"अशोक वृक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ११:
अशोकवनात रावणाच्या बंदिवासात असलेली सीता याच वृक्षाखाली बसली होती. फुले येण्याच्या बाबतीत हा वृक्ष फार लहरी आहे. फुलण्याचा काळ शरद ऋतूपासून ग्रीष्म ऋतूपर्यंत मागेपुढे होऊ शकतो. म्हणूनच बहुधा सुंदर स्त्रियांच्या लत्ताप्रहारांनी हा फुलतो अशी कविकल्पना आहे.
*संस्कृत: अशोकः, वञ्जुलः, कान्ताङ्घ्रिः, नारीपाद्स्पर्शः, दोहदम्, पुष्पोद्गमौषधम्(+ वर दिलेली नावे)
*हिंदी : अशोक, अंपिच
*बंगाली : अशोक
*गुजराथी: अशोपालव
*मल्याळम : अशोका, हेमपुष्पम्
*तामिळ: अशोगम्
*उडिया :
*तेलुगू
*इंग्रजी : Asoka
*लॅटिन-
ओळ २७:
हा संयुक्त पाने असलेला घनदाट छाया देणारा डेरेदार छोटा वृक्ष बाराही महिने हिरवागार असतो. याची जाडसर पाने ७ ते २५ सेंटिमीटर लांब असतात. पर्णदलाच्या ४ ते ६ जोड्या असतात. फुले गर्द नारिंगी-तांबड्या रंगांची झुपक्याझुपक्यांनी असतात. फळे १५ ते २५ सेंटिमीटर लांब व सपाट असतात. एकेका फळात(शेंगेत) ४ ते ८ बिया असतात, पण पिकलेले बी एखादेच असते. बिया रुजायला फार वेळ लागतो अनेक बिया पेराव्यात तेव्हा त्यांतली एखादीच रुजते. त्यांतली चार रोपे ४-५ वर्षे सांभाळली की एखादा वृक्ष तयार होतो.
==पानांचा अशोक==
पानांचा अशोक किंवा हरित अशोक हे फुलांच्या अशोकापेक्षा वेगळे झाड आहे, त्याचे शास्त्रीय नाव आहे Polyalthia longifolia. हिंदी-बंगालीत देवदारु म्हणतात. हे झाड म्हणजे, ज्याच्या लाकडापासून घरगुती लाकडी सामान बनते ते देवदार(Cedrus deodara)नामक झाड नाही! मल्याळीत पानाच्या अशोकाला चोरुणा म्हणतात.
===उत्पत्तिस्थान===
|