"दिवाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १२:
उपलब्ध पुराव्यांनुसार दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|शीर्षक=भारतीय संस्कृती कोष खंड चौथा (१९७३)|last=जोशी|first=महादेवशास्त्री|publisher=|year=|isbn=|location=|pages=}}</ref> या सणाचा उगम फार प्राचीन काळी, आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते, त्या काळातच झाला असा समज आहे. तथापि वैदिक काळात आश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचित्य साधून आश्वयुजी किंवा आग्रयण यासारखे यज्ञ केले जात असत, ज्यांचा समावेश सात पाकयज्ञांमध्ये होतो. परंतु या धार्मिक आचारात दिवाळीचे प्राचीन संदर्भ सापडतात, असे नेमके म्हणता येतेच असे नाही, असे मत बी. के. गुप्ते यांनी आपल्या फोकलोअर ऑफ दिवाली या पुस्तकात मांडले आहे.<ref>डॉ. काणे पांडुरंग वामन, धर्मशास्त्र का इतिहास (१९७३)</ref>
 
काही लोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून [[राम]]चंद्र सीतेसह अयोध्येला परत आला, तो याच दिवसात.<ref name=":0" />पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करुन प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या, आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसांत सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे लावले जातात. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा [[किल्ला]] तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात. धान्य पेरतात. यामागची परंपरा कशी व केंव्हाकेव्हा सुरू झाली याची नोंद नाही.
 
[[चित्र:दिवाळीतील तयार किल्ले प्रतिकृती विक्री.jpg|thumb|दिवाळी किल्ले प्रतिकृती]]
ओळ ४६:
 
नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी [[कृष्ण|कृष्णाने]] [[नरकासुर|नरकासुराचा]] वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले. [[नरकासुर|नरकासुराने]] तप करून [[ब्रह्मदेव|ब्रह्मदेवाला]] प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा - म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही - असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता [[अदिती|अदितीची]] कुंडले व [[वरुण|वरुणाचे]] विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, [[गंधर्व]] व [[मानव|मानवांना]] तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी, अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने [[गरुड|गरुडावर]] स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून [[आश्विन कृष्ण चतुर्दशी]]स ''नरक चतुर्दशी'' हा सण साजरा केला जातो.<ref>डॉ.काणे पांडुरंग वामन,धर्मशास्त्र का इतिहास, चतुर्थ भाग,१९७३</ref>
<ref name=":1" />नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे. या दिवशी [[अभ्यंगस्नान|अभ्यंगस्नानाचे]] महत्त्व असते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक [[उटणे]] लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/abhayagesanan-diwali-dawn-and-fragal/articleshow/66527522.cms|शीर्षक=अभ्यंगस्नान, ‘दिवाळी पहाट’अन् फराळाचा आस्वाद|last=|first=|date=७. ११. २०१९|work=|access-date=२३. १०. २०१९|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> या दिवशी पहाटे यमासाठी [[नरक चतुर्दशी|नरका]]त, म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील स्वच्छतागृहातआदल्या दीपदानदिवशी करण्याचीघासून पुसून स्वच्छ केलेल्या स्वच्छतागृहात (पणती लावण्याची) प्रथा आहे असे मानले जाते.
वर्षक्रियाकौमुदी, धर्मसिंधु इ. ग्रंथांमध्ये सांगितले आहे की आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि अमावास्येला संध्याकाळी लोकांनी आपल्या हातात मशाली घेऊन त्या आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी दाखवाव्यात आणि प्रार्थना करावी.<ref>धर्मशास्त्राचा इतिहास, चौथा भाग, १९७३ (लेखक - डॉ. पां.वा. काणे)</ref>
 
नरक चतुर्दशीच्या पहाटेपासून फटाके उडवायला सुरुवात होते, तिचा शेवट भाऊबीजेच्या रात्री होतो. त्यानंतर घरात उरलेले फटाके [[तुलसी विवाह|तुळशीच्या लग्नादिवशी]] उडवून संपवतात.
 
