[[महाराष्ट्र]] आणि [[गुजरात]] राज्यांतील नामकरण पद्धतीमध्ये मधले नाव वडिलांचे किंवा पतीचे ठेवले जाते. उदाहारण: [[सचिन तेंडुलकर|सचिन रमेश तेंडुलकर]] या क्रिकेटपटूच्या नावातील पहिले नाव "सचिन", मधले नाव "रमेश" हे वडिलांचे नाव तर "तेंडुलकर" हे आडनाव आहे.
परंपरेनुसार स्त्रिया लग्नानंतर परंपरेनुसार पतीचे नाव व आडनाव वापरतात. महाराष्ट्रात नातवाला आजोबांचे नाव देण्याची पद्धत एकेकाळी होती/आहे. गुजरातमध्ये नावानंतर भाई (पुरुषांसाठी) किंवा बेन (स्त्रियांसाठी) लावण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रात काही समाजात पुरुषांच्या नावांना राव तर स्त्रियांच्या नावांनंतर बाई/ताई लावले जाते.
मराठीतील कर-अंती आडनावे गावांच्या नावावरून पडली आहेत. माडगुळकर ([[माडगुळ]] गावावरून, वेंगसरकर, गावसकर, बांदेकर वगैरे. बाकीची नेहेमी आढळणारी आडनावे: पाटील, शिंदेकुलकर्णी, जाधवजोशी, भोसलेदेशपांडे, कुलकर्णीदेशमुख, जोशीसुतार, देशपांडेवाणी ही नावे, देशमुखती माणसे एकेकाळी करत असलेल्या व्यवसायावरून किंवा गावातील पदावरून पडली आहेत, तर शिंदे, जाधव, भोसले, कांबळे हीया नावाच्या उत्पत्त्या भिन्नभिन्न आहेत.
गुजरातमधील काही आडनावे "वाला"-अंती असतात. ती गावावरून किंवा व्यवसायावरुनव्यवसायावरून पडलेली आहेत. लंडनवाला, मेहवाला, लकडावाला वगैरे. बाकीची नेहेमी आढळणारी आडनावे: मेहता, पटेल, शाह, देसाई, पारेख वगैरे. यांतलीही काही व्यवसायावरून पडली आहेत.