"सुनील चिंचोलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ६:
[[रामदास स्वामी]]ंच्या [[दासबोध]] ग्रंथातील शिकवण सशक्त राष्ट्र उभारणीसाठी आजही उपयुक्त आहे. म्हणून सामान्य लोकांपर्यंत ती पोहोचावी यासाठी अगदी कमी किंमतीत [[दासबोध|दासबोधाची]] आवृत्ती काढण्याची चिंचोलकरांची खूप इच्छा होती. चिंचोलकरांच्या मृत्यूनंतर डाॅ. अशोक कामत यांनी चांगला कागद. चांगली छपाई, चांगली मांडणी, चांगली पुस्तक-बांधणी यांसह हा ग्रंथ फक्त १०० रुपयांत उपलब्ध करून दिला आणि आपल्या मित्राची इच्छा पूर्ण केली. या ग्रंथाच्या शेवटी विस्तृत शब्दकोश दिला आहे.
लेखक आणि वक्ता दोन्ही गुण एकाच व्यक्तीत असणे हा तसा दुर्मिळ योग. हा योग समर्थव्रती सुनील चिंचोलकर यांच्यामध्ये पाहायला मिळत होता. १९७२ पासून संतचरित्रांचा अभ्यास हाच त्यांचा ध्यास आणि श्वासही होता. लेखन, प्रवचन हे सुनील चिंचोलकर यांनी व्रत म्हणून अखंडपणे जोपासले होते. त्याचा प्रत्यय प्रस्तुत ग्रंथातून येतो. श्रीसमर्थ रामदासस्वामी हे सुनीलजींचे प्रेरणास्थान आणि ग्रंथराज दासबोध हा त्यांचा प्राण होता. विविध उपक्रमांमधून लोकांपर्यंत त्यांनी हे विचार पोहोचवले. तरीही त्यांना असे वाटत होते की, कोणतातरी मोठा प्रकल्प करायला हवा त्या प्रेरणेतून संपूर्ण दासबोध ग्रंथ अर्थ विवरणासह लिहिण्याचा संकल्प आकाराला आला. कोणतेही काम असो ते समर्थनिष्ठेने पार पडणे हे सुनीलजींनी घेतलेले व्रतच होते. त्यांनी जवळजवळ पंचेचाळीस पुस्तकांचे लेखन केले आहे. ते लेखनही व्रत म्हणूनच त्यांनी केले होते. रामदासस्वामींचे चरित्र आणि कार्य तरुणांच्या मनामनात रुजवण्यासाठी ते सर्वतोपरी अखंडपणे अखेरपर्यंत कार्यरत राहिले होते.
==आजच्या संदर्भात [[दासबोध]]==▼
समर्थविचारांचे प्रसारकार्य हे कधी थांबत नसते हे 'ग्रंथराज दासबोध ' या ग्रंथावरून दिसून येते. दुर्दैवाने सुनील चिंचोलकरांकडून हे कार्य पूर्ण होऊ शकले नसले तरी त्यांची मानसकन्या सौ. हर्षदा जोशी यांनी तितक्याच निष्ठेने त्यांचा आकस्मिक देहान्त झाल्यानंतर ग्रंथाचे कार्य अत्यंत उत्तमरीत्या पूर्ण केले आहे.
अभ्यासक, विद्यार्थी, प्राध्यापक आणि वाचक अशा सर्वांना अर्थ आणि विवेचनासह दासबोध समजावून देणारा 'ग्रंथराज दासबोध' हा ग्रंथ मोलाचा आहे.
समर्थ भक्तीतून सुनील चिंचोलकरांनी समर्थांची शिकवण लोकांपर्यंत जावी यासाठी विविध प्रकारची ग्रंथरचना सोप्या मराठीत केली. ते ग्रंथ आणि अन्य पुस्तके अशी :-
* कल्याणा, छाटी उडाली
* आद्यतम क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके
|