"समाजवादी पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
जयप्रकाश नारायण यांनी स्थापन केलेला '''समाजवादी पक्ष''' हा त्या तुकड्यांपैकीच एक पक्ष. हा आजही उत्तरी [[भारत|भारतातील]] एक प्रमुख [[राजकीय पक्ष]] आहे. मुलायम सिंग यादव हे त्यांच्या मुलाने - अखिलेश यादव याने - पक्षातून हकालपट्टी करेपर्यंत या पक्षाचे अध्यक्ष होते. अमरसिंग, अबू आझमी हे पक्षातील इतर महत्त्वाच्या व्यक्ती. अनेक चित्रपट अभिनेते व उद्योगपती या पक्षाचे सदस्य आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या राज्यात या पक्षाचे वर्चस्व आहे. अलीकडच्या काळात मुंबईत या पक्षाने आगमन केले होते. २००८ मध्ये मराठी भाषकांच्या विरोधात या पक्षाने काही प्रक्षोभक भाषणे व भित्तिपत्रके लावल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर या पक्षाची धुमश्चक्री उडाली होती. मुलायम सिंग यांच्या या समाजवादी पक्षात कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याचा ‘कौमी एकता दल’ हा पक्ष विलीन झाला आहे. (जून २०१६)
 
भारतावर इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीनंतर जयप्रकाश नारायण यांच्या पक्षातूनच जनता पक्षाचा उदय झाला. याही राजकीय पक्षाचे यथावकाश तुकडे होऊन (नीतीशकुमार/शरद यादव यांचा) संयुक्त जनता दल, (लालूप्रसाद यादव यांचा) राष्ट्रीय जनता दल, (ओमप्रकाश चौटाला यांचा) भारतीय राष्ट्रीय लोकदल, (देवेगौडा यांचा) जनता दल सेक्युलर, शरद यादव यांचा जनता दल (युनायटेड) आणि (कमल मोरारका यांचा) समाजवादी जनता पक्ष, जन मोर्चा, समाजवादी पक्ष (अखिलेश यादव गट), समाजवादी पक्ष (मुलायमसिंग यादव), बहुजन समाजवादी पक्ष (मायावती), वगैरे वगैरे अनेक पक्ष निर्माण झाले. यापैकी सहा पक्षांचे विलीनीकरण होऊन एक नवा राजकीय पक्ष उदयास येणार होता ((१५ एप्रिल २०१५ या तारखेची बातमी), पण ते शक्य झाले नाही.
 
रामविलास पासवान, अजित सिंग, नवीन पटनायक अशा काही नेत्यांनी या नव्या पक्षापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. याउलट शिवपाल यादव यांनी ‘समाजवादी धर्मनिरपेक्ष मोर्चा’ नावाचा नवाच पक्ष स्थापन केला आहे. शिवपाल यांचे वडील बंधू मुलायम सिंग यादव या पक्षाचे अध्यक्ष असतील. (९ मे, २०१७ची बातमी).