"चमचा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
१) शिरा, पोहे, फोडणीचा भात यांसाखे घन अन्नपदार्थ खाण्यासाठी, पानात तूप, मीठ, चटणी वाढण्यासाठी किंवा मसाल्याच्या डब्यातील मसाले, शिजवायच्या
चमचा शक्यतो स्टेनलेस स्टीलचा, काही वेळेस प्लास्टिकचा, लाकडाचा आणि क्वचित चांदीचा असतो. चमच्याच्या आकारानुसार आणि आकारमानानुसार चमच्याला आईसक्रीमचा चमचा, तुपाचा चमचा, चहाचा चमचा, टेबल स्पून किंवा डेझर्ट स्पून ही नावे मिळतात.
ओळ ५:
हात स्वच्छ धुतलेले नसल्यास चमच्याने खाणे आरोग्यदायी असते.
२) सोन्याचा चमचा :
अतिश्रीमंत घरात जन्मलेल्या व्यक्तीबाबत " तो सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला आहे " असे म्हणायची रीत आहे.
ओळ ११:
३) चमचेगिरी करणाऱ्या (लाळघोटेपणा/मखलाशी/चहाड्या/पुढेपुढे करणाऱ्या) व्यक्तीसदेखील लाक्षणिक अर्थाने 'चमचा' म्हणतात.
४) काटेरी चमचा :
उपहारगृहात डोसा, उत्तप्पा यांसारखे पदार्थ खाण्यासाठी साध्या चमच्याबरोबर एक विशिष्ट प्रकारचा जो चमचा दिला जातो त्यास काटेरी चमचा किंवा नुसताच काटा असे म्हणतात.
५) लाकडी चमचा :
पूर्वीच्या काळी आईसक्रीम खाण्यासाठी लहान आकाराच्या चपट्या लाकडी चमच्याचा वापर केला जात असे. कालांतराने याची जागा प्लास्टिक चमच्याने घेतली. (महाराष्ट्रात प्लॅस्टिक चमच्याच्या वापराला बंदी आहे.)
|