवन ==
रामचंद्र द्विवेदींचा जन्म [[मध्य प्रदेश]]मधील बडनगर येथे झाला होता. [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धाच्या]] काळात हिमांशु राय आणि देविका रानी यांच्या बाँबे टॉकीजची सूत्रे शशधर मुखर्जींच्या हातात गेली. शशधर मुखर्जी हे प्रतिभा पारखण्यात उस्ताद होते. त्यांनी कवी प्रदीपांना आमंत्रित करून त्यांच्याकडून [[किस्मत]], [[कंगन]], [[बंधन]], [[झूला]] आदी चित्रपटांची गीते लिहवून घेतली. ब्रिटिशांच्या चित्रपट समीक्षण मंडळाच्या डोळ्यात धूळ फेकणारे प्रदीप यांचे ''दूर हटो ये दुनियावाले, हिदुस्तान हमारा है'' हे किस्मत चित्रपटातले गीत तुफान गाजले. बहुधा त्या वेळी लंडनमध्ये होणार्‍या बाँबहल्ल्यांमुळे ब्रिटिशांचे सेन्सॉर बोर्डाच्या कामकाजात लक्ष नव्हते{{संदर्भ हवा}}. कवी प्रदीप यांच्या अटकेचे वॉरंट निघणार त्याआधीच ते गीत इतक्या लोकांच्या कानी पडले आणि असंख्य मुखांतून गायले जाऊ लागले, की अटक होताहोता टळली. प्रदीप याच्या रचनांत देशभक्ती आणि देशवासीयांमधे जागृती निर्माण करण्याची तळमळ होती. त्यांच्या स्वदेशावरील प्रेमापोटी त्यांनी असंख्य देशभक्तिपर गीते आणि कविता रचल्या. त्या कविता वाचून अनेकजणांचे रक्त उसळत असे. परकीय भारतात त्यांना आपल्या कवितांसाठी सतत अटकेची भीती वाटे. त्यांना अटक टाळण्यासाठी काही वेळा भूमिगत व्हावे लागले होते.
 
कवी प्रदीप यांनी कबीर आणि गालिब यांचे साहित्य वाचले होते. तसेच शैलेंद्र आणि [[साहिर लुधियानवी]] यांच्या काव्याशी ते चांगले परिचित होते. पण प्रदीप यांचा पिंड अस्सल भारतीय होता.