"गंगूबाई हनगळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ५१:
भारत सरकारने त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी अलंकृत केले होते. त्यांना एकूण पन्नासहून अधिक पुरस्कार मिळाले होते. त्यात संगीत नाटक अकादमी पुरस्कार, चार मानद डॉक्टरेट, २४ पुरस्कार यांचा समावेश आहे. किमान नऊवेळा पंतप्रधान व पाचवेळा राष्ट्रपतींकडून त्यांचा खास गौरव झाला होता. पाचवी इयत्ता शिकलेल्या गंगूबाईंनी संगीताच्या मानद प्राध्यापिका म्हणून काम केले. धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठाच्या त्या सिनेट सदस्या होत्या. देशात व देशाबाहेर त्यांनी अनेक संगीत मैफली गाजवल्या. भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी त्यांनी देशभरातील सुमारे २०० शाळा-महाविद्यालयांतून कार्यक्रम केले.
==उपाधी==
जनतेने आणि संस्थांनी त्यांना अनेक उपाधी(पदव्या) बहाल केल्या होत्या. त्यांतल्या काही अश्या :
* अंबासुता गंगा
* अमृतगंगा
* आधुनिक संगीत शबरी
* कन्नड कुलतिलक
* गानगंगामयी
* गानगंधर्व गंगागीत विद्याअमृतवर्षिणी
* गानरत्न
* गानसरस्वती
* गुरुगंधर्व
* नादब्रह्मिणी
* भारतीकांता
* रागभूषण
* रागरागेश्वरी
* संगीतकलारत्न
* संगीतकल्पद्रुम
* संगीतचिंतामणी
* संगीतरत्न
* संगीतशिरोमणी
* संगीतसम्राज्ञी
* संगीतसरस्वती
* सप्तगिरी संगीतविद्वानमणी
* स्वरचिंतामणी
* स्वरसरस्वती
* श्रीगंगामुक्तामणी
[[वर्ग:हिंदुस्तानी गायक]]
[[वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते]]
|