"वर्षारंभ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३०:
 
==भारत==
भारतात सार्वत्रिकरीत्या पाळले जाणारे कॅलेंडर म्हणजे आंतरराष्ट्रीय [[ग्रेगोरीय दिनदर्शिका|ग्रेगोरियन कॅलेंडर]]. याशिवाय [भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका|भारतीय राष्ट्रीय पंचांग]] (भारताचे राष्ट्रीय कॅलेंडर) नावाचे एक भारतातच वापरायचे सरकारी कॅलेंडर आहे. त्याच्या वर्षाचा अनुक्रमांक व महिन्यांची नावे शक संवत्सराप्रमाणेच असतात. २२ मार्च १९५७ रोजी सरकारने हे [[भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका|भारतीय राष्ट्रीय पंचांग]] वापरायला सुरुवात केली. प्रत्यक्षात जनतेची साथ न मिळाल्याने या कॅलेंडरच्या तारखा सरकारी पत्रांवर वा सरकारी राजपत्रांवर ग्रेगोरियन तारखांच्या जोडीने लिहिण्यापलीकडे अन्यत्र वापरल्या जात नाहीत. आकाशवाणीवरही या तारखेची घोषणा होते. वर्षारंभ २२ मार्चला (लीप वर्षात २१ मार्चला) होतो.
 
भारतात राज्यनिहाय वेगवेगळी पंचांगे वापरात आहेत.
 
[[आंध्र प्रदेश]], [[कर्नाटक]], [[मध्य प्रदेश]], ([[झारखंड]]?), [[महाराष्ट्र]], [[गोवा]] आणि [[तेलंगण]]. : शक [[संवत्सर]] हे चांद्र पंचांग. याचा वर्षारंभ चैत्राच्या पहिल्या दिवशी-गुढी पाडव्याला येतो. वर्षक्रमांक ग्रेगोरियन वर्षातून ७८ किंवा ७९ वजा केले की मिळतो.
 
[[गुजराथ]] : [[गुजरात|गुजराथी]] वर्ष दिवाळीच्या पाडव्यापासून, म्हणजे शक संवत्सराच्या कार्तिक शुद्ध प्रतिपदेला सुरू होते. वर्षक्रमांक विक्रम संवत्सरानुसार असतो. तो ग्रेगोरियन वर्षक्रमांकात ५६ किंवा ५७ किंवा मिळवले की मिळतो. महिन्यांची नावे शक संवत्सराप्रमाणेच.
 
[[आसाम]], [[केरळ]], [[तमिळनाडू|तामिळनाडू]], [[पंजाब]] : वर्षारंभाचा दिवस, नावे अनुक्रमे रोंगाली [[बिहू]], [[विशु]], तमिळ पुतंडू आणि [[बैसाखी|वैशाखी]]. ही १३/१४/१५ एप्रिलला येते. केरळमध्ये[[केरळ]]मध्ये चिंगम (कोलम वर्ष) नावाचे एक [[मल्याळी]] पंचांगही वापरात आहे. त्याचा वर्षारंभ १५/१६/१७ ऑगस्टला असतो.
 
[[बंगाल]] : वर्षारंभाचा दिवस '[[पहेला वैशाख |पहिला वैशाख]]'. हा दिवस १४/१५ एप्रिलला येतो.
 
[[पारशी]] वर्षारंभाच्या दिवसाला नवरोज म्हणतात. हा दिवस १७/१८/१९ ऑगस्ट या दिवशी येतो. [[पारशी]] पंचांग सूर्याधारित आहे.
 
[[ज्यू धर्म|ज्यूंचा]] वर्षारंभाचा दिवस २१ मार्चला येतो. त्यालाही नवरोज म्हणतात. [[ज्यू धर्म|ज्यू]] पंचांग सूर्याधारित आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/वर्षारंभ" पासून हुडकले