"दत्तू बांदेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
दत्तात्रेय तुकाराम बांदेकर (जन्म : कारवार, २२ सप्टेंबर १९०९; मृत्यू : मुंबई, ४ ऑक्टोबर १९५९) हे कानडी भाषेत जेमेतेम सात ’बुकं’ शिकून मराठी भाषेवर प्रभुत्व मिळविणारे एक आगळ्या प्रतिभेचे आणि वेगळ्याच प्रकृतीचे मराठी लेखक होते. काही काळ पुण्यात घालवल्यावर पुढे मुंबईत स्थायिक झाले. त्यांचे सारे जीवन कष्टात गेले, पण त्यांच्या स्वभावात त्याचा कडवटपणा कधी उतरलेला कुणी पाहिला नाही. मोठमोठ्या विद्वानांपासून ते अगदी गावंढळापर्यंत सगळ्यांनाच त्यांच्या लिखाणाने लोभविले.
[[आचार्य अत्रे|आचार्य अत्र्यांचे]] ते उजवे हात होते. १९३४साली [[आचार्य अत्रे]], दत्तू बांदेकर, सुंदर मानकर आणि कॅप्टन [[मा.कृ.शिंदे]] यांनी ’साहित्य झब्बूशाही विध्वंसक मंडळ’ नावाचे साहित्यावर चर्चा करणारे मंडळ काढले होते. मंडळाच्या पहिलीच सभा विभावरी शिरूरकर यांच्या वाङ्मयावर मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये झाली होती. तेव्हापासून अत्रे आणि बांदेकरांची मैत्री सुरू झाली.
ओळ ५:
जुलै १९४०पासून बांदेकर [[आचार्य अत्रे|आचार्य अत्र्यांच्या]] साप्ताहिक नवयुगमध्ये ’रविवारचा मोरावळा’ नावाचे सदर लिहीत.
चित्रपट विषयाला वाहिलेल्या ’चित्रा’
दत्तू बांदेकर स्वत: प्रसिद्धिपराङ्मुख होते. ते इतके लाजरे होते की कधी जनतेसमोर ते आले नाहीत. त्यांनी कुणालाही आपली मुलाखत घेऊ दिली नाही की आपला फोटो काढू दिला. [[पां.वा. गाडगीळ]] यांनी एका लेखात लिहिले आहे की, "दत्तू बांदेकर इतके लाजाळे आणि एकान्तिक होते की आचार्य अत्र्यांनी मुद्दाम बोलावून आणि एकोणीस वर्षे ’नवयुग’मध्ये त्यांची लहर सांभाळून त्यांना ठेवले नसते तर, लेखक म्हणून दत्तू बांदेकर कधीच संपले असते.
ओळ ३४:
* द.म. सुतार - हेही धनुर्धारीचे एक संपादक होते.
==दत्तू बांदेकर यांचे प्रकाशित वाङ्मय==
दत्तू बांदेकर हे चित्रपट-नाट्य समीक्षणे अशा स्वरूपाचाही मजकूर लिहीत. राजकीय व वाङमयीन क्षेत्र हा बांदेकरांच्या विनोदाचा विषय असे. उपरोध तरल कल्पकता, हजरजबाबी कोटिबाजपणा आणि रंजकता हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व लेखन कार्याचा आढावा घेणारे कारुण्याचा विनोदी शाहीर हे पुस्तक प्रसिद्ध झाले.
===पुस्तके===
* अतिप्रसंग (प्रस्तावना : [[चं. वि. बावडेकर]], टिपण: अनंत काणेकर, मुखपृष्ठ: दीनानाथ दलाल) (१९४०),
* अनिल
Line ६९ ⟶ ७२:
==दत्तू बांदेकरांच्या जीवनावर लिहिली गेलेली पुस्तके, लेख, नियतकालिके वगैरे==
* कारुण्याचा विनोदी शाहीर
* ’दर्पण’चा दत्तू बांदेकर जन्मशताब्दी विशेषांक (२००९)
* आठवणीतील बांदेकर (मनोहर बोर्डकर)
* दत्तू बांदेकर (चरित्र, लेखिका नेत्रा बांदेकर ऊर्फ नीलांबरी जोगीश)
* निवडक दत्तू बांदेकर (अप्पा परचुरे)
* सं.ग. मालशे संशोधन केंद्रातर्फे सादर करण्यात आलेला दत्तू बांदेकरांवरील शोधनिबंध, कविता महाजन, [http://aisiakshare.com/node/6926|(१९९६)]
|