"कापूस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
[[चित्र:Kapus.JPG|200px|right|thumb|बोंडातुन निघालेला कापूस]]
कापूस हा वनस्पतीपासून मिळणारा आणि सेल्युलोजयुक्त [[तंतू]] पूर्वापार मोठय़ा प्रमाणात वापरला जाणारा धागा आहे. कापूस हे एक [[नगदी पीक]] आहे. कापसाला पाण्याचे आकर्षण आहे. सुती कपडे घातल्यास हाच गुणधर्म घाम टिपून घ्यायला मदत करतो. म्हणूनच उष्ण कटिबंधातील देशात सुती कपडे प्राधान्याने वापरतात. कापूस खूप मऊ असतो.
 
कापसाच्या बियांना सरकी म्हणतात. सरकी हे गुरांचे खाद्य आहे तर सरकीचे तेल स्वयंपाकासाठी वापरायचे एक स्वस्त तेल आहे. या तेलाचा साबणाच्या आणि अन्य व्यवसायांत वापर होतो.
 
कापसामध्ये जवळपास ९५% सेल्युलोज (Cellulose) असते.
 
मराठी-हिंदीमध्ये कापसाला [[रुई]] अस प्रतिशब्द आहे. मात्र [[रुई]] (Calotropis Procera) या विषारी वनस्पतीचा आणि कापसाचा काही संबंध नाही. असे असले तरी रुईच्या झाडापासूनही एक प्रकारचा अतिशय मऊ कापूस मिळतो, त्याच्या गाद्या-उश्या करतात. रुईच्या झाडापासून निसटलेला हा मऊ कापूस दशदिशांना उधळत असतो.
 
==इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/कापूस" पासून हुडकले