== लक्ष्मीपूजन ==
Line ७७ ⟶ ८०:
भाऊबीजेच्या दिवशी [[चित्रगुप्त]]ाची पूजा होते. हा दिवस कायस्थ समाजाचे लोक [[चित्रगुप्त]]ाची जयंती म्हणून साजरा करतात.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=7-7xDAAAQBAJ&pg=PT32&dq=chitrgupta+pooja+in+diwali&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiJ9duxuevaAhXHebwKHb-3AHUQ6AEIJjAA#v=onepage&q=chitrgupta%20pooja%20in%20diwali&f=false|शीर्षक=Mrs LC's Table: Stories about Kayasth Food and Culture|last=Vishal|first=Anoothi|date=2016-09-25|publisher=Hachette India|isbn=9789350095928|language=en}}</ref>
 
==भारतातील विविध समाजांची दिवाळी==
* जैन समाज : आश्विन अमावास्येला जैनांचे २४वे तीर्थंकर भगवान महावीर मोक्षाला गेले. त्या दिवशी महावीरांना जलाभिषेक करून त्यांची पूजा करतात, दिवे उजळतात आणि त्यांना 'निर्वाण लाडूं'चा भोग चढवतात. आणि नंतर फटाक्यांची आतशबाजी करतात.
* आंध्रातील तेलुगू समाज : ही मंडळी नरक चतुर्दशीलाच दिवाळी म्हणतात. त्या दिवशी कागदाचा किंबा बांबूचा नरकासुराचा पुतळा करून त्याचे दहन करतात, मग दिवे लावतात व लक्ष्मीपूजन करतात.
* बंगाली समाज : दिवाळीच्या दिवशी बंगाली लोक कालीबाड्यांत जाऊन कालीची पूजा करतात. रात्री जागरण करून भजने म्हणतात. दीपावलीच्या रात्री घरोघर व मंदिरांत दिवे लावतात. त्यांचे लक्ष्मीपूजन पंधरा दिवस आधी, म्हणजे शरद पैर्णिमेलाच झालेले असते.
* बौद्ध समाज : गौतम बुद्ध दिवाळीच्या दिवसांतच तप करून परत आले होते. त्याच दिवशी बुद्धांचा प्रिय सहकारी अरहंत मुगलयान हा निर्वाणाला गेला. त्याची आठवण काढून बौद्ध मंडळी गौतम बुद्धाला प्रणाम करून दिवे लावतात.
* तमिळनाडूतीत मद्रासी लोक : प्रत्येक घरातून स्त्री-पुरुष एकेक जळती पणती देवळात नेऊन ठेवतात, आणि तेथेच बसून रात्रभर भजन करतात.
* केरळमधील मल्याळी समाज : दिवाळीच्या दिवशी अय्यप्पा देवाची पूजा करतात. घरांभोवती आणि मंदिरांत रांगोळी काढून दिवे लावतात. दक्षिण भारतीय मिष्टान्ने बनवून लोकांना केळीच्या पानांमधून प्रसाद वाटतात.
* पंजाबातील शीख समाज : शीखांच्या ६व्या गुरूंना [[जहांगीर]] बादशहाने कैद करून ठेवले, त्यांची आश्विन अमावास्येला सुटका झाली. म्हणून शीख तो दिवस 'दाता बंदी छोड दिवस' म्हणून साजरा करतात.
* सिंधी समाज : पूर्वी सिंधू नदीच्या काठी दिवे लावायची सिंधी परंपरा होती. आता घरात गणेशाची आणि लक्षमीची पूजा करून घराच्या दरवाज्यांत दिवे लावतात.
==स्थानिक उत्सव /सांस्कृतिक कार्यक्रम==
दिवाळीच्या सणासाठी स्थानिक पातळीवर विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. उदा. वसुबारस या दिवशी सवत्स धेनूच्या पूजेचे आयोजन चौकाचौकांत केले जाते.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/vasubaras-festival-celebrate-1158487/|शीर्षक=गोपूजनाने झगमगत्या दीपोत्सवाचा प्रारंभ|last=ठोंबरे|first=दया|date=८. ११. २०१५|work=|access-date=२३. १०. २०१९|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> दिवाळीच्या फटाक्यांची आतषबाजी मोकळ्या मैदानात योजली जाते. फराळ वाटप, कला अभिव्यक्ती असे कार्यक्रमही योजले जातात.दिवाळीचे औचित्य साधून विविध शहरांमध्ये दिवाळी पहाट, पाडवा पहाट यासारखे [[संगीत]], [[नृत्य]], वादन अशा विविध कलांचा आस्वाद घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन होते.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.esakal.com/pune/sakal-diwali-pahat-event-sakal-225512|शीर्षक=https://www.esakal.com/pune/sakal-diwali-pahat-event-sakal-225512|last=|first=|date=१८. १०. २०१९|work=|access-date=२३. १०. २०१९|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.loksatta.com/manoranjan-news/diwali-pahat-program-1328537/|शीर्षक=‘दिवाळी पहाट’चे बदलते सूर|last=|first=|date=३०. १०. २०१६|work=|access-date=२३. १०. २०१९|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> तसेच काही ठिकाणी वसुबारस, नरकचतुर्दशी अशा निमित्ताने सामूहिक दीपोत्सव कार्यक्रम केले जातात, ज्यामध्ये नागरीकही सहभागी होतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/दिवाळी" पासून हुडकले