"वार (काल)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ३:
एका आठवड्यात सात वार असतात. पंचांगाच्या पाच अंगांपैकी एक ‘वार’ आहे. असे असले तरी वार आणि आठवडा या संकल्पना आपण ग्रीकांकडून घेतल्या असे एक मत मांडले जाते.{{संदर्भ हवा}} हिंदू पद्धतीत पंधरवड्यातील दिवसांना तिथींची नावे होती, पण आठवड्याच्या दिवसांना नव्हती असे निरीक्षण केल्याने हा विचार मांडला जात असावा. [[आर्यभट्ट]] (इसवी सनाचे चौथे किंवा सहावे शतक) या विद्वान [[ज्योतिर्विद]] व खगोलशास्त्रज्ञाने वारांच्या क्रमवारीनुसार त्यांची संस्कृत नावे प्रचलित केली, असे मानले जाते.{{संदर्भ हवा}}
==शं.बा.दीक्षित यांचे मत==
भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास या शंकर बाळकृष्ण दीक्षित यांनी १८९६ साली
लिहिलेल्या ग्रंथात पृष्ठ १०८ (वरदा बुक्स आवृत्ती १९८९) मध्ये ते म्हणत्तात," सर्व भारत(महाभारत)
मी स्वतः ज्योतिषदृष्टीने वाचले आहे, त्यात मला सात वार आणि मेषादि राशी कोठे आढळ्ल्या
नाहीत." "शकापूर्वी ५०० च्या सुमारास मेषादि संज्ञा आमच्या देशात प्रचारत आल्या आणि
त्यापूर्वी सुमरे ५०० वर्षे वार आले असावे" वार आणि राशी या खाल्डियन,इजिप्शियन वा ग्रीक
संस्कृतींकडून आपल्याकडे आल्या असे त्यांचे मत आहे.या ग्रंथाची महती सांगताना
श्री.कृ.कोल्हटकर आपल्या प्रशंसनात म्हणतात, "डॉ.थीबोसारखा विद्वान पाश्चात्य ज्योतिषी हे पुस्तक
मुळातून वाचण्यासाठी मुद्दाम मराठी शिकला" हा ग्रंथ खरोखर अद्वितीय आहे.
==आर्यभट्ट
'''आ मंदात् शीघ्रपर्यंतम् होरेशा:''' मंदग्रह ते शीघ्र ग्रह पुढील प्रमाणे आहेत - शनी, गुरू, मंगळ , रवि, शुक्र, बुध, चंद्र.
एका दिवसाचे २४ होरे असतात. होरा म्हणजे तास. प्रत्येक होरा एका एका ग्रहाला दिलेला असतो. सूर्योदयाच्या वेळेस ज्या ग्रहाचा होरा असतो त्याचे नाव त्या दिवशीच्या वारास दिलेले असते.
|