"द्वारका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
[[चित्र:Dwarka.jpg|thumb|right|द्वारकेचे चित्र]]
'''द्वारका''' (किंवा द्वारिका) हे भारताच्या [[गुजरात]] राज्यातील प्राचीन शहर आहे.[[महाभारत | महाभारतातील]] आख्यायिकेप्रमाणे या शहराची स्थापना भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णांनी]] केली. जरासंधाने कालयवनाच्या मदतीने मथुरेवर १७ वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला.१८ व्या वेळी जरासंध व कालयवनाने मथुरेवर आक्रमण केल्यामुळे कृष्णाने [[विश्वकर्मा]] याच्या मदतीने द्वारका शहराची निर्मिती केली. ही द्वारका म्हणजे सोन्याची नौकाच होती. द्वारकेचे प्रवेशद्वार अद्भुत होते.जरासंधासारखे शत्रू द्वारकेत सहजासहजी प्रवेश करू शकणार नाहीत अशी या प्रवेशद्वाराची रचना होती, असे सांगितले जाते.
 
आजच्या द्वारका शहरात श्रीकृष्णाचे मोठे पुरातन मंदिर आहे.
 
आदि शंकराचार्यांनी जी चार पीठे स्थापन केली त्यांपैकी एक पीठ द्वारका येथे आहे, त्याला कालिका मठ किंवा शारदा मठ म्हणतात. (इतर पीठे (मठ) - दक्षिण भारतातील रामेश्वर येथील शृंगेरी ज्ञानमठ, ओरिसा राज्यातील पुरी येथी गोवर्धन मठ, उत्तरांचल राज्यातील बद्रिकाश्रम येथे असलेला ज्योतिर्मठ).
आख्यायिकेप्रमाणे मूळ द्वारका ही बेटावर वसलेली होती व येथे बंदर होते. ह्या बंदराची प्रगत अर्थव्यवस्थेमुळे आर्थिकदृष्ट्या पुढारलेले शहर म्हणून ख्याती होती. गांधारीच्या शापामुळे कृष्ण जाणून होता की एक दिवशी यादवांच्या कुलनाशाबरोबरच द्वारकेचाही नाश होईल. यादवांनी आपसात लढून आपला कुलनाश करून घेतल्यानंतर द्वारका समुद्रात बुडाली.
 
आजही (२०१९ साली) बेट द्वारका नावाचे एक वेगळे गाव आहे. ओखा बंदरातून होडीने या द्वारका बेटावर जाता येते.
 
==द्वारकानगरीवरील पुस्तके==
*
 
[[वर्ग:गुजरातमधील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/द्वारका" पासून हुडकले