"दलित वाङ्मय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ११:
 
== नाटके ==
ही नाटके अशी आहेत; अमली(ऋषिकेश सुलभ), अश्मक (दत्ता भगत), आगट (अशोक बुरबुरे), आग्या वेताळ (जॉनी मेश्राम), उचक्का (लक्ष्मण गायकवाड), कॅम्पस (वामन तावड़े), काॅम्रेड जोशी (अमर रामटेके), कालचक्र (हेमचंद्रजा), काळोखाच्या गर्भात (भि. शि. शिंदे), किरवंत, कैफियत (रुस्तुम अचलखांब), कोर्ट मार्शल (स्वदेश दीपक), खेळीया, गावकी (रुस्तुम अचलखांब), चक्रांत, जय जय रघुवीर समर्थ, जाता नाही जात (सिद्धार्थ तांबे), झाडाझडती (शिल्पा मुंब्रिसकर), झुंबर विदूषक (प्रभाकर दुपारे), तृष्णापार (फ.मु. शिंदे), थांबा रामराज्य येत आहे (प्रकाश त्रिभुवन), देवनवरी (प्रेमानंद गज्वी), धादान्त खैरलांजी (प्रज्ञा पवार), पांढरा बुधवार, पुन्हा एकदा नव्याने (भगवान हिरे), पैदागीर, बळी अडगुळ (गुणशेखरन), महाभोज (मन्नू भंडारी), युगयात्रा (म.भि. चिटणीस), रापी (संजय जीवने), वाटा पळवाटा, शिवाजी अंडरग्राऊंड व्हाया भीमनगर मोहल्ला (राजकुमार तांगडे), सुनो शेफाली (कुसुम कुमार), सुंबरान (रामदास कांबळे), स्त्री (कमल अडिकणे, १९८०), स्मारक(कुमार देशमुख), आदि
* सन १९८२मध्ये पहिला दलित नाट्यमहोत्सव.
* सन १९५५मध्ये मिलिंद महाविद्यालयात स्नेहसमेलनाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी तिथे विद्यार्थी व प्राध्यापकांनी सादर केलेली नाटके पाहिली. सर्वसाधारण विषयावर नाटके लिहिण्यापेक्षा 'दलित जीवनावर नाटके लिहा' असे त्यांनी सांगितले आणि तिथेच दलित रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली गेली. मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य म.भि. चिटणीस यांनी 'युगयात्रा' (१९५६)लिहून आंबेडकरांच्या समाजप्रबोधन हाकेला प्रतिसाद दिला. १९५६ मध्ये नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ. आंबेडकरांच्यासमोर लाखो प्रेक्षकांसमोर, अनुयायांसमोर या नाटकाचा प्रयोग झाला. त्यानंतर काही वर्षात दलित लेखकांनी अनेक दलित नाटके, एकांकिका लिहिल्या.
Line २९ ⟶ ३०:
* दलित रंगभूमी आणि चळवळीचे नाटककार सामाजिक बांधिलकी मानणारे आहे. ह्या बांधिलकीमुळेच समाज व्यवस्थेने निर्माण केलेल्या विषमतेची व अन्यायाची चित्रे चळवळीच्या नाटकातून रेखाटण्यास उद्युक्त झालेले दिसतात . ह्या जाणिवेने निर्माण होणारे ताणतणाव त्यांनी धिटाईने व बारकाईने चित्रित केलेले आहेत. आजच्या दलित रंगभूमीवरील नाटकांचे स्वरूप प्राधान्याने प्रतिक्रियात्मक , निषेधात्मक , नकारप्रचुर असे आहे . त्यात बंडखोरी , संतप्तता, आक्रमकता, त्वेषपूर्णता, झालेल्या अन्यायाचा दंश, सरळ सरळ आणि उघड स्वरूपात बहुतांशी प्रगट असल्याचे दिसून येते. जळजळीत वेदना भोगणारा दलित माणूस ह्या दलित नाटकांत प्रथमच भेटतो. देव, दैव अंधश्रद्धा, कर्मकांड, पुराणमतवाद किंवा पारंपरिक संकल्पना नाकारणे, तसेच बद्ध विचारातून आलेला अनिश्वरवाद, अनात्मवाद, तर्कवाद, बुद्धिप्रामाण्यवाद, नीतिवाद स्वीकारणे हेच दलित जाणिवेचे नाटक होय! सामाजिक क्रांतीचे एक साधन म्हणून दलित नाट्य चळवळीचा विचार होत असला तरी ह्या विषयाच्या अनुषंगाने कलात्मकतेचा ही विचार होणे आवश्यक आहे. दलित रंगभूमीवरील नाटके ही प्रचारी असल्यास हरकत नाही; पण प्रचारालाही कलात्मकतेचे भान असणे आवश्यक आहे. आक्रस्ताळी लेखनातून काहीच साध्य होत नाही हे लक्षात घेऊन दलितांना सोसाव्या लागणाऱ्या दुःखांचे, व्यथांचे दर्शन या नाटककारांनी जरुर दाखवावे, पण त्याचे प्रदर्शन करण्याची वृत्ती असू नये, हे महत्त्वाचे आहे. ह्या सगळ्या दलित नाटकात आता एक प्रकारचा एकसुरीपणा जाणवू लागला आहे. त्याच एक आवर्त निर्माण झाले आहे. त्या दलित नाटकाच्या मुळाशी जी बंडखोर वृत्ती आहे, त्याचा परिपोष करण्याऐवजी आपले नाटक हे एका मोठ्या व्यापक चळवळीचे शक्तिस्थान आहे, याचे ह्या दलित नाटककारांनी अजिबात भान विसरता कामा नये.
