"वर्षारंभ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: जानेवारी १ला हा सार्वजनिकरीत्या वर्षारंभाचा पहिला दिवस असला तर... |
No edit summary खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर ! |
||
ओळ १:
आज जे इसवी सनाचे संवत्सर ([[ग्रेगरीय दिनदर्शिका|ग्रेगोरियन कॅलेंडर]]) अंमलात आहे ते
चीनचे कॅलेंडर :- चीनच्या वर्षारंभाचा दिवस २० जानेवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान पडतो. दर तीन वर्षांनी ह्या चांद्र कॅलेंडरचा सौर पंचांगाशी (सूर्याधारित सोलर पंचांगाशी) मेळ घालावा लागतो. चीनच्या वर्षांची आणि राशींची नावे बारा जनावरांच्या नावांवरून ठेवली आहेत.
जपानचे कॅलेंडर :- जपानचे लोक चीनचे चांद्र कॅलेंडर पाळत असत. मात्र इ.स. १८७३पासून ते ग्रेगोरियन कॅलेडरनुसार वर्षारंभाचा दिवस मानू लागले आहेत. या दिवशी जपानी लोक, कुटुंबातील लोकांचे कष्ट कमी व्हावेत यासाठी, प्रार्थनागृहात जाऊन १०८ वेळा घंटा वाजवतात.
कंबोडियाचे कॅलेंडर :- ह्यांच्या वर्षाच्या आरंभाचा दिवस १३ किंवा १४ एप्रिलाला पडतो. या दिवशी कंबोडियाची जनता विभिन्न धार्मिक स्थळांमध्ये जाते आणि पारंपरिक खेळ खेळते.
कोरियाचे कॅलेंडर :- ह्यांच्या वर्षाची सुरुवात चांद्र पंचांगाप्रमाणे होत असली, तरी १ जानेवारी हाही वर्षारंभाचा दिवस समजला जातो.
थायलंडचे कॅलेंडर : १३ किंवा १४ एप्रिल हा थायलंडच्या वर्षाचा पहिला दिवस. ह्या दिवशी लोक एकमेकांना थंडगार पाण्याने भिजवून शुभकामना देतात.
व्हिएटनामचे कॅलेंडर :- चिनी कॅलेंडरप्रमाणे व्हिएतनामी लोकांचे नवीन वर्ष २० जानेवारी ते २० फेब्रुवारी यादरम्यान सुरू होते. हा महत्त्वाच्या सणाचा आणि सुट्टीचा दिवस असतो.
श्रीलंकेचे कॅलंडर :- श्रीलंकेच्या नववर्षाच्या पहिल्या दिवसाला 'अलुत अवरुद्ध' म्हणतात. हा दिवस एप्रिलच्या मध्यावर येतो. नव्या वर्षाच्या आरंभीच्या दिवशी श्रीलंकेचे प्रजाजन नैसर्गिक वस्तू वापरून स्नान करतात. हे दुर्गुणांबद्दलचे आणि आयुष्यात केलेल्या चुकांचे प्रायश्चित्त समजले जाते.
युरोप :- युरोपात सर्वसाधारणपणे [[ग्रेगरीय दिनदर्शिका]] अंमलात आहे, परंतु ब्रिटनमधील पेमब्रोकशायर काऊंटीतील ग्वाटन व्हॅलीतील लोक १३ जानेवारी हा वर्षारंभाचा दिवस मानतात. हा ज्युलियन कॅलेंडरचा पहिला दिवस आहे.
युरेशिया :- रशिया आणि जाॅर्जिया (हा युरोपात आणि आशियातही येतो.) येथील लाखो लोक ज्युलियन कॅलेंडर पाळतात. वर्षाच्या आरंभाचा दिवस १४ जानेवारीला येतो.
आफ्रिका :- इथियोपियात नववर्षाला 'एनकुतातश' म्हणतात. या वर्षाचा पहिला दिवस सप्टेंबरच्या ११ तारखेला येतो. ग्रेगोरियन कॅलेंडरच्या लीप वर्षात हा दिवस एक दिवस पुढे जाऊन १२ तारखेला येतो.
अमेरिका :- अमेरिकेच्या पेनसिल्व्हानियामध्ये 'ओडुंडे' नावाचा एक उत्सव असतो. ज्या दिवशी हा उत्सव असतो, त्या दिवसाला 'आफ्रिकन न्यू ईयर'डे म्हणतात. हा दिवस जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पडतो. हा अमेरिकेतील आफ्रिकन लोकांकढून साजरा होणाऱ्या महत्त्वाच्या उत्सवांपैकी एक आहे.
नेपाळ :- नेपाळ परंपरेनुसार नवीन वर्ष १४ एप्रिलला सुरू होते. ह्या दिवशी सार्वत्रिक सुट्टी असते आणि लोक पारंपरिक पोषाख घालून हा दिवस साजरा करतात.
==भारत==
(अपूर्ण)
|