"सदस्य चर्चा:KiranBOT II/typos" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो added rule 5.5
ओळ १४५:
 
:: आपण " केनिया "→ " केन्या " असे रूपांतर करू शकतो. (space at the both end). तसे केले तर केनियाची सामान्यरूपे तशीच राहतील. म्हणजे “भारताने केनियाला हरविले” हे वाक्य "भारताने केन्याला हरविले” असे होणार नाही. पण "भारताविरुद्ध केनिया विजयी” हे वाक्य "भारताविरुद्ध केन्या विजयी” असे बदलले जाईल. असे केले की काही ठिकाणी "केनिया” तर काही ठिकाणी "केन्या” दिसेल - त्याने गोंधळात अधिक वाढ होईल व ते प्रमाण लेखनाच्या दृष्टीने देखील चुकीचे ठरेल. करायचे तर '''सर्व ठिकाणी''' केनियाचे केन्या करा नाहीतर ते तसेच ठेवा. केनिया बदलताना हर्केनिया चे हर्केन्या झाले ही अपवादात्मक चूक होती. त्यासाठी हवे तर "हर्केन्या - हर्केनिया" अशी एक रिव्हर्स एंट्री टाका. अशी दोन-चार पानेच आहेत. या व्यतिरिक्त इतर काही अपवादात्मक शब्द वापरलेले गेलेले नाहीत. त्यामुळे पोलीसा > पोलिसा हा बदल देखील निश्चिंतपणे करू शकता. [[https://shantanuo.livejournal.com/103367.html या पानावर]] दिलेल्या लिनक्स कमांडने आपण ही खात्री करून घेऊ शकता. [[सदस्य:Shantanuo|Shantanuo]] ([[सदस्य चर्चा:Shantanuo|चर्चा]]) ११:२०, २२ मार्च २०२२ (IST)
 
==Corrections as per Rule 5.5==
 
समासाचे पूर्वपद तत्सम ऱ्हस्वान्त असेल तर ते ऱ्हस्वान्तच लिहावे. [[शुद्धलेखनाचे_नियम#नियम_५.५|शुद्धलेखनाचे_नियम#नियम_५.५]]
 
गुरु आणि विष्णु हे शब्द "तत्सम ऱ्हस्वान्त" असल्याने पूर्वपदावर आल्यास ऱ्हस्वान्तच लिहावे लागतात. तिथे दीर्घ करून चालणार नाही. उदा. विष्णुनारायण, विष्णुसहस्रनाम यातील ष्णु दीर्घ नाही. तसेच राजगुरुनगर, गुरुचरित्र, गुरुजी, गुरुदेव यातील रु दीर्घ नाही. परंतु ''कुलगुरुचे'' हा शब्द ''कुलगुरूचे'' असा दीर्घ हवा. कारण गुरू शब्द त्यात पूर्वपदावर नाही. पण ''कुलगुरुपदाचे'' हा शब्द ''कुलगुरूपदाचे'' असा दीर्घ नको. कारण त्यात गुरु शब्द पूर्वपदावर आहे. अशा अतरंगी नियमामुळे हे दोन शब्द बॉटद्वारे बदलणे कठीण आहे. खाली दिलेला बदल करून देखील काही शब्द मॅन्युअली बदलावे लागतील.
 
* "गुरु " → "गुरू " (note the space)
* "विष्णु " → "विष्णू " (note the space)
* "सुरु " → "सुरू " (note the space)
 
नाहीतर सुरुवात, सुरुंग, नसुरुद्दीन असे शब्द तसेच तसुरुमारू, त्सुरुगाका असे परभाषेतले शब्दही बदलले जातील. तसे होऊ नये म्हणून स्पेस वापरावी. [[सदस्य:Shantanuo|Shantanuo]] ([[सदस्य चर्चा:Shantanuo|चर्चा]]) १०:५८, २४ मार्च २०२२ (IST)
Return to the user page of "KiranBOT II/typos".