* या सर्वच दलित नाटकांमध्ये नाट्यप्रयोगाचे सर्व गुण ओतप्रोत भरलेले आहेत. त्यातील आशय व्यापक आणि सखोल आहे . अभिव्यक्ती चैतन्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण आहे आणि तांत्रिकदृष्ट्याही ते अधिक सफाईदार आहे. मात्र ह्या सर्व नाटकांमध्ये अनुभवाची खोली वाढणे आणि मानवी समाजातील गुंतागुंतीचे योग्य दर्शन घडविणे आवश्यक आहे. दलितांना येणारे विदारक अनुभव एका नाट्यात खच्चून भरण्यापेक्षा एका एका अन्यायाच्या, उपेक्षेच्या घटना, घडामोडी याभोवती कथासूत्र गुंफून त्यातून मानवी मनाच्या स्वभावाच्या क्रिया- प्रतिक्रिया, आघात- प्रत्याघात यांचे कौशल्यपूर्ण- कलापूर्ण चित्रण प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न होणे या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही .
* दलित रंगभूमीवरील नाटके प्रचारी, एकसुरी, भडक, बेेेढब आहेेेत. तेती फारच 'लाऊडी' (भडक) आहेत अशी टीका वारंवार केली जाते. याला उत्तरही असे देण्यात येते की, दलित नाटक व सामाजिक समस्या, दलित जीवन हे वेगळे असू शकत नाही; ते अविभाज्य घटक आहेत. चांगली कलाकृती हे नेहमीच जीवनमूल्यांचा प्रचार करीत असते, म्हणून कलावंत व प्रचारक यांच्यातील अविभाज्य रेषा पुसून टाकता येत नाही. सामाजिक समस्याप्रधान नाटकातून एखाद्या तत्वाची व मूल्यांची मांडणी होत असेल तर आणि नाट्यमयतेला बाधा देत नसेल तर केवळ दलित नाटक आहे असे म्हणून त्यावर टीका करणे योग्य होणार नाही . दलित नाटक भडक आहे , तसेच दलित रंगभूमीतील नाटकात व्यक्त होणारे सामाजिक वास्तव एकपदरी आहे, असे म्हटले जाते . पण ही गोष्ट विषय वस्तूच्या मर्यादेमुळे आलेली नसून नाट्य विषयाच्या अपुऱ्या कलहामुळे निर्माण झाली आहे ; ही वस्तुस्थिती आहे . ह्याकडे बऱ्याच या दलित नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षांनी लक्ष वेधले आहे . दलित रंगभूमीतील नाटकात तोचतोपणा टाळण्यामध्ये प्रामुख्याने प्राध्यापक दत्ता भगत ,
*कमलाकर डहाट , टेक्सास गायकवाड, प्रेमानंद गज्वी ,रामनाथ चव्हाण, भि.शी. शिंदे इत्यादी आघाडीवर असून त्यांच्या ाट्य कलकृती मधील विविधता ही लक्षणीय आहे .
*प्रस्तुत दलित रंगभूमीवरील नाट्यकृतींचे अंतरंग तपासताना असे दिसून येते की , लेखकांनी ह्या नाटकात दलितांच्या जीवनाशी निगडित असणाऱ्या समस्या व प्रश्न यांनाच अधिक प्राधान्य दिलेले दिसून येते . त्या दृष्टिकोनातून ही नाटके संघर्ष प्रधान असण्याबरोबरच समस्याप्रधान असलेली अधिक जाणवतात. याचे कारण म्हणजे समस्येतून संघर्ष निर्माण झाले आहेत . दलितांना आपले प्रश्न व समस्या यांची जाणीव होणे हीच मुळी दलित नाट्यप्रयोजनांची व अस्मितेची निदर्शक मानता येईल . त्या दृष्टिकोनातून ही नाटके संघर्षप्रधान असण्याबरोबरच समस्याप्रधान असलेली अधिक जाणवतात . याचे कारण म्हणजे समस्येतून संघर्ष निर्माण झाले आहेत . दलितांना आपले प्रश्न व समस्यांची जाणीव होणे हीच मुळी दलित नाट्यप्रयोजनांची व अस्मितेची निदर्शक मानता येईल .
*
* दलित नाटक हे 'दलित' जीवनाचे नाट्य असल्याने ते प्रस्थापित रंगभूमीला जवळचे राहणार नाही, हे उघड आहे.
* ग्रामीण भागातील महार, मांग, चांभार, लोहार, सुतार, घिसाडी, कैकाडी, साळी, कोळी, कोष्टी, कुंभार, भराडी, अशा बारा बलुतेदारांचे, आदिवासींचे, कष्टकऱ्यांचे, कामगारांचे, पिचलेल्यांचे, रंजल्या - गांजल्यांचे, अन्याय-अत्याचारग्रस्तांचे प्रश्न दलित साहित्याने, दलित नाटकांनी प्रकर्षाने मांडले .